IPL 2025 BIG Update In Marathi : भारत-पाक तणावामुळे आयपीएलचे उर्वरित 16 सामने होणार की नाही?

IPL 2025 Suspended : BCCI चा निर्णय काय?

IPL matches postponed for a week : आयपीएल क्रिकेट सामने सुरू असतानाच भारत – पाकिस्तान तणावपूर्वक वातावरण झाल्यामुळे आयपीएलच्या क्रिकेट सामन्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे उर्वरित 16 सामने होणार की नाही याबाबतची ही माहिती असून यावर BCCI कडून काय निर्णय झाला.

IPL चे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत. एका आठवड्यानंतर आयपीएलच्या उर्वरित सामनांबाबत निर्णय घेण्यात येईल असे BCCI डून सांगण्यात आले आहे. दरम्यान आयपीएल क्रिकेट सामन्यातील 16 सामने शिल्लक आहेत परंतु सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्वक पार्श्वभूमीवर आयपीएलचे उर्वरित सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे.

IPL 2025 BIG Update एका आठवड्यानंतर या बाबत आईपीएल चे वेळापत्रक जाहीर होईल. तर पाकिस्तान कडून झालेल्या हल्ल्यामुळे गुरुवारी जम्मू, पंजाब आणि राजस्थानमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. धर्मशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणारा 58 वा सामना 10.1 ओव्हर नंतर थांबवण्यात आला असून तो रद्द करण्यात आला होता आणि खेळाडूंना दिल्लीत आणण्यात आलं होतं.

IPL मध्ये एकूण 74 सामने खेळण्यात येणार आहेत. 22 मार्चपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळण्यात येणार होता. परंतु सध्या असल्यामुळे आता ही तारीख पुढे देखील ढकलली जाऊ शकते.