Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी

Ladki Bahin Yojana Update News In Marathi : 3 महिन्यांचा हप्ता एकत्र मिळणार

Ladki Bahin Yojana January Installment May Delay : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून चर्चेचा विषय बनली आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा ई-केवायसी च्या प्रक्रियेमुळे थकलेला 3 महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. म्हणजे आता बहिणींच्या खात्यात एकदम 4500 रुपये जमा होणार आहेत.

Ladki Bahin Yojana Update News राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडक्या बहिण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातात. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नाही.

Ladki Bahin Yojana ई-केवायसी च्या अडचणीमुळे तो जमा न झाल्यामुळे आता एकत्र तीन महिन्याचा हप्ता म्हणजे 4500 लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्याने अनेक हप्ते थांबले होते.

काही महिलांनी पैसे जमा न झाल्याने थेट संबंधितांकडे जाऊन आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला तर काही महिलांनी आंदोलन देखील केले. याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश संबंधित महिलांना दिले होते.

नियम व अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी आहे.

Ladki Bahin Yojana राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. आता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये 4500 जमा होणार आहेत. काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत.

ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकले होते त्यांना एकत्रित 4500 मिळणार आहेत, तर ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

कधी मिळणार 2100 रुपये

Ladki Bahin Yojana January Installment May Delay

निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संबंधित मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत.

हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये थेट 2100 रुपये जमा केले जाणार आहेत अशी माहिती सरकारने दिली.