LPG Cylinder New Rules In Marathi : आता गॅस बुकिंगसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा

LPG Cylinder New Rules In Marathi : केंद्राचे 5 मोठे निर्णय

LPG Cylinder New Rules In Marathi : भारतात एलपीजी गॅस सिलेंडर संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा फटका आता थेट भारतीय गृहिणींना बसत आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आणि बुकिंगच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहे.

LPG Cylinder News मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयातीवर परिणाम होत असल्याने ऊर्जा संसाधनांचा समतोल वापर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे सरकारने सांगितले. 7 मार्च रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 7 टक्क्यांनी वाढ केली आहे.

LPG Cylinder New Rules या दरवाढीनंतर 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत आता 965 रुपये झाली आहे. मागील एक वर्षापासून गॅस सिलेंडर मध्ये कोणतेही बदल झाले नव्हते ही स्थिरता आता मोडली आहे. त्यामुळे मध्यमवर्गयांचे बजेट कोलमडले आहे.

उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र 300 रुपयांची सबसिडी थेट बँक खात्यात मिळत असल्याने त्यांना हा सिलेंडर 550 रुपयांना पडत आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अतीमागास प्रवर्ग आणि अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. बुकिंग मध्ये तुम्हाला किती दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार हे आपण पाहू.

बुकिंग मध्ये आता प्रतीक्षा करावी लागणार

LPG Cylinder New Rules

  • सरकारने गॅस रिफील बुकिंग च्या नियमात बदल केला आहे. आता एक सिलेंडर नंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी एका ठराविक कालावधीची मर्यादा लागू करण्यात आली आहे.
  • ग्रामीण भागात दोन सिलेंडर मधील अंतराचे मर्यादा 25 दिवसांवर होती ती वाढवून आता 45 दिवस करण्यात आली आहे.
  • शहरांमध्ये हा गॅप अजूनही 25 दिवस इतकाच आहे.
  • एका कुटुंबाला वर्षासाठी 15 सिलेंडर बुक करता येतील. ज्यापैकी 12 सबसिडीवर असतील.
  • घरात जास्तीत जास्त 2 सिलेंडर तुम्हाला ठेवता येतील.

PNG कनेक्शन असल्यास सिलेंडर बाळगण्यास बंदी

LPG Cylinder News

  • ज्या नागरिकांच्या घरामध्ये गॅस कनेक्शन पाईपने आहे म्हणजेच पीएनजीचे कनेक्शन पोहोचले आहे त्यांच्यासाठी देखील नियम लावण्यात आले आहेत. अशा ग्राहकांना आता घरगुती सिलेंडर ठेवता येणार नाही.
  • गॅस कंपन्यांना अशा ग्राहकांना नवीन कनेक्शन किंवा रिफील न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • ज्यांच्याकडे दोन्ही सुविधा आहेत त्यांनी स्वतःहून आपले एलपीजी कनेक्शन परत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.