Mukhyamantri Mahila Rojgar Yojana In Marathi : सरकारी योजनेचा असा घ्या लाभ
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana In Marathi : मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही बिहारच्या सरकारने सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. महिला रोजगार योजना अंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो. पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि या आर्थिक मदतीचा लाभ घेऊ स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana विविध राज्यांमधील सरकार महिलांसाठी विविध योजना राबवत असतात. यामध्ये विविध प्रकारची आर्थिक मदत सरकारमार्फत दिली जाते. नुकतीच बिहार सरकारने महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना रोजगार प्रदान करते.
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana women will get 10 thousand rupees या योजनेला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना असे नाव देण्यात आले आहे. जी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 10000 रुपये जमा केले जातात. त्यामुळे त्यांना लघुउद्योग सुरू करता येतो.
Bihar Government या योजनेचा मोठ्या संख्येने महिलांना अधिक फायदा झाला आहे आणि अनेक जण स्वतंत्र झाल्या आहेत. या योजनेचे अनेक हप्ते जमा करण्यात आले आहेत आणि पुढील हप्ता देखील नियोजित तारखेला भरण्याची वेळ आली आहे, जर तुम्ही बिहारचे नागरिक असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. Utility News
Mahila Rojgar Yojana महिलांना स्वयं रोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बिहार सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये 18 प्रकारचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. 10000 रुपयांचा पहिला हप्ता थेट बँक खात्यामध्ये पाठवला जातो.
जर एखाद्या महिलेने किमान 6 महिने तिचे काम सुरू ठेवले तर तिला जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत देखील या योजनेअंतर्गत मिळते. ही योजना जीविका गटाद्वारे अर्ज केलेल्या आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना ही रक्कम पुन्हा मिळत नाही. या योजनेचा कसा अर्ज कसा करावा हे आपण आज बघू.
असा करा अर्ज
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Apply
Mukhyamantri Mahila Rojgar Yojana मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. जेणेकरून अधिक महिला या योजनेचा भाग बनू शकतील.
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला या योजनेच्या जीविका वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खात्याची संपूर्ण अचूक माहिती, त्याचबरोबर तुम्ही सुरु करत असलेल्या व्यवसायाची माहिती अचूकपणे भरावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे येथे अपलोड करावी लागते जसे की, तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही, लागू असल्यास तुम्ही जात किंवा अपंगत्व प्रमाणपत्र देखील प्रदान करणे आवश्यक आहे.
तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर योजनेचा निधी थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.