Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 Information In Marathi : अटल बांबू समृद्धी योजना मराठी माहिती
Atal Bamboo Samriddhi Yojana महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी जुनी अटल बांबू समृद्धी योजना रद्द करून नवीन अटल बांबू समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून अटल बांबू समृद्धी योजना 2024 Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 अंतर्गत पावसाळ्यात बांबू लागवड योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Atal Bamboo Samriddhi Yojana महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली अटल बांबू समृद्धी योजना शेतकऱ्यांना आधार देणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीची निवड करताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्याचा समूह, नोंदणीकृत संस्था आदी यातील सभासदांनी एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच खाजगी शेतकऱ्यांकडून एकएकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार त्यानंतर केला जाईल.
Atal Bamboo Samriddhi Yojana या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जासोबत शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, पासबुक आणि कॅन्सल चेक इत्यादी कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागते.
Atal Bamboo Samriddhi Yojana महाराष्ट्र सरकारने 28 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद केली होती, मात्र त्याच्या देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद या योजनेत नसल्यामुळे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर अटल बांबू समृद्धी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे लागवडीसाठी अनुदान देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी केली आहे.
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 यापूर्वी शेतकऱ्यांना 1 हेक्टर साठी 600 रुपये देण्याची तरतूद आहे. तसेच फक्त रोपाच्या किमतीपेक्षा 80% किंवा 50% अनुदान लाभार्थ्याचे भूधारण मर्यादेनुसार देण्याची तरतूद आहे. रोप वनातील पाणी देणे, खत देणे, संरक्षण इत्यादी तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सदर योजना रद्द करून त्याऐवजी 2 हेक्टर करता 1200 रुपये लागवड व देखभालीसाठी अनुदान देण्याची तरतूद नवीन योजनेत करण्यात आली आहे.
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 बांबू हे एक बहुउपयोगी वनस्पती आहे. आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे त्यास हिरवे सोने म्हणून ओळखले जाते. बांबूचे गरिबांच्या जीवनात व ग्रामीण उद्योगात विशेष स्थान आहे. बांबू क्षेत्राचा विकास करणे आणि या माध्यमातून स्थानिकांचा आर्थिक सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू अभियान एनडीएम ची स्थापना केलेली होती.
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 त्या अनुषंगाने शेतकऱ्याची उपजीविका उंचावण्यासाठी शेत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर बांबू लागवडी करता शेतकऱ्यांना सवलतीच्या दरामध्ये टिशू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली. त्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय 28 जून 2019 रोजी मंजूर करण्यात आला होता. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मागणी केल्यास 1 हेक्टर क्षेत्रासाठी 600 टिशू कल्चर रोपे दिली जात असत. तसेच सदर योजनेअंतर्गत रोपे लागवड निंदणी संरक्षण इत्यादी खर्च मात्र शेतकऱ्यांना करावा लागत होता.
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 रोपाच्या किमतीचा 80 टक्के किंवा 50 टक्के अनुदान म्हणून अनुक्रमे 4 हेक्टरचे खाली किंवा चार हेक्टर च्या वर सुधारणा असल्यास ध्येय होते त्यानुसार योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्यासाठी फक्त 600 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र रोपाची वेग वाढीसाठी कुठली तरतूद करण्यात आलेली नव्हती.
राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत बांबू लागवडीसाठी एकूण 120 रुपये अनुदान 3 वर्षात दिले जात असे त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड खतिचे संरक्षण यासाठी अनुदानातून हातभार लागत होता. या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. परंतु केंद्र पुरस्कृत योजनेतून अत्यल्प अनुदान उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना यामध्ये खर्च करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने यामध्ये दुरुस्ती करून अनुदानामध्ये वाढ केली आहे.
त्यामुळे राष्ट्रीय बांबू अभियान योजनेने अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू रोपे उपलब्ध करून देणे, सोबतच खत पाणी देणे, संरक्षण या कामासाठी अनुदान देणे उचित ठरेल. मागील पाच वर्षात रोजंदारी मजुरीचे वाढलेली मजुरी विचारात घेतल्या शेतकऱ्यांना 175 रुपये प्रति रोप इतकी अनुदान तीन वर्षात 90 रुपये, 50 रुपये, 35 रुपये विभागून देण्याची तरतूद करण्यात आली.
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 राज्यात बांबूला भरपूर प्रतिसाद मिळवून बांबूत वाढ होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल. त्या अनुषंगाने अटल बांबू समृद्धी योजनेच्या दिनांक 28 जून 2019 शासन निर्णय मध्ये बदल करून विचाराधीन करण्यात आला होता.
