जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ
केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजने पासून ते उज्वला सारख्या सहा प्रमुख योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना आणि व्यवसाय करणाऱ्यासाठी थेट आर्थिक लाभ मिळत आहे. यामुळे देशाचा विकास वेगाने होत आहे.
India Government Schemes केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांसाठी विविध जनकल्याण योजना सुरू केलेल्या आहेत. याचा लाभ सामान्य नागरिकांसोबतच व्यवसाय उद्योग करणाऱ्या नागरिकांना होत आहे. बँकिंग ते मॅन्युफॅक्चरिंग आणि गुंतवणूक पर्यंत या योजनांनी देशाची दिशा आणि दशा दोन्हीही बदलण्याचे काम केले आहे.
Central Government Schemes यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना, उत्पादनाशी संबंधित पीएलआय योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि उज्वला योजना या महत्त्वाच्या सहा योजनांचा समावेश आहे. याची विस्तृत माहिती आपण खाली पाहणार आहोत.
प्रधानमंत्री जनधन योजना
Jan Dhan Account केंद्र सरकारने 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरीब कुटुंबांना बँक सिस्टीमशी जोडणे हा होता. या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स खाते, विमा, पेन्शन आणि DBT Scheme डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या सुविधा देण्यात आल्या. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यावधी लोकांनी पहिल्यांदाच बँकेत आपले खाते उघडले. यामुळे सरकारी सबसिडी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला.
मेक इन इंडिया
Latest Government Scheme मेक इन इंडिया योजनेअंतर्गत सरकारने देशाला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याचे लक्ष ठेवले. या योजनेअंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक आणि कौशल्य विकास यावर जोर देण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षण करणे आणि व्यवसाय नियम सोपे करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या. यामुळे देशाचे उत्पन्न वाढले.
प्रधानमंत्री मुद्रा योजना
PM Mudra केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत छोटे व्यवसायिकांना विना ग्यारंटी लाखो रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत कोट्यावधी कर्ज मंजूर करण्यात आले आहे आणि एकूण रक्कम कोट्यावधी रुपयापर्यंत पोहोचली आहे. या योजनेमुळे स्टार्टअप आणि छोट्या उद्योग करणाऱ्यांसाठी मोठा लाभ झाला आहे.
उत्पादनाशी संबंधित पीएलआय योजना
सरकारने पीएलआय म्हणजेच प्रोडक्शन लिंक इन सेटिंग योजना देशातील मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवण्यासाठी सुरू केली. यामध्ये जवळपास 1.97 लाख कोटी रुपये प्रोत्साहन पॅकेजचा समावेश आहे. ही योजना 14 सेक्टर पर्यंत पसरली आहे आणि शेकडो कंपन्यांनी याचा लाभ घेतला आहे. मोबाईल, ऑटो, फार्मा आणि टेक्सटाइल सारख्या क्षेत्रांमध्ये उत्पादन वेगाने वाढले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
PM Kisan Yojana अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला वर्षाला 6 हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये म्हणजेच दोन -दोन हजार रुपये करून जमा केली जाते. PM Kisan जर तुम्हीही शेतकरी असाल तर पीएम किसान पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या कृषी विभाग किंवा सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा लाभ देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना होत आहे.
उज्ज्वला योजना
Ujjwala Scheme केंद्र सरकारने 2016 मध्ये उज्ज्वला योजना अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले आहे. आतापर्यंत देशातील 10 कोटी पेक्षा अधिक कनेक्शन या योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत सबसिडी वर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे. यामुळे ग्रामीण कुटुंबांना स्वच्छ इंधन आणि चांगले जीवन मिळत आहे. त्यांची घातक धुरापासून सुटका झाली आहे. त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.
Government Scheme News केंद्र सरकारने या योजनांमध्ये केलेली गुंतवणूक केवळ आकडेवारी म्हणून राहिली नाही तर याचा परिणाम जमिनीस स्तरावर दिसत आहे. बँकेचे क्षेत्र वाढले आहे, उद्योगांना गती मिळाली आहे. टेक्नॉलॉजी मध्ये भारत मजबूत झाला आहे आणि गरिबांना थेट लाभ मिळत आहे.