PM किसानचे 2000 कोणाला मिळणार? कृषिमंत्र्यांनी दिली मोठी माहिती
PM Kisan 24th Installment 2026 : कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) 24 व्या हप्त्यापूर्वी एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी 30 ऑक्टोबरला जमा होणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्ता बद्दल माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : PM Kisan 24th Installment 2026 : देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांची 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा 30 आक्टोंबर रोजी समाप्त होईल. मात्र त्यापूर्वी कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एक व्हिडिओद्वारे संदेश दिला आहे. त्यांनी या संदेशामध्ये अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया..
30 ऑक्टोबरला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जमा होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन-दोन हजार रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातील.
व्हिडिओ संदेश मध्ये कृषिमंत्री काय म्हणाले?
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यापूर्वी एक संदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आगामी हप्त्या संदर्भात माहिती शेअर केली आहे. जसे की हप्ता कुठून जमा केला जाणार आहे? कोण जमा करणार आहे? आणि किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे पाठवले जाणार आहेत. तसेच 24 व्या हप्त्याची एकूण रक्कम किती असेल याचीही माहिती त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता गुजरातच्या बनासकांठा इथून जारी करतील. या हप्त्यामध्ये 9.34 कोटीपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना 18 हजार 680 कोटी रुपये पेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर केली जाईल. खाली व्हिडिओत तुम्ही पाहू शकता ते काय म्हणाले..
कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाहीत 2000 रुपये?
30 ऑक्टोबरला देशभरातील किसान सन्मान निधीच्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन- दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी आहात आणि आतापर्यंत ekyc केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर केवायसी करून घ्या. जेणेकरून तुमचा हप्ता थांबणार नाही. यासाठी सर्वात प्रथम तुम्ही तुमचे स्टेटस चेक करा. स्टेटस मध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही केवायसी केलेली आहे किंवा नाही. जर तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्ही घर बसून ई- केवायसी करू शकता. ती कशी.. चला सांगतो..
OnePlus N6x खरेदी करा 18499 रुपयात amazon वर. खरेदीसाठी क्लिक करा.
OnePlus N6 Lite मिळवा 15499 मध्ये. खरेदीसाठी क्लिक करा
घरी बसल्या करा ई-केवायसी
- ई-केवायसी प्रक्रिया करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
- सर्वात प्रथम तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला किंवा पीएम किसान पोर्टलवर जा. त्यानंतर ई-केवायसी हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- हा विकल्प वेबसाईटच्या वरच्या डाव्या बाजूला असेल.
- यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाका आणि ओटीपी सबमिट करा.
- ओटीपी सबमिट करताच तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.
अशा सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या एक केवायसी प्रक्रिया करू शकता आणि प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता.
Read About PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
website : yojanamazi.com