अटल बांबू समृद्धी योजना म्हणजे काय
What Is Bambu Lagwad Anudan Yojana 2024
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नवीन अटल बांबू योजनेच्या माध्यमातून टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्याच्या देखभालीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला 50 टक्के रक्कम एकूण 175 रुपये अनुदान म्हणून 3 वर्षाच्या टप्प्याटप्प्याने दिली जाईल. या अनुदानाची विभागणी प्रथम वर्षात 90 रुपये, दुसऱ्या वर्षात 50 रुपये आणि तिसऱ्या वर्षात 35 रुपये प्रतिरोप याप्रमाणे अनुदान दिले जाईल.
या योजनेच्या माध्यमातून पुरवठा करण्यात आलेल्या रोपाची रक्कम अनुदानाच्या पहिल्या हप्त्यातून समायोजित करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला 2 हेक्टर क्षेत्र साठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबूची रोपे (5 मी बाय 4 मी) अंतरावर लागवड करावी लागेल. याचे अनुदान वर्षाच्या शेवटी देण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी अटी आणि शर्ती चे पालन करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज करताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणी संस्था इत्यादीचे नाव सुरुवातीलाच ऑनलाईन अर्जात referred by या ठिकाणी नमूद करावे.
ठळक मुद्दे
अटल बांबू समृद्धी योजना मराठी माहिती
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024 Information In Marathi
अटल बांबू समृद्धी योजना म्हणजे काय
What Is Bambu Lagwad Anudan Yojana 2024
अटल बांबू समृद्धी योजनेचे उद्दिष्ट
Atal Bamboo Samriddhi Yojana Purpose
टिशू कल्चर बांबू रोपासाठी प्रजाती
Atal Bamboo Samriddhi Yojana
योजनेच्या सर्वसाधारण तरतुदी
Atal Bamboo Samriddhi Yojana
बांबू लागवडीचे फायदे
Atal Bamboo Samriddhi Yojana Benefits
अटल बांबू समृद्धी योजनेचे लाभार्थी
Atal Bamboo Samriddhi Yojana Benefisiors
अटल बांबू समृद्धी योजनेची पात्रता
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 Eligibility
अटल बांबू समृद्धी योजनेचे नियम व अटी
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 Terms And Conditions
अटल बांबू समृद्धी योजनेसाठी कागदपत्रे
Atal Bamboo Samriddhi Yojana Documents
अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज रद्द होण्याचे कारणे
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024
अटल बांबू समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Atal Bamboo Samriddhi Yojana Online Apply
अटल बांबू समृद्धी योजनेचे उद्दिष्ट
Atal Bamboo Samriddhi Yojana Purpose
- शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणे.
- शेतातून मिळणाऱ्या उत्पादनांना जोड देण्यासाठी व हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी पायाभूत होण्यासाठी आणि उद्योगाच्या दर्जेदार कच्च्या मालाच्या आवश्यकतेच्या उपलब्धतेसाठी शेत जमिनीवरील बांबू लागवड क्षेत्र वाढवणे.
- बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे.
- यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

टिशू कल्चर बांबू रोपासाठी प्रजाती
Atal Bamboo Samriddhi Yojana
महाराष्ट्र मध्ये मानवेल (Dendrucalamus structure), कटांग (Bambusa) या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तर माणगाव ही प्रजाती कोकण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळते. बांबू क्षेत्रात बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ञ सोबत चर्चा करून वरील 3 स्थानिक प्रजाती व्यतिरिक्त खालील 5 प्रजाती निवडण्यात आले आहेत.
Bambusa balcooa
Dendrocalamus brandisii
Bambusa nutan
Dendrocalamus asper
Bambusa tulda
वरील नमूद बांबूच्या प्रजाती व्यतिरिक्त इतर प्रजातींचा आवश्यकतेनुसार समावेश करण्याचा अधिकार प्रधान मुख्य संरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षतेखालील समिती देण्यात येत आहे.
योजनेच्या सर्वसाधारण तरतुदी
Atal Bamboo Samriddhi Yojana
प्रधान मुख्य वनसंरक्षण महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अध्यक्षखाली स्थापन केलेल्या समितीने निश्चित केलेल्या दरानुसार टिशू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यात येईल.
या योजनेच्या माध्यमातून टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीसाठी प्रत्यक्ष शेतकऱ्याला 3 वर्षासाठी प्रतिरोपे 350 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून 3 वर्षात देण्यात येईल. या अनुदानाची विभागणी आहे 90 रुपये, 50 रुपये, 35 रुपये एकूण 175 याप्रमाणे आहे. प्रथम, द्वितीय आणि तृतीय याप्रमाणे प्रतिवर्षी ही रक्कम वितरित करण्यात येईल. पुरवठा करण्यात आलेल्या रोपांची किंमत अनुदानाचे प्रथम वर्ष हप्ता मधून समायोजित करण्यात यावी.
