Cant Remember Song Lyrics No Worries Just hum YouTube will find your favorite song : गाण्याचे बोल आठवत नाहीत, मग फिकीर कशाला? यूट्यूब आहे ना !
Cant Remember Song Lyrics No Worries Just hum YouTube will find your favorite song : आपल्याला अनेक वेळा असं होतं की, डोक्यामध्ये मस्त एखादी गाण्याची धुन डोक्यात येते. ओठांवर गुणगुणल्या जाते. पण शब्द काय हेच आठवत नाही. आपण खूप विचार करतो कुठलं गाणं असेल बर हे? आता कसं शोधावं? हे तर मला गाणं ऐकायचं आहे. मला आठवत नाहीये, फक्त म्युझिक आठवती आहे, त्या गाण्याचे नक्की बोल काय आहेत असे अनेक प्रश्न आपल्याला एकाच वेळी पडतात. अस्वस्थता जाणवते, पण आता याची चिंता सोडून द्या !
कारण youtube ने आणला आहे एक नवीन फीचर. ज्यात तुम्ही सहजरीत्या गाणं शोधू शकता. आपल्यासोबत अनेकदा असं होतं एखादी छान धुन डोक्यात घोळते, ओठांवर गुणगुणल्या जाते पण त्या शब्दाचे बोल काय आहेत हेच आठवत नाहीत.
मग आपण आपल्या डोक्यात अनेक प्रकारचे विचार येतात कोणता असेल हे गाणं? मी कसं शोधू आता? कुठलं गाणं आहे? कोणत्या मूवी मधलं आहे? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आपल्याला इंटरनेटवर शोधाशोध करावी लागते. पण आता ही सगळी धडपड थांबवा कारण youtube ने एक जबरदस्त नवीन फीचर आणला आहे.
आता तुम्ही फक्त गाणं गुणगुणून किंवा शीळ वाजवून किंवा नुसती धून म्हणूनही तुमचं आवडतं गाणं शोधू शकता. हे खरं आहे का? तर होय नक्कीच हे आता खरं आहे. आता गाणं ओळखण्यासाठी तुम्हाला Shazam किंवा इतर कोणत्या वेगवेगळ्या ॲपची गरज नाही. थेट youtubeच तुम्हाला आता मदत करणार आहे.
हे फीचर तुम्हाला कसं मदत करेल याची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया.. तुमच्याही मनात एखादं गाणं गुणगुणत आहे का? पण त्याचे बोल तुम्हाला आठवत नाहीयेत का ? वाचा तर मग हा लेख आणि करा तुम्ही ट्राय.
काय आहे हे फीचर
Cant Remember Song Lyrics No Worries Just hum YouTube will find your favorite song
हे फीचर गुगलच्या ‘Hum to Search’ फीचर सारखं काम करत. तुम्ही गुणगुणलेली किंवा गायलेली धुन youtube चे AI ऐकत त्याचे विश्लेषण करतात आणि त्याच्या डेटाबेस मध्ये असलेल्या लाखो गाण्यांशी जुळवून बघतात आणि मग काही क्षणातच ते तुम्हाला संभाव्य गाण्यांची यादी दाखवत.
असा करा वापर
तुमच्या फोनमधील यूट्यूब ॲप उघडा
ॲप मध्ये उजवीकडे वरच्या बाजूला जो सर्चचा आयकॉन असतो त्यावर क्लिक करा
सर्च बारच्या बाजूला तुम्हाला एक माईकचा आयकॉन दिसेल त्यावर टॅप करा
आता तुम्हाला जे गाणं शोधायच आहे ते तुम्ही गाऊ शकता, गुणगुणू शकता किंवा त्याची धून शीळ वाजवू ऐकवू शकता
youtube तुमच्या आवाजातील धुन ओळखण्याचा प्रयत्न करेल आणि काही क्षणातच तुम्हाला त्या धूनशी जुळणाऱ्या गाण्यांची यादी दाखवेल
तुम्हाला त्या यादीत तुमचा अपेक्षित गाणं मिळालं तर त्यावर क्लिक करून तुम्ही ते ऐकू शकता, परंतु जर तुम्हाला ते गाणं मिळालं नाही तर पुन्हा एकदा थोडं वेगळ्या पद्धतीने गुणगुणून प्रयत्न करू शकता
गुणगुणून गाणं शोधण्याचा फीचर सध्या फक्त काही निवडक अँड्रॉइड युजर साठीच उपलब्ध झालं आहे. विशेषतः जे लोक youtube च बेटा व्हर्जन वापरत आहेत त्यांना ते आधी मिळत आहे. याचा अर्थ आयफोन वापरणाऱ्यांना किंवा इतर सर्व सामान्य अँड्रॉइड युझर्स साठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जेव्हा हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल तेव्हा गाणी शोधण्याचा आपला अनुभव बदलेल. ना गाण्याचे बोल आठवण्याची कटकट ना वेगळा ॲप डाऊनलोड करण्याची गरज. युट्युब ला विचारा आणि तुमच्या मनातील गाणं ऐका.