Ayushman Card Registration Process In Marathi : घरबसल्या बनवता येणार गोल्डन कार्ड
Ayushman Card Registration Process : केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. त्यापैकीच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत योजना. या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना होतो. जेष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतात. राज्यात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या उपचारासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मदत होते. या योजनेमधून लाखो रुपयांपर्यंतचे मोफत उपचार नागरिकांना घेता येतात.
Ayushman Bharat Yojana आयुष्मान भारत योजनेत 70 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळतात. तुम्हाला यासाठी सतत कार्यालयात जाण्याची गरज नाही. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्मान कार्ड आहे त्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येतो.
70 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड मिळते. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा मिळते. दरम्यान आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी घरबसल्या अवघ्या काही मिनिटात आयुष्यमान कार्ड बनवू शकता. आता हे कार्ड कसं बनवायचं हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
घरबसल्या बनवा आयुष्मान कार्ड
Ayushman Card Registration Process
- ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम लाभार्थ्यांना beneficiary.nha.gov.in या पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान ॲपवर जावे लागेल. त्यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
- लॉगिन केल्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि स्वतःची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या नावावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमची केवायसी करावी लागेल.
- त्यानंतर मोबाईलच्या कॅमेरातून लाईव्ह फोटो काढून अपलोड करावा लागेल.
- त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म द्यायचा आहे. त्यानंतर डिजिटल आयुष्मान कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवावी लागेल.
अशा अगदी सोप्या पद्धतीने घर बसल्या तुम्ही आयुष्मान कार्ड बनवू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही किंवा रांगेत उभा राहण्याची आवश्यकता नाही.