National PM Modi transfer 2400 crore rupees : पीएम विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत दिला इंसेंटीव
National PM Modi transfer 2400 crore rupees to youth accounts incentives : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, १९ जूनला पीएम विकसित भारज रोजगार योजनेअंतर्गत तरूणांच्या खात्यात २४०० कोटी रूपये जमा केले आहेत.
मोदींनी ही रक्कम पहिल्यादा नोकरी लागणाऱ्या आणि नोकरीवर जावून केवळ 6 महिन्याचा वेळ झाला आहे.
तरूणांच्या थेट खात्यात पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेअंतर्गत थेट तरूणांच्या खात्यात रक्कम जमा केली आहे. यावेळी पीएम मोदी म्हटले की, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनाअंतर्गत आतापर्यंत जवळपास ७० लाख नोकऱ्या निर्माण झाल्यात आहेत. पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना सोशल सिक्योरिटीचे सुरक्षा कवचही देण्यात आले आहे.
जवळपास २० लाख तरूणांना आपल्या नवीन नोकरीत सहा महिने पूर्ण केले आहेत आणि यातील १० लाख तरूणांना या योजनेचे लाभार्थी म्हणून इंसेव्हिव मिळाला आहे. २ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिकची रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये पोहोचली आहे. ही रक्कम केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांच्या परिश्रमाचा सन्मान आहे. हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यावर देशाच्या विश्वासाची अभिव्यक्ती आहे.
तरूण करणार भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व
जग भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी तयार होत आहे. आणि भारत भविष्याच्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची तयारी करत आहे. जग फ्युचर टेक्नोलॉजीच्या दिशेने पुढे जात आहे. भारत आपल्या तरूणांना भविष्यासाठी तयार करण्यात गुंतला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांना संबोधित करताना सांगितले की, ही भारताच्या तरूणांसाठी सर्वांत मोठी संधी आहे. आपण या संधीचा लाभ घ्यायचा आहे. विकसित भारताचा मार्ग तरूणांचे स्वप्न, त्याचे कौशल्य आणि त्याच्या सामर्थ्य यातून जातो.भारतासारख्या तरूण देशात जेवढा मोठ्या प्रमाणात संधी असतील तेवढेच तरूणांच्या स्वप्नांना पंख मिळतील. याच दृष्टीकोनातून गेल्या १२ वर्षापासून रोजगारच्या प्रत्येक मार्गाला मजबूत करण्यात आला आहे.