Redmi 14C 5G launched In India : Redmi 14C स्मार्टफोन 10 जानेवारीला होणार लॉन्च

Redmi 14C 5G launched In India : Redmi 14C Vivo ला देणार टक्कर

Redmi 14C 5G launched In India : भारत हा मोबाईल साठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे विविध कंपन्या नवनवीन मोबाईल बाजारात आणत असतात. आता नवीन वर्षात रेडमीने आपला पहिला स्मार्टफोन भारताच्या बाजारात लॉन्च करणार आहे. Redmi 14C बाजारात 10 जानेवारीला लॉन्च होणार आहे.

Redmi 14C 5G रेडमी कंपनीने नुकतीच याची माहिती दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 चिप्स असणार आहेत. या फोनमध्ये तुम्हाला तगडे फिचर पाहायला मिळणार आहेत. या मोबाईलची बॅटरी 5160 एमएएच एवढी आहे.

हाच मोबाईल घेताना तरुणाई त्या मोबाईल मध्ये मिळणारे फीचर कडे बारकाईने पाहत असते. ही बाब लक्षात घेत redmi 14 C या स्मार्टफोनमध्ये फोटो आणि व्हिडिओ साठी 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आलेला आहे. हा रेडमी चा बाजारात येणारा मोबाईल बाजारात आलेल्या vivo T3 X 5G या मोबाईलला टक्कर देणार आहे.

Xiaomi Redmi 14C रेडमी 10 जानेवारीला रेडमी 14C चा मोबाईल बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. तो तीन व्हेरिएंट मध्ये लॉन्च केला जात आहे. सुरुवातीची किंमत 9,999 यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणार आहे तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल ची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या मोबाईलची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Xiaomi Redmi 14C रेडमी कंपनी 10 जानेवारी पासून हा मोबाईल ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी ठेवणार आहे. त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून मोबाईल बुक करता येणार आहे. याबरोबरच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाईटवरूनही तुम्हाला स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे.

दमदार बॅटरी

Xiaomi रेडमी ने आपल्या 14C या मोबाईल मध्ये दमदार बॅटरी दिलेली आहे. म्हणजेच 5,160 एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याबरोबरच तुम्हाला 33 w चा चार्जरही देण्यात येतो. ज्याद्वारे फास्ट चार्जिंग करता येणार आहे. तरी या मोबाईल मधील कॅमेरा बद्दल सांगायचं झाल्यास 14c मोबाईल मध्ये 15 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही फोटो आणि व्हिडिओ चांगल्या पद्धतीचे काढू शकता आणि क्लॅरिटी ही त्याची उत्तम प्रकारची देण्यात आली आहे.

Vivo T3X शी टक्कर

जिओनी नुकताच आपला T3X 5G मोबाईल लाँच केला आहे. त्याबरोबरच भारतात vivo ने या मोबाईलची एक हजार रुपयांनी किंमत कमी केली आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 12499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. मात्र आता Xiaomi रेडमी 14C 5g 10 जानेवारी लाँच होणार आहे. त्यामुळे या दोन मोबाईल मध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

Vivo T3X मोबाईल मध्ये क्वालकॉम 6जनरेशन 1 चिपसेट असणार आहे. या फोनची बॅटरी 6000 एमएएच देण्यात आली आहे. बरोबरच या मोबाईल मध्येही 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही मोबाईलची फीचर जवळपास सारखीच असल्यामुळे या दोन्ही मोबाईल मध्ये टक्कर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहक कुठल्या मोबाईलला जास्त पसंती देतात हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसात समजेल.