Devendra Fadnavis On Drought In Maharashtra : फडणवीसांचा निर्णय, दिवाळी आधी शेतकऱ्यांना मिळणार 5000 रुपये

Devendra Fadnavis On Drought In Maharashtra : राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर

Devendra Fadnavis On Drought In Maharashtra : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता राज्यात एकूण 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र सध्या दुष्काळ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 ऑक्टोंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत दिवाळी आधी 5000 रुपये शेतकऱ्यांना ऍडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Devendra Fadnavis On Drought In Maharashtra In Marathi : दुष्काळ नोव्हेंबर शेवटी जाहीर होतो परंतु परिस्थिती बघता आपण ऍडव्हान्स मध्ये दुष्काळ जाहीर केला आणि दुष्काळाबाबत जीआर ऑक्टोंबर महिन्यात काढला असे Devendra Fadnavis फडणवीस म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, आम्हाला कल्पना आहे दिवाळी येत आहे, दिवाळी अडचणीची आहे, दुष्काळांची कार्यप्रणाली दिवाळी आधी पूर्ण होणे कठीण आहे, दिवाळी आधी सर्व काम होऊ शकत नाहीत, मात्र एकूणच सगळ्या गोष्टी विचारात घेता आज मंत्रिमंडळाशी चर्चा केली आणि दिवाळी आधी 5000 रुपये शेतकऱ्यांना अग्रीम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. सुमारे एक ते सव्वा कोटी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. ही अग्रीम मदत सुमारे 6000 कोटी रुपयांची असणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर

राज्यात आणखी 40 तालुक्यात Drought In Maharashtra दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आता एकूण 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. दुष्काळग्रस्त तालुक्यात 12 सवलती मिळत राहतील. कर्जमाफीचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. मराठवाड्यातील पाणी पातळी 3 मीटर पेक्षा खाली गेली आहे. मराठवाड्यात हवे तेवढे टँकर देण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. तसेच 16000 बेकायदा कनेक्शन आम्ही तोडली आहेत. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यास प्राधान्य आहे असे फडणवीस म्हणाले. Drought In Maharashtra

दुष्काळ निवारण्यासाठी घेतलेले राज्य सरकारचे निर्णय

Maharashtra Goverment Decision For Farmers

  • राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर.
  • आतापर्यंत एकूण तीनशे पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला.
  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये येणार.
  • मराठवाड्यात पाणी पातळी 3 मीटरने खालवली असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर वाढवणार.
  • 16000 अनधिकृत कनेक्शन कापले.
  • शैक्षणिक फी माफीच्या जीआर मधून अटी शर्ती हटवल्या गेल्या आहेत.
  • वीज बिलांसाठी कोणताही तकादा नाही अतिउत्साह दाखवल्यास कारवाई करण्यात येईल.
  • कर्ज वसुलीसाठी बँकांनी अतिउत्साह दाखवू नये, खाजगी बँका, मायक्रो फायनान्स कंपन्यांशी चर्चा करणार.
  • शेतकऱ्यांनी चारा किंवा चारा लागवड पीक घ्यावीत, राज्य सरकार तो विकत घेणार.

दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यामधील शेतकऱ्यांना मिळणार १२ सवलती

Maharashtra Goverment Decision For Farmers

  1. जमीन महसुलात सूट: जमीन महसूल भरण्याबाबत सवलत.
  2. पीक कर्जाचे पुनर्गठन: पीक कर्जाच्या परतफेडीचे पुनर्नियोजन.
  3. शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती: लागू नियमांनुसार कर्जवसुलीबाबत दिलासा.
  4. कृषी पंपांच्या वीजबिलात सवलत: शासनाच्या लागू निर्णयांनुसार वीजबिलाबाबत मदत.
  5. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी: पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत.
  6. मनरेगा कामांच्या निकषांत शिथिलता: आवश्यकतेनुसार अधिक कामे सुरू करण्याची सुविधा.
  7. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर: पाणीटंचाई असलेल्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा.
  8. शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याबाबत सवलत: लागू शासन निर्णयानुसार दिलासा.
  9. अन्नधान्याची उपलब्धता: शेतकरी आणि शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था.
  10. जनावरांसाठी चारा: पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन.
  11. जलसंधारणाची कामे: पाणीसाठा वाढवण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य.
  12. पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचे नियोजन: उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन.