PM Surya Ghar Yojana : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, 78 हजारांपर्यंत सबसिडी

PM Surya Ghar Muft Bijli Yojana : योजनेची संपूर्ण माहिती

PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची सुरुवात केली. सरकारी आकड्यानुसार आत्तापर्यंत पंतप्रधान सूर्य घर मोफत योजनेअंतर्गत 50 लाखापेक्षा अधिक लोकांचे घर प्रकाशमान करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान सूर्यघर योजनेची लाभार्थ्याची संख्या वेगाने वाढत आहे. लाईट, पंखा, एसी, कुलर किंवा फ्रिज असेल किंवा कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वीज विला पासून सुटका होते. या कारणामुळे या योजनेअंतर्गत 300 युनिट वीज मोफत दिली जाते. यासोबतच सोलर पॅनल लावण्यासाठी येणाऱ्या खर्चामध्ये सरकारकडूनही मोठी सबसिडी देण्यात येते.

तुम्ही देशातील कुठल्याही राज्यात राहत असाल तुमच्यासाठी पंतप्रधान सूर्य घरी योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला सोलर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. तसेच काही राज्य सरकारे या अनुदानामध्ये अजून भर घालतात तर बिहार सारख्या राज्यामध्ये अनुदान 98 हजार रुपये पर्यंत मिळते इतर राज्यात ते 78 हजार रुपये एवढे आहे.

2024 ला योजना सुरू आतापर्यंत 50 लाख लाभार्थी

PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी ही योजना सुरू केली. ही योजना फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना या नावाने सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशात 2027 पर्यंत 1 कोटी घरावर सोलर पॅनल लावण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे आणि आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार 50 लाखापेक्षा अधिक घरावर सरकारी योजनेअंतर्गत सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात देणाऱ्या वीज बीलातून सुटका झाली आहे.

300 युनिट मोफत वीज

पंतप्रधान सूर्यघर योजनेची लोकप्रियता या योजनेच्या लाभामध्ये आहे. पीएम सूर्यघर योजना अंतर्गत नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाते. सरकारकडून तुमच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाते. या योजनेअंतर्गत दोन दशकापेक्षा अधिक झिरो इलेक्ट्रिसिटी बिल चा लाभ मिळतो असे यासाठी की या योजनेअंतर्गत छतावर सोलर पॅनल इंस्टॉल केल्यानंतर साधारणतः पुढील 25 वर्षापर्यंत त्याची लाईफ असते. त्यामुळे 25 वर्षापर्यंत वीज बीलातून तुमची कायमची सुटका होते.

पीएम सूर्य घरी योजनेतून मिळणाऱ्या अनुदान

1 kw solar panel suubsidy : केंद्र सरकारकडून 1 kw सोलर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला 30 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते.
2 kw solar panel suubsidy : दोन किलो वॅट सोलर पॅनल छतावर लावण्यासाठी केंद्र सरकारकडून 60000 रुपये अनुदान देण्यात येते.
3 kw solar panel suubsidy : जर तुमचा विजेचा वापर अधिक आहे तर तुमच्यासाठी तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सोलर पॅनल इंस्टॉल करता येते. यासाठी केंद्र सरकारकडून अधिक तर 78 हजार रुपये अनुदान देण्यात येते.

थोडक्यात माहिती

PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही घरगुती ग्राहकांना रूफटॉप सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची योजना आहे. पात्र ग्राहकांना सोलर सिस्टिमच्या क्षमतेनुसार केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळते. 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेच्या सिस्टिमसाठी केंद्रीय अनुदानाची कमाल रक्कम ₹78,000 पर्यंत आहे.

अनुदान किती मिळते?

  • 1 किलोवॅट: ₹30,000 पर्यंत
  • 2 किलोवॅट: ₹60,000 पर्यंत
  • 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त: ₹78,000 पर्यंत

अर्ज कसा करायचा?

  1. पीएम सूर्य घरच्या अधिकृत पोर्टलवर जा.
  2. राज्य आणि संबंधित DISCOM निवडा.
  3. वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि ई-मेलची माहिती द्या.
  4. पोर्टलवरील प्रक्रियेनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
  5. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर नोंदणीकृत विक्रेत्यामार्फत सोलर पॅनल बसवा.
  6. सोलर बसवल्यानंतर नेट मीटरिंगची प्रक्रिया पूर्ण करा.
  7. DISCOM तपासणी आणि कमिशनिंगनंतर आवश्यक बँक खात्याची माहिती पोर्टलवर द्या.
  8. पात्रतेनुसार अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.

पीएम सूर्यघर योजनेची अर्ज प्रक्रिया

सर्वात प्रथम तुम्ही पीएम सूर्यघर योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यावर अप्लाय फॉर रूट ऑफ सोलर हा पर्याय निवडा. नवीन पेजवर राज्य वीज वितरण कंपनीची निवड करा. त्यानंतर वीज ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.

नवीन पेजवर कंजूमर ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा. आता अर्जावर दिलेल्या नियमानुसार आरटीएस पॅनल यावर अप्लाय करा. त्यानंतर तुम्हाला फिजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल.
यानंतर तुम्ही आपल्या Discom च्या सोबत रजिस्टर वेंडर द्वारे सोलर पॅनल इंस्टॉल करू शकता.
इन्स्टॉलेशन नंतर तुमचा प्लॉट डिटेल्स सोबतच नेट मीटर साठी अर्ज करावे लागेल. मीटर इन्स्टॉल झाल्यानंतर आणि डिस्कॉमचे तपासणीनंतर कमिशनिंग सर्टिफिकेट जारी होईल.

हे मिळाल्यानंतर तुम्ही पोर्टलवरून बँक खाते संबंधित माहिती आणि कॅन्सल चेक द्याव लागेल. यावर सबसिडी अनुदान जमा होईल. यासाठी तुम्हाला 30 ते 45 दिवस थांबावे लागेल. त्या काळामध्ये तुमच्या खात्यामध्ये सबसिडी जमा होईल.

Read About : EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon : आता UPI मधून PF चे पैसे सोप्या पद्धतीने काढा

website : yojanamazi.com