BHIM App New Feature for UPI Payment : पिन न टाकता ऑनलाइन पेमेंट करता येणार
BHIM App New Feature for UPI Payment : सध्या देशातील प्रत्येक नागरिक ऑनलाईन पेमेंटचा वापर करतात. कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर ऑनलाईन पेमेंट करतात. कमी किमतीची असो किंवा जास्त किमतीची.
आता भीम ॲप मध्ये ऑनलाईन पेमेंट साठी एक नवीन फीचर लॉन्च केले आहे. बायोमेट्रिक फीचर मुळे खूप मोठा फायदा होणार आहे.
BHIM App New Feature आता तुम्ही कोणताही यूपीआय पिन टाकून पेमेंट करू शकता. तुम्हाला फेस किंवा फिंगरप्रिंट लॉक ने पेमेंट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
BHIM App New Feature आता तुमचे ऑनलाईन पेमेंट अगदी सोपे होणार आहे. तुम्हाला फक्त फिंगरप्रिंट द्वारे तुमचे पेमेंट करता येणार आहे. 5000 रुपये पर्यंतचे पेमेंट करण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत. यासाठी फक्त फिंगरप्रिंट किंवा फेसलॉक चा वापर करता येईल आणि अनेक नागरिक आपला पिन विसरतात त्यामुळे पेमेंट फेल होते. त्यासोबतच तुम्ही जास्त वेळा चुकीचा पिन टाकला तर अनेक अडचणी तुम्हाला येतात. त्यामुळे ही सुविधा फायदेशीर आहे.
त्याचबरोबर आपण पिन टाकताना आपल्या बाजूचा व्यक्ती ते पाहतो त्यामुळे देखील आपल्याला धोका संभवतो. या सर्व कारणांचा विचार करून ह्या ॲप मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत.
BHIM ॲपचे हे फीचर अँड्रॉइड आणि ios दोन्ही डिव्हाईस वर काम करते. त्यावर तुम्हाला फिंगरप्रिंट आणि फेस रिकग्निशन सुविधा मिळणार आहे. हे फीचर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगले फिचर आहे. यामुळे तुमच्या सोबत फ्रॉड होण्याची शक्यता कमी असते.
कसं वापराल हे फीचर
UPI Payment
UPI Payment तुम्हाला सर्वप्रथम BHIM ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतर प्रोफाइल मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला बँक अकाउंट निवडून बायोमेट्रिक ट्रांजेक्शन चा पर्याय ऑन करावा लागेल. त्यानंतर तुम्ही फिंगरप्रिंट द्वारे पेमेंट करू शकता.