highlights tourism plans mentions mahabaleshwar development : देवेंद्र फडणवीस
highlights tourism plans mentions mahabaleshwar development : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मे रोजी महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे ‘महा पर्यटन उत्सव सोहळा महाराष्ट्राचा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित संबंधितांशी संवाद साधला.
devendra fadnavis highlights tourism plans mentions mahabaleshwar development त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला आपल्याला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पर्यटन घाट पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
devendra fadnavis सामान्य व्यक्तीपासून परदेशी पर्यटकांपर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. या दृष्टीने महा पर्यटन महोत्सव महोत्सव महत्त्वाचा आहे.
devendra fadnavis highlights tourism plans mentions mahabaleshwar development पर्यटन क्षेत्रांमध्ये 100 कोटींचे गुंतवणूक आली तर किमान 10 हजार रोजगार संधी निर्माण होतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला जेवढे जास्त पाठिंबा देऊ तेवढ्यात जास्तीत जास्त रोजगाराचे निर्मिती करू शकू. स्थानिक समुदायाला अधिकारिता देऊ शकू.
Devendra Fadnavis देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये महाराष्ट्र 5 व्या क्रमांकावर आहे येत्या पाच वर्षांमध्ये आपल्याला राज्याला पहिला क्रमांकावर आणायचे आहे. पर्यटन क्षेत्रांमध्ये पर्यटकांना मूलभूत सुविधा मिळणे आणि परिसरामध्ये पर्यटन संस्कृती रुजणे महत्त्वाचे असते.
devendra fadnavis update news in marathi पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना संबंधित स्थळांचा परिसराचा आपल्या देशाचा स्थानिक अनुभव प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी पर्यटन विभागाने संपूर्ण वर्षाच्या महोत्सवाचे कॅलेंडर तयार करावे. या कॅलेंडरनुसार पर्यटनाचे आयोजन करण्याच्या उद्देशाने सर्वच पर्यटन यात्रा आयोजक करणाऱ्यांसोबत वार्षिक परिषदेचे आयोजन केले पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis पुढे म्हणाले की, अलीकडच्या काळात लोक सर्व प्रकारची बुकिंग, प्लॅनिंग ऑनलाईन पद्धतीने करतात. त्यामुळे आपले पोर्टल वेबसाईट चा वापर करून व्यवस्था उभी केली पाहिजे. पर्यटकांना राज्यातील पर्यटनासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. असे केल्यामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राची गाडी सुसाट धावेल. भावी महाबळेश्वर हे देशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ असून महाबळेश्वरच्या निर्मितीद्वारे नवीन संधी उपलब्ध होतील
Devendra Fadnavis फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबई येथे आयोजित वेव्ह्ज 2025 मुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीते यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय मार्केट तयार झाले आहे. पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांना या सर्वांचा अनुभव करून देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील या पर्यटन स्थळाला आवर्जून भेट देतील. यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळेल व पर्यटन संस्कृती उभी राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
devendra fadnavis update news in marathi मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कोयना बॅकवॉटर संबंधी असणारे बंधने दूर केल्याने तिथे चांगले पर्यटन व्यवस्था उभी राहत आहे. पुढील महापर्यटन उत्सव कोयना बॅकवॉटर क्षेत्रात घेण्यात येईल व पर्यटकांना या भागातील निसर्ग सौंदर्याचा आणि जल क्रीडांचा अनुभव घडविण्यात येईल. तसेच येत्या काळात आयएनएस गुलजार बोटीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्राखालील जग अनुभवता येईल. महा पर्यटन उत्सव ही सुरुवात असून आगामी काळात असे अनेक उत्सव पर्यटकांना पाहायला मिळतील.