PMSBY सुरक्षा योजनेत 20 रुपयात मिळवा 2 लाखाचा इन्शुरन्स

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana 2026 : 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात लाभ

PMSBY आपल्याला कुठलीही विमा पॉलिसी घ्यायची असेल तर हजारो रुपये प्रीमियम भरावा लागतो, मात्र तुम्हाला माहिती आहे का की, मोदी सरकार वर्षाला केवळ 20 रुपये प्रीमियम भरून 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. खरंच ही गोष्ट खरी आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना खूप लोकप्रिय आहे. ही एक अपघात विमा योजना आहे. केंद्र सरकारने मध्यम उत्पन्न वर्गातील नागरिकांसाठी विमा लाभ देण्याच्या उद्देशाने पीएमएसबीवाय (PMSBY) ची सुरुवात केलेली आहे. या योजनेचा लाभ 18 ते 70 वयोगटातील प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना केंद्र सरकारची एक अशी योजना आहे ज्याचा लाभ कोट्यावधी लोकांना मिळत आहे. 2022 पर्यंत या योजनेमध्ये जवळपास 29 कोटी लोक जोडले गेले होते. जर तुम्हीही आतापर्यंत या योजनेची जोडले नसाल तर, उशीर करू नका कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला 20 रुपयांमध्ये 2 लाख रुपयाचे इन्शुरन्स मिळते. जे संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबाला आर्थिक मदत देते.

20 रुपयाची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

PMSBY ही केंद्र सरकारची वैयक्तिक अपघात इन्शुरन्स योजना आहे. यामध्ये प्रीमियम द्यावा लागतो जो केवळ 20 रुपये आहे. 20 रुपयात तुम्हाला 2 लाख रुपयाचे इन्शुरन्स कव्हर दिले जाते. कुठल्याही अपघातात मृत्यू होणे किंवा अपंगत्व येणे यावर सरकार निश्चित करते की किती मदत करायची.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय?

देशातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारचे अपघातात मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. ही एक अपघात विमा योजना आहे. ती खूप कमी प्रीमियम मध्ये एक्सीडेंट इन्शुरन्स देते. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 9 मे 2015 रोजी केली होती. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत केवळ 20 रुपयात च्या प्रीमियम मध्ये 2 लाख रुपयाचे एक्सीडेंटल इन्शुरन्स दिले जाते. 

या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षाला आपल्या बँक खात्यातून 20 रुपये या योजनेसाठी प्रीमियम म्हणून कट केले जातात. जर इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीचा अपघात झाला आणि ती पूर्णतः विकलांग झाली तर तिला 2 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स म्हणून दिले जातात. जर विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला तर कुटुंबांना हे पैसे दिले जातात.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा उद्देश

आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांना विमा संरक्षण देणे.
समाजातील प्रत्येक वर्गातील व्यक्तीचे भविष्य सुरक्षित करणे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची वैशिष्ट्ये

20 रुपये प्रीमियम मध्ये 2 लाख रुपयाचे इन्शुरन्स कव्हर.
1 ते 31 मे दरम्यान विम्याचा प्रीमियम तुमच्या खात्यातून कट होतो.
18 ते 70 वयोगटातील व्यक्तीला हा इन्शुरन्स घेता येतो.
या इन्शुरन्स मध्ये अपंगत्व आल्यावरही आर्थिक मदत मिळते.
विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातात.

Pm विमा योजनेचा हा नियम जाणून घ्या

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना मध्ये विमाधारक व्यक्तीचा अपघाता दरम्यान मृत्यू झाला किंवा त्याला पूर्णपणे अपंगत्व आले तर त्या व्यक्तीला 2 लाख रुपये दिले जातात. 
जर व्यक्ती कुठल्या अपघातात दरम्यान अंशतः अपंग झाला असेल तर सरकार 1 लाख रुपये या योजनेअंतर्गत देते.

पीएम सुरक्षा बीमा योजनेची वयोमर्यादा

आजच्या काळामध्ये 20 रुपयात केवळ एक कप चहा येतो, मात्र तुम्ही या चहाचे पैसे वाचून 2 लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळवू शकता तेही सरकारच्या गॅरंटीसह. पंतप्रधान सुरक्षा बिमा योजना चा लाभ घेणे संकटाच्या वेळेस कुटुंबाला आर्थिक मदत ठरते. ही योजना वर्षाला रिन्यू केली जाते. या योजनेचा लाभ 18 ते 70 वयोगटातील देशातील कुठलाही व्यक्ती घेऊ शकतो.

PMSBY मध्ये ऑटो डेबिटची सुविधा

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे ऍक्टिव्ह बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. एक पेक्षा अधिक बँक खाते असल्यावर केवळ एकाच बँक खात्याला या योजनेचा विमा संरक्षण चा लाभ दिला जातो. प्रत्येक वर्षाच्या 1 जूनला या योजनेअंतर्गत ऑटो डेबिट सुविधा द्वारे तुमच्या बँक खात्यातून 20 रुपये प्रीमियम कट केला जातो. बँक खात्यामध्ये विमा प्रीमियम चे पैसे थेट डेबिट होतात। यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी 20 रुपयांची रक्कम ठेवणे आवश्यक आहे. पीएमएसबीवाय PMSBY योजनेअंतर्गत अनरोलमेंट पीरियड 1 जून ते 31 मे पर्यंत असतो.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची अर्ज प्रक्रिया

Pmsby योजनेसाठी नेट बँकिंगच्या माध्यमातून अर्ज करता येते.
ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जावे लागेल.
तेथे तुम्ही या योजनेचा फॉर्म घेऊन त्यावर संपूर्ण माहिती अपलोड करून बँकेत जमा करू शकता.
अर्जावर संपूर्ण माहिती योग्य आणि अचूक भरणे आवश्यक आहे आणि नॉमिनी चे नाव देणे ही आवश्यक आहे.
बँकेत अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला पोचपावती दिली जाईल.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी ची कागदपत्रे

आधार कार्ड 
आधार कार्ड सिलिंग असलेले बँक अकाउंट खाते 
इन्शुरन्स चा हप्ता कट होण्यासाठी ऑटो डेबिट ची सहमती

सरकारने आतापर्यंत केले एवढे पेमेंट

PMSBY Scheme मोदी सरकारने 9 मे 2015 ला सुरू केली होती. सरकारी आकडे पाहिले तर या योजनेच्या सुरुवातीला मे 2024 पर्यंत सरकारला एकूण 1,80,812 दावे प्राप्त झाले होते आणि 1,37,404 दावे चे क्लेम सेटलमेंट केले होते. यावर सरकारने  2,728.85 कोटी रुपयांचे विमा रक्कम दिली होती. तर जून 2024 पासून ते 16 एप्रिल 2025 पर्यंत योजनेमध्ये 36.86 कोटी नवीन खातेधारक जोडल्या गेले होते. या कालावधीमध्ये 33,906 दाव्यातील 19,024 दाव्याचे सेटलमेंट करण्यात आले आणि सरकारने 377.73 कोटी रुपयांची रक्कम क्लेम पेमेंट वर खर्च केली होती.

Read About : EPFO makes PF withdrawal easier upi facility coming soon : आता UPI मधून PF चे पैसे सोप्या पद्धतीने काढा

website : yojanamazi.com