MahaDBT 2.0 : सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे
MahaDBT 105 Schemes : राज्यातील नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना घरबसल्या 105 योजनांचा लाभ मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील संपूर्ण माहिती…
केंद्र आणि राज्य सरकार मिळून नागरिकांच्या हितासाठी नवनवीन योजना सुरू करत असतात. मात्र या योजनांची माहिती अनेकदा नागरिकापर्यंत पोहोचत नाहीत ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने आता घरबसल्या 105 योजनेचा लाभ नागरिकांना कसा घेता येईल यासाठी पावले उचलली आहेत.
MahaDBT 105 Schemes यासाठी महाडीबीटी पोर्टलवर 15 ऑगस्ट पासून नव्याने 29 योजनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे आता महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या 105 झाली आहे. याबरोबरच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनाही हळूहळू या पोर्टलवर येणार आहेत.
यामुळे नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ घेणे सोपे आणि सुलभ होणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या महाडीबीटीमुळे विविध योजनांची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने होत आहे. योजनांचा गैरवापर लक्षणीयरित्या कमी झाला आहे. त्यामुळे पात्र आणि योग्य व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे.
अतिथी ग्रहावर झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 29 नवीन योजनेच्या लोकार्पण केले. पात्र लाभार्थी नागरिकांपर्यंत सरकारी योजना पारदर्शक पद्धतीने पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले. सरकारकडून महाडीबीटी व्यवस्था अधिक सक्षम कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे.
विविध विभागाच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने ऑनबोर्डिंग करण्यात येणार आहे. भविष्यात सरकारच्या सर्व प्रमुख योजना एकाच डिजिटल व्यासपीठावर नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयात जाऊन किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता राहणार नाही. एकाच ठिकाणी संपूर्ण सरकारी योजना लाभ त्यांना मिळणार आहे. आता नागरिकांना महाडीबीटी पोर्टलवर तब्बल 105 सरकारी योजनेचा लाभ घरबसल्या घेता येणार आहे. त्यांना कुठल्याही कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
महाडीबीटी 2.0 म्हणजे काय?
MahaDBT 105 Schemes सरकारच्या विविध योजना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम महाडिबीटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नागरिक केंद्रित एकात्मिक प्रणाली महाडीबीटी 2.0 नागरिकांना एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देते. सिंगल साइन ऑन, रियल टाईम मॉनिटरिंग साठी लाईव्ह डॅशबोर्ड आणि नो युवर बेनिफिट यासारख्या सुविधा या पोर्टलवर देण्यात आल्या आहेत.
ऑफलाइन प्रक्रियेतून ऑनलाईन प्रक्रियेत संक्रमण करताना मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यावर आणि नवीन योजना समाविष्ट करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यावर सरकारचा भर आहे. या पोर्टलवर आधारित पडताळणी डिजिटल प्रक्रिया आणि पारदर्शक, थेट लाभ हस्तांतरण, डीबीटी यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राहणार आहे.
राज्य सरकारच्या महाडीबीटीवर यापूर्वी 76 योजना सुरू होत्या. 15 ऑगस्ट 2026 पासून आणखी 29 योजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण 105 योजनांचा लाभ नागरिकांना घरबसल्या घेता येणार आहे. याशिवाय आणखी 231 योजनांचे काम प्रक्रियेत असल्याची माहिती ही यावेळी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच सरकारच्या सर्व योजना महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर पाहायला मिळणार आहेत. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.