Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi : आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना 31 मार्चपर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी

Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी e-KYC केली मात्र त्यांचा येणारा हप्ता बंद झाला. मात्र आता राज्य सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा e-KYC प्रक्रियेमध्ये चूक झाली असल्यास दुरुस्त करण्याची संधी दिली आहे.
त्यामुळे 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना केवायसी प्रक्रियेत झालेली चूक दुरुस्त करता येणार आहे. यासाठी पोर्टल सुरू झाले आहे. तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही प्रक्रिया करू शकता.
Ladki Bahin Yojana राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.
Ladki Bahin Yojana e-KYC यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली होती, मात्र e-KYC करत असताना अनेक महिलांचे प्रश्न चे उत्तर चुकले आणि त्यांचा लाभ बंद झाला. पात्र असूनही त्यांचा लाभ बंद झाला होता त्यामुळे राज्य सरकारने आता पुढाकार घेत पुन्हा एकदा ई-केवायसी दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणींना संधी दिली आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत सर्व लाडक्या बहिणी आपली केवायसी तील दुरुस्ती करू शकतील
e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती.
e-KYC दुरुस्तीची संधी
Ladki Bahin Yojana e-KYC Process
Mukhyamantri Ladki Bahin Yojana राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख दिली होती. e-KYC करत असताना ज्या महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते अशाच महिलांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची संधी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
ही ई-केवायसी करत असताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थींच्या “कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहे का?” याबाबत पर्याय निवडताना महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला होता. अशी माहिती समोर आली.
त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेत आता अशा महिलांसाठी ई-केवायसी सुधारण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यामुळे आता ई-केवायसी प्रक्रिया करताना चुकीचा पर्याय निवडणाऱ्या महिलांना सुधारणा करण्याची एक संधी मिळाली आहे. ही सुधारणा लाडक्या बहिणींना 31 मार्च 2026 पर्यंत करता येणार आहे.
हप्ता कधी जमा होणार
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडेही सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच डिसेंबर पासून अनेक महिलांच्या खात्यात त्यांचा हप्ता आलेला नाहीये त्यामुळे अशा महिलांच्या खात्यात एकदम तीन महिन्याची रक्कम येणार का हा ही एक प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी राज्य सरकारने e-KYC दुरुस्ती करण्यासाठी दिलेली संधीचा फायदा घेऊन आपली e-KYC प्रक्रियेतील दुरुस्ती चुका सुधरून घ्याव्या जेणेकरून त्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता कुठल्याही अडचणी शिवाय त्यांच्या खात्यामध्ये जमा होत राहील.
सरकारचे स्पष्ट निर्देश
Ladki Bahin Yojana e-KYC Process In Marathi
माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी बहिणींसाठी ही सुधारणा करण्याची अंतिम संधी असून यानंतर सरकारकडून कुठल्याही प्रकारची मुदत वाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर यासाठी आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आलेले असून अधिक माहितीसाठी लाभार्थी महिलांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला आधार नंबर टाकून तिथे e-KYC करू शकता.
तेथे तुम्हाला 2 प्रश्न विचारले असतील. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी करत असेल किंवा सेवानिवृत्त असेल तर प्रश्नाचे उत्तर “हो” म्हणावे अन्यथा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन घेत नसेल तर दोन्ही प्रश्नांची उत्तर ‘नाही’ असे द्यावे.
आपला लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत e-KYC मधील ही सुधारणा करून घ्यावी अशी आव्हान अदिती तटकरे यांनी केले आहे.
अशी करा ई-केवायसी
Ladki Bahin Yojana e-KYC Process Step By Step

Ladki Bahin Yojana e-KYC Process सर्वात प्रथम तुम्ही लाडक्या बहिणीच्या अधिकृत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
तिथे गेल्यानंतर तुम्हाला e-KYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यास आहे ज्यांच्याकडून e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आले होते असे लिहिलेले असेल त्यावर तुम्ही क्लिक करा.
यानंतर तुमच्यासमोर e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक विचारलेला असेल तिथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाका. त्याबरोबरच खाली कॅपचा विचारला असेल त्या कॅपच्या टाका.
तसेच आधार प्रमाणे करण्यासाठी संमती असा प्रश्न खाली विचारला आहे त्यामध्ये ‘मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओटीपी माहिती प्रदान करण्यास संमती देण्यात माझी हरकत नसेल, मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकता”
- मी सहमत आहे 2. मी सहमत नाही
असा प्रश्न असेल त्यावर तुम्ही ‘मी सहमत आहे’ हा पर्याय निवडा आणि OTP साठी पाठवा.
त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तिथे टाका आणि पुढे जा.

त्यानंतर तुमच्यासमोर e-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय दिसेल त्यामध्ये तुम्हाला दोन प्रश्न विचारले आहेत ते खालील प्रमाणे
A. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम / मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत..
1. आहे 2. नाही
असा प्रश्न असेल याचे उत्तर असेल ‘नाही’ तुमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या संस्थेमध्ये कार्यरत नाही नोकरीला नाही त्यामुळे तुम्ही नाही यावर क्लिक करा.
B. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी /विभाग /उपक्रम /मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत…
1. आहे 2. नाही
असा प्रश्न असेल याचे उत्तर ही ‘नाही’ असेच द्यायचे आहे. याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती राज्य सरकार किंवा केंद्र सरकारची सेवानिवृत्ती वेतन घेत नाही.

यानंतर तुमच्यासमोर एक अजून एक प्रश्न असेल-
वरील A आणि B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. या वर तुम्ही क्लिक करायचे आहे यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करा.
तुम्ही सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेस “तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे”. असा तुमच्या स्क्रीनवर मेसेज दिसेल. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता.