ZP Election Voting 7 February Information In Marathi : सुट्टी असूनही मिळणार पगार
ZP Election Voting 7 February : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान आहे. या निवडणुकीसाठी राज्य सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. म्हणजेच त्या दिवशी सुट्टी जरी असली तरीही त्या दिवसाचा पगार कटणार नाही तुम्हाला त्या दिवशीचा पगार मिळणार आहे.
Maharashtra Government जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी 7 फेब्रुवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांना या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे असे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार आणि कर्म विभागाने जारी केले आहे.
Maharashtra Zilla Parishad elections निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी तसेच कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या मतदारांना ही निवडणुकीच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे. 7 फेब्रुवारीला सुट्टी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू असेल.
यामध्ये खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने आणि इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान, कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल, रिटेलर्स या सर्वांना सरकारचे आदेश लागू राहणार आहेत. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुट्टी द्यावी लागेल. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी असेल हे आपण आज पाहणार आहोत.
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये असेल सार्वजनिक सुट्टी
Maharashtra Zilla Parishad elections
रायगड – पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेन, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसाळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर
रत्नागिरी – मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर
सिंधुदुर्ग – वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग
पुणे – जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर
सातारा – खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड
सांगली – आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज
सोलापूर – करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट
कोल्हापूर – शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड
छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण
परभणी – जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड
धाराशिव – परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, लोहारा, उमरगा
लातूर – अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेनापुर, लातूर, शिरूर (अनंतपाळ) देवणी, औसा, निलंगा