July 1 Rule Change : रेल्वे तिकिटापासून LPG पर्यंत होणार बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम
Big Financial Changes From July 1 in marathi : नमस्कार वाचकहो, येणाऱ्या जुलै महिन्यात अनेक बदल होणार आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वेच्या तिकिटा पासून ते एलपीजी गॅस सिलेंडर पर्यंत बदल होणार आहेत.
नोकरी करणारे कर्मचारी, पेन्शन धारक, करदाते आणि बँकांच्या ग्राहकांपर्यंत अधिक नागरिकांना हा बदल जाणून घ्यावा लागेल. कारण या नियमामुळे तुमच्या खर्चावर परिणाम होऊ शकतात. यातले काही नियम हे बँकिंग आणि आर्थिक योजनांशी संबंधित असणार आहेत चला तर मग जाणून घेऊ हे 7 नियम कोणते असतील.
आधार कार्ड ई-मेल अपडेट
aadhar card new rules : 1 जुलै 2026 ते डिसेंबर 2026 दरम्यान आधार मोबाईल ॲपच्या मदतीने ईमेल आयडी अपडेट केल्याने 75 रुपयांचे शुल्क आकारले जाणार नाही. USDAID नागरिकांना आधार कार्ड ची माहिती अपडेट करण्याची सवलत दिली आहे.
रेल्वेने विना तिकीट प्रवास केल्यास बसणार दंड
Indian Railway new rule : विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवरचा दंड 250 रुपये होता तो आता दुप्पट करण्यात येणार आहे. 1 जुलैपासून तुम्हाला हा दंड 500 रुपये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या तिकिटावर प्रवास महिलांच्या राखीव डब्यात प्रवेश आणि रेल्वेत गैरवर्तन करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाऊ शकते.
एफडीच्या व्याजदर आणि नियमांमध्ये बदल
FD Interest rates new rules : जुलैपासून काही बँका मुदत ठेवींवरील म्हणजेच एफडी वरील व्याजाच्या दरात आणि संबंधित नियमांमध्ये बदल करू शकतात. नवीन गुंतवणूक किंवा एफडी रिन्यूअल करण्यापूर्वी ग्राहकांनी नवीन दर तपासणे कायदेशीर ठरेल.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
LPG Cylinder new rules : आंतरराष्ट्रीय बाजारातल्या परिस्थितीवर अवलंबून जुलै महिन्याचा एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात. यापूर्वीही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती.
एसबीआय क्रेडिट कार्ड रिवॉर्डचे नियम बदलणार
SBI Credit Card : PhonePe SBI Credit Card PURPLE आणि SELECT BLACK कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट कमावण्याची मर्यादा लागू होणार आहे. काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नसल्यामुळे ग्राहकांनी नवीन नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
पेट्रोल डिझेलचे दर बदलणार
Petrol-Diesel new rules : कच्च्या तेलाच्या जागतिक किमती मधल्या चढ-उतारामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आढावा घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नवीन महिन्याच्या सुरुवातीला इंधन दरांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ATF इंधन शुल्कात बदल
ATF Fuel Charges new rules : एव्हिएशन टर्बाईन फ्युल ATF आणि डिझेल निर्यातीवरील शुल्कात वाढत गेल्यानंतर सरकार पुन्हा दरांचा आढावा घेऊ शकते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातल्या स्थितीनुसार जुलैमध्ये ATF च्या किमतीत बदल होऊ शकतो.