Vivad Se Vishwas Scheme 2025 In Marathi : विवाद से विश्वास योजना
Vivad Se Vishwas Scheme 2025 : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. 2024 संपून 2025 मध्ये सर्वांनी पदार्पण केले आहे. करदात्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने विवाद से विश्वास योजनेची मुदत वाढ वाढवली आहे. या योजनेची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती ती आता 31 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता एक महिन्याची मुदत वाढ या योजनेअंतर्गत करदात्यांना मिळणार आहे. करदाते कमी रकमेसह त्यांच्या विवादित करांची पूर्तता करू शकतील.
एक महिन्याने मुदत वाढ
Vivad Se Vishwas Scheme आयकर विभागाने करदातांच्या विवादित कर समस्यांचे निराकरण करण्यासाठी विवाद से विश्वास योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आयकर विभागामुळे त्रासलेले करदाते कमी रक्कम भरून ते पूर्ण करू शकतात. या योजनेची अंतिम मुदत तारीख 31 डिसेंबर 2024 होती परंतु प्राप्तिकर विभागाने या संदर्भात अधिसूचना झाली करून या योजनेअंतर्गत मुदतवाढ एक महिन्याने वाढवली आहे. आता या योजनेअंतर्गत मुदत वाढ 31 जानेवारी 2025 पर्यंत केली आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घेऊन कर विवाद मिटवायचा असेल तर तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी आहे.
मुदतीनंतर 110% भरावा लागेल कर
Vivad Se Vishwas Yojana 2025 : CBDT म्हणजेच केंद्रीय पक्ष कर आयोगाने अधिसूचना जारी केली आणि विवादित कर 31 जानेवारी पर्यंत वाढवला. करदात्यांनी नवीन मुदतीपर्यंत त्यांचे विवाद सोडवू शकले नाही तर त्यांना 1 फेब्रुवारी 2025 किंवा त्यानंतर केलेल्या घोषणांसाठी 110% विवादित कर मागणी भरावी लागेल.
कोणाला होणार या योजनेचा फायदा
Vivad Se Vishwas Yojana विवाद से विश्वास योजनेचा लाभ अशा करदात्यांना होईल ज्यांची तक्रार कर संबंधित विवादित प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आली आहे. ज्या करदात्यांनी 22 जुलै 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा आयकर अपील न्यायाधीकरणात याचिका दाखल केली आहे किंवा कर अधिकाऱ्यांच्या वतीने अपील केले आहे त्यांना या योजनेअंतर्गत कमी रक्कम भरून कर सेटलमेंट चा लाभ मिळेल.
Vivad Se Vishwas Scheme या योजनेमुळे सुमारे 2.7 कोटी प्रत्यक्ष कर मागण्यांचे निराकरण होईल. त्यापैकी एकूण सुमारे 35 लाख कोटी रुपये असेही प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयकर विभागाच्या या योजनेअंतर्गत चार प्रकारचे फॉर्म जारी करण्यात आले आहेत. हे चार प्रकारचे फॉर्म कोणते ते आपण पाहू.
हे आहेत चार फॉर्म
Vivad Se Vishwas Yojana
फॉर्म 1 :- यामध्ये तुम्ही डिक्लेरेशन फाईल आणि हमीपत्र द्याल.
फॉर्म 2 :- हे प्राधिकरणाने जारी केलेल्या प्रमाणपत्रासाठी असेल.
फॉर्म 3 :- या फॉर्म अंतर्गत पेमेंट ची माहिती घोषित कर्त्याद्वारे दिली जाईल.
फॉर्म 4 :- कर थकबाकीच्या पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट ची माहिती प्राधिकरणाद्वारे दिली जाईल.
फॉर्म एक आणि तीन अत्यंत महत्त्वाचे
Vivad Se Vishwas Yojana विवाद से विश्वास सरकारी योजनेत आयकराशी संबंधित प्रत्येक वादासाठी फॉर्म एक हा स्वतंत्रपणे भरावा लागतो. फॉर्म तीन मध्ये पेमेंट ची माहिती द्यावी लागते. यामध्ये तुम्हाला अपील, हरकती, अर्ज, रिट याचिका किंवा दावा मागे घेतल्याचा पुरावा प्राधिकरणाकडे सादर करावा लागेल. फॉर्म एक आणि तीन करदात्यांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सबमिट केले जाऊ शकतात. हे फॉर्म आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टल वर देखील उपलब्ध आहेत.