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रासाठी 600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे एकूण 1200 बांबूची रोपे 4 व 5 मीटर अंतरावर लागवड व देखभालीसाठी अनुदान देण्यात येईल.
लाभार्थी शेतकऱ्याची निवड करत असताना शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह यातील सदस्यांना एकत्रित अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर खाजगी शेतकऱ्यांकडून एक एकट्या शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून अनुदान 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येईल.
Atal Bamboo Samriddhi Yojana बांबू लागवडीसाठी कोणते बांबू प्रजाती निवडायची याबाबत शेतकऱ्यांनी तज्ञ कडून माहिती घेऊन स्वतः योग्य पद्धतीने प्रजातींची निवड करावी. प्रजातीनिहाय संख्या ऑनलाईन अर्जात नमूद करावी. शेतकरी उत्पादक संस्था कंपनी, बांबू शेतकऱ्यांचा समूह, नोंदणीकृत संस्था यांच्या सभासदांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अशा शेतकऱ्यांची यादी तपशीलासह महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे संस्थेने लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या कागदपत्राची तपासणी महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडून करण्यात येईल. टिशू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

बांबू लागवडीचे फायदे
Atal Bamboo Samriddhi Yojana Benefits
- बांबूची मुळे टणक व मजबूत असतात त्यामुळे मातीची धूप रोखण्यास मदत होते.
- बांबू कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि ऑक्सिजन सोडतो त्यामुळे हवा शुद्ध होते.
- बांबू अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजातींसाठी निवासस्थान प्रदान करीत असल्यामुळे जैवविविधता वाढते.
- बांबूचे झाड पाणी शोषून घेतात त्यामुळे पूर आणि दुष्काळापासून बचाव होतो.
- बांबूचा वापर विविध प्रकारे केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनतो.
- बांबूच्या लागवडीसाठी मजुरांची आवश्यकता असते त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
- बांबूचा वापर घरे, शाळा, इमारती बांधण्यासाठी केला जातो.
- अनेक ठिकाणी बांबू खाद्यपदार्थ म्हणून देखील वापरले जाते.
- बांबूचा वापर लाकडासाठी पर्याय इंधन म्हणून केला जातो.
- बांबू चा वापर विविध प्रकारच्या हस्तकला बनवण्यासाठी केला जातो.
अटल बांबू समृद्धी योजनेचे लाभार्थी
Atal Bamboo Samriddhi Yojana Benefisiors
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी अटल बांबू समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
अटल बांबू समृद्धी योजनेची पात्रता
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 Eligibility
- अर्जदार आम्हाला महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या शेतामध्ये सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे.
- बांबू लागवडीसाठी आवश्यक असलेली जमीन किमान एक हेक्टर असावी.
अटल बांबू समृद्धी योजनेचे नियम व अटी
Bambu Lagwad Anudan Yojana 2024 Terms And Conditions
- फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- फक्त शेतकऱ्यांनाच योजना चा लाभ घेता येईल.
- अर्जदाराकडे बांबू रोपापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याकरता ठिबक सिंचन असणे आवश्यक आहे.
- रोपे लहान असताना त्यांची निगा राखण्यासाठी शेताभोवती संरक्षण कुंपणाची सोय केलेली असावी.
- बांबूची लागवड पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जिओ टॅग / जी. आय. एस द्वारे फोटो पाठवावे.
- एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक हेक्टर क्षेत्रातच लागवड करता येईल.
- एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 600 बांबूचे रोपे देण्यात येतील.
- अर्ज सोबत शपथपत्र देणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अर्जदाराने यापूर्वी कोणत्याही केंद्र किंवा राज्य सरकारच्या बांबू लागवडीसाठी अनुदान घेतले असेल तर शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अटल बांबू समृद्धी योजनेसाठी कागदपत्रे
Atal Bamboo Samriddhi Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज रद्द होण्याचे कारणे
Atal Bamboo Samriddhi Yojana 2024
- अर्जदार हा महाराष्ट्रा बाहेरील शेतकरी असेल तर या योजनेचा अर्ज रद्द होतो.
- अर्जदार व्यक्तीने यापूर्वी अटल बांबू समृद्धी योजनेचा लाभ घेतला असेल तर या योजनेचा अर्ज रद्द होतो.
- शेतकरी ज्या ठिकाणी बांबूची लागवड करणार आहे तिथे पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अर्ज रद्द करण्यात येतो.

अटल बांबू समृद्धी योजनेची अर्ज प्रक्रिया
Atal Bamboo Samriddhi Yojana Online Apply
- अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करता येतो.
- यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला बॉम्बे बोर्ड मध्ये बॉम्बे एप्लीकेशन वर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज उघडेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.
- त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
- त्यानंतर संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.
- अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज पूर्ण करू शकता.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना