IRCTC Has Launched a New Feature In Marathi : IRCTC ने सुरू केले नवीन फिचर

IRCTC Has Launched a New Feature In Marathi : तिकीट बुकिंग फेल झाल्यावर पैशाचे नुकसान होणार नाही

IRCTC Has Launched a New Feature : IRCTC ने प्रवाशांची सर्वात मोठी गैरसोय दूर करण्यासाठी नवीन Resume / Retry Booking फीचर्स सुरू केले आहे. जर टिकीट बुक करताना फेल झाले तर पैसे कटतात तर आता त्याच अमाऊंट मध्ये तुम्ही पुन्हा दुसरे टिकीट बुक करू शकणार आहात.

IRCTC New Feature रेल्वे तिकीट बुक करत असताना अनेकदा प्रवाशांची सर्वात मोठी गैरसोयीचा सामना करावा लागतो. तो म्हणजे बँक अकाउंटमधील पैसे कट होतात मात्र टिकीट कन्फर्म होत नाही, अशा परिस्थितीमध्ये केवळ वेळच जात नाही तर प्रवाशांना रिफंड साठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. या समस्याला सोडवण्यासाठी आयआरसीटीसीने आपल्या अँप वर नवीन Resume / Retry Booking नावाने फीचर सुरू केले आहे.

IRCTC New Feature या नवीन फीचरच्या मदतीने जर टिकीट बुकिंग करताना फेल झाले तर आणि पैसे तुमचे कट झाले असतील तर प्रवासी त्याचदिवशी त्याच अमाऊंटचा वापर करून पुन्हा तिकीट बुक करू शकतील म्हणजे आता पैसे अडकण्याचे किंवा रिफंडसाठी प्रतीक्षा करण्याची चिंता राहणार नाही.

ही सुविधा 10 फेब्रुवारी 2026 पासून लागू झाली आहे आणि लाखो प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

IRCTC New Feature आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, आता बँकेकडून पेमेंट रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळत नसेल तर तिकीट बुकिंग फेल होते. यापूर्वी अशा स्थितीमध्ये पैसे ब्लॉक होत होते आणि प्रवाशांना रिफंड साठी मोठी प्रतीक्षा करावी लागत होती.

मात्र आता नवीन फीचर मुळे याचा पैशांचा वापर करून प्रवासी पुढील टिकीट बुक करू शकणार आहे. मात्र ही सुविधा त्यावेळेसच काम करेल जेव्हा दुसरी बुकिंग अमाऊंट पहिल्या यशस्वी ट्रांजेक्शन बरोबर असेल म्हणजे त्या तिकीटचा दर तेवढाच असणे आवश्यक आहे.