PM Shram Yogi Mandhan Inactive Account : श्रमयोगी योजनेची अर्ज प्रक्रिया
PM Shram Yogi Mandhan : अंशदान न भरल्यामुळे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे खाते निष्क्रिय झाल्यास थकीत अंशदान भरून खाते पुन्हा सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. मात्र प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे खाते निष्क्रिय झाले तर चिंता करू नका. कारण निष्क्रिय खाते तीन वर्षाच्या आत मानधन भरून पुन्हा ॲक्टिव्ह करता येते. मानधन पोर्टल द्वारे तुम्ही घरी बसून हे मानधन भरू शकता.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाणारी एक पेन्शन योजना आहे. याद्वारे श्रमिकचे अंशदानाबरोबरच सरकारही अंशदान करते, जेव्हा श्रमकाचे वय 60 वर्ष होते तेव्हा त्याला 3 हजार रुपये मासिक पेन्शन या योजनेद्वारे दिली जाते. जर अंशदान रक्कम न भरल्यामुळे लाभार्थीचे मानधन अकाउंट निष्क्रिय झाले अशा स्थितीमध्ये काय करावे? चला जाणून घेऊ..
श्रमयोगी योजनेचे निष्क्रिय खाते चालू कसे करावे?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना खाते निष्क्रिय झाले असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तीन वर्षाच्या आत उर्वरित रक्कम खात्यात जमा करून खाते पुन्हा सुरू करू शकता. तुम्ही रक्कम जमा करण्यासाठी मानधन पोर्टलवर जाऊन आपल्या घरी बसल्या हे रक्कम भरू शकता किंवा जवळच्या ग्राहक सेवा केंद्र वर जाऊनही हे काम पूर्ण करू शकता. उर्वरित रक्कम भरल्यानंतर तुमचे खाते पुन्हा सक्रिय होईल.
टीप- जर तुम्हाला वाटत असेल तुमचे खाते बंद होऊ नये तर तुम्ही वेळेवर रक्कम जमा करत रहा. याव्यतिरिक्त ई-केवायसी सारखी आवश्यक कामेही पूर्ण करा जेणेकरून तुमचे खाते निष्क्रिय होणार नाही आणि ऍक्टिव्ह राहील.
इथेही क्लिक करा
मुख्यमंत्री बळीराजा शेत – पाणंद रस्ते योजनेच्या माहितीसाठी
महिला शेतकरी प्रमाणपत्र योजनेच्या माहितीसाठी
आवश्यक कागदपत्रे
श्रमयोगी मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, सॅलरी स्लिप, बँक खाते आदी असणे आवश्यक आहे.
श्रमयोगी योजनेची पात्रता
- श्रमयोगी योजनेमध्ये गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी तुमचे वय 18 ते 40 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे आणि तुम्ही असंघटित क्षेत्रातील कामगार – श्रमिक असणे आवश्यक आहे.
- असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असणे ही आवश्यक आहे.
- याबरोबरच कर्मचारी यापूर्वीपासूनच कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजेच ईपीएफओ किंवा एनपीएस सारख्या अन्य संस्थांचा सदस्य असू नये.
श्रमयोगी योजनेची अर्ज प्रक्रिया
तुम्ही अधिकृत वेबसाईट https://maandan.in/ वर जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन श्रमयोगी योजनेसाठी अर्ज करू शकता. ही योजना भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.
या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मासिक पेन्शनच्या स्वरूपात दिला जातो. यामध्ये मासिक पेन्शन 3000 रुपये लाभार्थ्याला दिली जाते. तुम्हीही असंघटित क्षेत्रातील कामगार असाल आणि तुमचा पगार 15000 पेक्षा कमी असेल तर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
श्रमयोगी योजनाFAQs
- श्रमयोगी मानधन योजना कोणासाठी आहे?
श्रमयोगी मानधन योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे. - श्रमयोगी मानधन योजना कोणी सुरू केली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 रोजी ही योजना सुरू केली. - श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा काय?
निवृत्ती वय झाल्यानंतर महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळते. - श्रमयोगी मानधन योजनेमध्ये किती रुपये गुंतवणूक करावी लागेल?
श्रमयोगी मानधन योजनेमध्ये महिन्याला केवळ 55 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 3 हजार रुपये पेन्शन मिळते. - श्रमयोगी मानधन योजनेचा कोणाला मिळतो?
श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार म्हणजेच भाजीवाले, रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिल्या, शेतमजूर आदींना या योजनेचा लाभ दिला जातो. - श्रमयोगी मानधन योजनेचा अर्ज कसा करावा
- तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन केंद्र सरकारची अधिकृत श्रमयोगी मानधन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्टर करू शकता.