Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 In Marathi : डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि योजनेतून किती मिळते अनुदान

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 In Marathi : डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना शेतकऱ्यांसाठी कशी आहे फायदेशीर

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 In Marathi : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2016-17 मध्ये झाली.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल त्यांचा आर्थिक विकास होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना सुरू करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2025 : आज या लेखाच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत किती अनुदान मिळते? याची माहिती आपण पाहणार आहोत.

कशी होते लाभार्थ्यांची निवड

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2025 Eligibility

  • लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध शेतकरी असावा.
  • शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकार्‍याचे जातीचे प्रमाणपत्र असावे.
  • शेतकऱ्याला विहिरीचा लाभ घ्यायचा असल्यास 0.40 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्याकडे असावी.
  • नवीन विहीर व्यतिरिक्त इतर लाभ घेण्यासाठी 0.20 हेक्टर शेतजमीन असावी.
  • सातबारा आणि आठ अ उतारा लाभार्थी शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा अधिक नसावे.

किती मिळेल अनुदान

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana

  • नवीन विहीर 2 लाख 50 हजार
  • जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार
  • इंवेल बोरिंग 20 हजार
  • वीज जोडणी 10 हजार
  • शेततळ्यांचे प्लास्टिक 1 लाख
  • सूक्ष्म सिंचन संच 50 हजार
  • तुषार सिंचन 25000
  • पंपसंच 20000
  • नवीन विहीर पॅकेज 3 ते 3.5 लाख
  • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज 1 ते 1.5 लाख
  • शेततळे अस्तरीकरण पॅकेज 1.55 ते 1.80 लाख
  • सोलार पंप अनुदान 30000