One Nation One Ration Card Scheme : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

One Nation One Ration Card Scheme : रेशन संदर्भातील नियमात बदल

One Nation One Ration : वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता कोणीही देशातील नागरिक कुठल्याही राज्यामध्ये आपले रेशन खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही एका दुकानावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही.

देशातील 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिन्याला रेशनचे मोफत वाटप करण्यात येते. या योजनेअंतर्गत सरकार सतत नियमांमध्ये बदल करत असते. सरकारने आता पुन्हा एक नवीन बदल केला आहे.

नवीन नियमानुसार आता पात्र नागरिक देशातील कुठल्याही राज्यात तेथील रेशन दुकानदाराकडून रेशन खरेदी करू शकणार आहेत. यामुळे ज्या गावातील दुकानदाराकडे तुमचे नाव आहे तिथे जाऊन खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही जिथे राहता तेथील जवळच्या रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही तुमचे रेशन खरेदी करू शकणार आहात.

ही व्यवस्था अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे जसे बँका काम करतात. उदाहरणार्थ तुमचे कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट असू द्या तुम्ही देशातील कुठल्याही एटीएम मधून आपल्या अकाउंट मधून पैसे काढू शकता. आता सरकारने रेशनसाठी ही व्यवस्था सुरू केली आहे. हा बदल सरकारने वन रेशन वन राशन कार्ड ONORC अभियाना अंतर्गत केले आहे.

या नवीन नियमामुळे आता ग्राहक ज्या ठिकाणी राहत आहे तेथील रेशन दुकानदाराकडून आपले रेशन त्याच दरामध्ये खरेदी करू शकणार आहे. यासाठी त्याला गावी जाऊन रेशन खरेदी करण्याची गरज आता राहणार नाही. त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होणार आहे.

या सरकारच्या निर्णयामुळे आता रेशन दुकानावर रांगा लागण्याची वेळ येणार नाही आणि लोकांना रेशन सहज उपलब्ध होईल. एवढेच नाही तर देशभरातील रेशन वितरण व्यवस्थेमध्ये मोठी सुधारणा होणार आहे.

या लोकांना मोठा दिलासा

सरकारच्या या नवीन निर्णयामुळे आता लाभार्थी ग्राहकांना आपल्या महिन्याचे रेशन खरेदी करण्यासाठी कुठल्या एका दुकानावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही. तो त्याच्या उपलब्ध वेळेनुसार उपलब्ध दुकानातून आपले रेशन खरेदी करू शकणार आहे.

याबरोबरच एका दुकानातून गहू आणि दुसऱ्या दुकानातून तांदूळ अशीही तो खरेदी करू शकणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अनेक दुकानात गहू नसतात तर तांदूळ असतात, तांदूळ असतील तर गहू नसतात पण अशावेळी आता ग्राहकांना ज्या दुकानात जे उपलब्ध आहे ते खरेदी करता येणार आहे आणि गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहण्याची गरजही उरणार नाही.

केवळ एकाच दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही

केंद्रीय राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी सांगितले की, ONORC च्या अंतर्गत पात्र लाभार्थी देशभरात निश्चित रेशन दुकानदाराकडून आपले रेशन प्राप्त करू शकणार आहेत. ही सिस्टीम एटीएम बँकिंग सारखी काम करणार आहे. ही एक डिजिटल पद्धत आहे, तेथे व्यक्ती आपल्या नोंदणीकृत खाते नंबर नुसार एटीएम मधून पैसे काढू शकतो. त्याच प्रकारे रेशन कार्ड धारक आता कुठल्याही दुकानात जाऊन, आपण राहत असलेल्या ठिकाणी रेशन मिळवून त्याचा लाभ घेऊ शकतो.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA च्या अंतर्गत रेशन कार्डची देशव्यापी व्यवस्था निश्चित करण्यासाठी ‘एक राष्ट्र एक राशन कार्ड’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी विशेष करून प्रवासी श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबांना आधार आधारित बायोमेट्रिक अथेंटिकेशनच्या माध्यमातून भारतामध्ये कुठेही रेशन दुकानदाराकडून रेशन खरेदी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही योजना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लागू करण्यात आली आहे. यामुळे अन्नसुरक्षाचा लाभ संपूर्ण देशामध्ये सुलभ पद्धतीने होणार आहे.

परगावी राहणाऱ्यांसाठी दिलासा

सरकारच्या या नवीन निर्णयामुळे प्रवासी श्रमिक म्हणजे परगावी राहणाऱ्या श्रमिकांसाठी मोठा लाभ होणार आहे. कारण ते कामानिमित्त शहराच्या ठिकाणी किंवा इतर राज्यांमध्ये राहतात. त्यांना आता आपल्या मूळ गावी येऊन रेशन खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही. ते ज्या ठिकाणी राहत आहेत, तेथील जवळच्या रेशन दुकानदाराकडून ते आपले रेशन खरेदी करू शकणार आहेत. यामुळे त्यांच्या वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत होणार आहे आणि वेळेवर त्यांना महिन्याचे रेशन खरेदी करता येणार आहे.

FAQ’s 

प्रश्न: वन नेशन वन राशन कार्ड साठी कोण आहे पात्र?

उत्तर: देशातील प्रत्येक शिधाधारक हा या योजनेसाठी पात्र आहे.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत रेशन कसे मिळेल?

उत्तर: देशातील कुठल्याही दुकानात जाऊन तुम्ही तुमचे रेशन कार्ड दाखवून या योजनेअंतर्गत रेशन मिळू शकतात.

प्रश्न: दुसऱ्या राज्यात स्थलांतरित केल्यास लाभ मिळतो का?

उत्तर: या योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या प्रत्येक शिधापत्रिकाधारक व्यक्तीला देशातील कुठल्याही रेशन दुकानात जाऊन आपले रेशन खरेदी करता येईल.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड वापरण्यासाठी काही शुल्क आहे का?

उत्तर: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाहीत ही योजना एकदम मोफत आहे.

प्रश्न: वन नेशन वन रेशन कार्ड चा फायदा काय?

उत्तर: या योजनेचा फायदा म्हणजे कामानिमित्त एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अनेक लोक स्थलांतरित होत असतात, मात्र त्या राज्यात गेल्यानंतर त्यांना रेशनचा लाभ घेता येत नाही अशा लोकांना देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात नोकरी निमित्त राहण्यासाठी गेलेल्यांना तिथल्या संबंधित रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येईल.