जगात कुठे मिळते सर्वात स्वस्त पेट्रोल
libyas 2 petrol why its cheaper than a biscuit packe : जगभरातील पेट्रोल डीझेलच्या किमतीत होणारे चढ-उतारा दरम्यान लिबियामध्ये पेट्रोल केवळ २.१७ रूपये प्रति लिटर मिळत आहे, जे एक बिस्टिकच्या पुड्यापेक्षाही स्वप्त आहे. हे सर्व लिबिया सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे शक्य आहे. मात्र भारत तेल आयात करतो त्यामुळे पेट्रोल दर अधिक आहेत.
फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे जगभरात पेट्रोल डीझेलच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र ऐवढे असतानाही प्रत्येक देशात पेट्रोल डीझेलच्या किमती वेगवेगळ्या दिसून येत आहेत.
पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर २९९.५० पाकिस्तानी रूपये प्रति लिटर आहे. तर भारतात पेट्रोलची किमत १०२.१२ ते ११४ रूपये दरम्यान आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला, की जगात पेट्रोलचे दर कुठे स्वस्त आहेत. तसे पाहिले तर जेथे पेट्रोल सर्वाधिक असते तेथे दर कमी असायला हवा, जसे की इराण किंवा व्हेनेझुएला, मात्र असे नाही. या देशातही पेट्रोलचे दर कमी नाहीत. मात्र लिबीयामध्ये पाच रूपयाच्या बिस्टिक पुड्याच्या बदल्यात तब्बल २ लिटर पेट्रोल मिळत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरे आहे.
कुठे आहे पेट्रोलचे भंडार?
सर्वाधिक कच्च्या तेलाच्या भंडारामध्ये व्हेनेझुएलाकडे ३०३ बिलियन बॅरल तेलाचे भंडार आहे. सउदी अरब जवळ २६७ बिलियन बॅरल तेलाचे भंडार आणि या यादीत तिसऱ्या नंबरवर इराण आहे. त्याच्याकडे २०८ बिलियन बॅरल तेल भंडार उपलब्ध आहे. मात्र यातील एकाही देशात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळत नाही.
तर कुठे मिळत आहे सर्वात स्वस्त पेट्रोल?
सध्या जगात सर्वाधिक स्वस्त पेट्रोल लिबियामध्ये मिळत आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किमत केवळ ०.०२३ अमेरिकन डॉलर आहे. ती भारतीय रूपयात पाहिले तर केवळ २.१७ रूपये प्रति लिटर होते. म्हणजे एका बिस्टिकच्या पुड्यापेक्षाही स्वस्त आहे.
विशेष बाब म्हणजे तेल भंडार असल्यामध्ये लिबिया जगात १० क्रमांकावर आहे. त्यांच्याकडे केवळ ४८.४ बिलियन बॅरल कच्चे तेल उपलब्ध आहे. तरही सर्वाला मागे टाकत हा देश स्वस्त पेट्रोल दरामध्ये पहिल्या नंबरवर आहे.
लिबियात का मिळत आहे स्वस्त पेट्रोल?
लिबियाची लोकसंख्या ७५ लाख आहे आणि या देशातील लोक संख्येतील अधिक लोक गरीबीरेषेच्या खाली आहेत. त्यामुळे येथील सरकार अनेक वर्षांपासून इंधनावर मोठी सब्सिडी देत आले आहे. येथील सरकारची पॉलिसी, सब्सिडी, रिफायनरीचा खर्च आणि ट्रांसपोर्टेशनचा खर्च आणि करंसी खूप वेगळी आहे, यामुळे लिबीया, व्हेनेझुएला आणि इराणच्या पुढे आहे.
भारतातील स्थिती?
भारत आपल्या आवश्यकतेच्या ८२ ते ८५ टक्के इंधन बाहेरून आयात करतो. त्यामुळे भारतात याची किमती अधिक आहे. सध्या भारतात पेट्रोलचे दर १०२ ते ११४ रूपये प्रति लीटर दरम्यान आहेत. तर डीझेल ९५.४४ ते ९९.८२ रूपये प्रति लिटर प्रमाणे मिळत आहे.