Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?

Meri Panchayat App Download : गावकऱ्यांना मिळणार ग्रामपंचायतची संपूर्ण माहिती, एका क्लिकवर

Meri Panchayat App : गावातील नागरिकांना आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावासाठी किती बजेट आले आहे आणि कुठली कामे सुरू आहेत, याची माहिती मिळण्यासाठी आता केंद्र सरकारने मेरी पंचायत ॲप आणले आहे. या ॲपच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या सर्व कामांची माहिती आणि योजनांची माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहे.

हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून ही संपूर्ण माहिती मिळू शकतात. ते इंस्टॉल कसे करायचे? त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तसेच या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कुठली-कुठली माहिती मिळू शकते हेही आपण पाहणार आहोत. नागरिकांना बजेटपासून विकास कामे आणि सभांची संपूर्ण माहिती..

मेरी पंचायत ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. शेतकरी आणि गावातील नागरिक ग्रामसभा मधील सरकारी योजनासाठीचे बजेट आणि सभा संदर्भात माहिती मिळू शकतात. चला जाणून घेऊया तुम्ही हे ॲप कसे डाऊनलोड करू शकता आणि याद्वारे कुठली कामे पूर्ण करू शकता.

देशभरातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून विविध योजना चालवत असते. अनेक नागरिकांना वाटते की आपल्या गावात कोणत्या सरकारी योजना सुरू आहेत याची माहिती आपल्याला मिळावी हवी. विकासाची कामे कुठली सुरू आहेत आणि किती काम पूर्ण झाली आहेत. नागरिक या सर्व प्रश्नांचे उत्तर आणि अन्य माहिती मेरी पंचायत ॲपच्या माध्यमातून आपल्या मोबाईलवर प्राप्त करू शकतात. बस… यासाठी केवळ तुम्हाला मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपच्या माध्यमातून ग्रामपंचायत साठी आलेले बजेट पासून झालेला खर्च आणि कुठल्या कामावर किती खर्च झाला आहे. कुठे किती गुंतवणूक आहे. तसेच ग्रामपंचायतचे पुढील नियोजन काय आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे.

मेरी पंचायत ॲप म्हणजे काय?

गावातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या ग्रामपंचायत मध्ये कुठली कामे सुरू आहेत आणि कुठले विकास कामे करण्यात येत आहेत. याची माहिती पाहिजे असेल तर सतत ग्रामपंचायत मध्ये जाऊन प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. आता मेरी पंचायत ॲपच्या माध्यमातून घरी बसल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे. तुमच्या ग्रामपंचायतीला किती पैसा? कुठल्या कामासाठी मिळाला आहे आणि त्याचा खर्च कुठे कुठे करण्यात आला आहे. त्या सर्व गोष्टीची माहिती या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे.

मेरी पंचायत ॲप कसे डाऊनलोड करावे?

Gram Panchayat Information App : मेरी पंचायत ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर किंवा एप्पल प्ले स्टोअरवर जा. तिथे सर्च करा मेरी पंचायत ॲप, त्यानंतर अधिकृत ॲप निवडा आणि त्याला इन्स्टॉल करा.
ॲप डाऊनलोड झाल्यानंतर आवश्यक परवानगी द्या. जेणेकरून तुमचा ॲक्सेस मिळेल. यानंतर संपूर्ण ऑथोरायझेशन प्रक्रिया पूर्ण करा.

मेरी पंचायत ॲप रजिस्ट्रेशन

Meri Panchayat App Registration : ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. जर तुम्ही नवीन युजर्स असाल तर साइन अप या बटनावर क्लिक करा आणि तुमचे नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख अशी मागितलेली संपूर्ण माहिती रजिस्टर प्रक्रिया पूर्ण करा. आणि जर तुम्ही जुनेच युजर्स असाल तर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल, व्हेरिफिकेशन करा. केल्यानंतर चार अंकी पिन नंबर सेट करावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची भाषा निवडू शकता. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लोकेशन निवडा. त्यानंतर राज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही संपूर्ण माहिती नोंदवा.

विचारलेली संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेट माय ग्रामपंचायत या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 त्यानंतर तुमची ग्रामपंचायत संबंधित संपूर्ण माहिती जसे की आर्थिक बजेट, टेंडर, फंड मॅनेजमेंट, चालू असलेली विकास कामे, चालू असलेला सरकारी योजनांची माहिती तुम्हाला एका क्लिकवर तुमच्या मोबाईल ॲप वर उपलब्ध असेल.

Read About : PM Kaushal Vikas Yojana 2024 in Marathi : बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी

website : yojanamazi.com