Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 Information In Marathi : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 : भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने विविध सरकारी योजना सुरू केल्या आहेत. ही योजना मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व देशातील मत्स्य पालनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना 2024 सुरू केलेली आहे.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवता येईल. मत्स्य विभाग, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जात आहे. देशातील मत्स्य व्यवसाय क्षेत्रात शाश्वत आणि सर्वांगीण विकासाद्वारे ब्लू क्रांती घडवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मच्छीमारांच्या कल्याणासह मत्स्य व्यवसाय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. PMMSY योजनेची अंमलबजावणी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये करण्यात येणार आहे. मत्स्य क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
चला तर मग आज आपण केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने PMMSY संदर्भातील संपूर्ण माहिती पाहूया यामध्ये या योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेचा लाभ कसा घ्यावा? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत आदी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची संपूर्ण माहिती
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2020 रोजी केंद्रीय मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री यांच्यासह बिहारचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉल करून द्वारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना PMMSY या योजनेचे उद्घाटन केले आहे. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची ही विशेष योजना आहे. जगभरात भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक आणि चौथा सर्वात मोठा मासे निर्यात करणारा देश आहे.
प्रधानमंत्री मत्स्य योजना PMMSY 2020-21 पासून ते 2024-25 पर्यंतच्या कालावधीत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे. या योजनेत केंद्र सरकार 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मस्त व्यवसायामध्ये करण्यात आलेली ही केंद्र सरकारकडूनची आत्तापर्यंत सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. या रकमेपैकी 12,340 कोटी रुपये हे सागरी आंतरराष्ट्रीय मत्स्य पालन आणि मत्स्य पालन क्षेत्रातील लाभार्थी केंद्रित उपकरणासाठी प्रस्तावित आहेत आणि सुमारे 710 कोटी हे मत्स्यपालन पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी PM Matsya Sampada Yojana 6000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर मत्स्य पालन करणाऱ्या लोकांना सक्षम करण्यासाठी 600 कोटी रुपयेच्या खर्चासह प्रधानमंत्री मत्स्य योजनेअंतर्गत एक उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असून कृषी कर्जाचे लक्ष हे 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
PM Matsya Sampada Yojana देशातील कृषी क्षेत्रातील स्टार्टअप ला प्राधान्य देणाऱ्या व्यवसाय संबंधित योजना सुरू करण्यात येतील व तरुण उद्योगांना ॲग्री स्टार्टअप साठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी ॲग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड ची स्थापना करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे :
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2024 मराठी माहिती
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 Information In Marathi
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची संपूर्ण माहिती
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024
प्रधानमंत्री मस्त संपदा योजनेची थोडक्यात माहिती
PM Matsya Sampada Yojana In Short
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्दिष्ट
PM Matsya Sampada Yojana Objective
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Benefits
मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी
Beneficiaries Of PMMSY Scheme
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लक्ष
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
या योजनेअंतर्गत धोरणात्मक प्राधान्यक्रम
PM Matsya Sampada Yojana
PMMSY मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 Online Registration
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना हेल्पलाइन नंबर
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रधानमंत्री मस्त संपदा योजनेची थोडक्यात माहिती
PM Matsya Sampada Yojana In Short
योजनेचे नाव | प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना |
कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
कधी सुरू केली | 10 सप्टेंबर 2020 |
विभाग | मत्स्य व्यवसाय विभाग पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय |
लाभार्थी | देशातील मच्छीमार व मत्स्य व्यवसाय करणारे नागरिक |
लाभ | मत्स्य उत्पादकता, मत्स्यपालन उत्पादन वाढविणे |
निधी किती | 20 हजार 50 कोटी रुपये |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत वेबसाईट | www.pmmsy.dof.gov.in |
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे उद्दिष्ट
PM Matsya Sampada Yojana Objective
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून 2024-25 पर्यंत मत्स्य उत्पादनात 70 लाख टन पर्यंत अतिरिक्त वाढ करणे.
- देशातील मच्छीमार आणि मत्स्यपालन करणाऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.
- मासे पकडल्यानंतर चे नुकसान 20- 25% वरून 10 टक्के पर्यंत कमी करणे.
- मस्त व्यवसाय क्षेत्र आणि संबंधित व्यवसायामध्ये अतिरिक्त 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
- PMMSY योजनेच्या माध्यमातून फार्म एन्ट्री वे पासून रिटेल आउटलेट पर्यंतच्या साखळीच्या सध्याच्या फ्रेमवर्कमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
- मच्छीमार आणि मासे पालन करणाऱ्यांसाठी सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा सरकारकडून देण्यात येणार आहे. देशातील सक्रिय मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासकीय संरचना निश्चित केली जाईल.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे फायदे
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana Benefits
- केंद्र सरकारने देशातील मच्छीमारांना व मत्स्यव्यवसायिकांना उत्पादन क्षेत्रात लाभ व्हावा यासाठी ही योजना सुरू केली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून देशातील मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे.
- PMMSY योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांची आर्थिक स्थिती सुधारेल.
- मत्स्य उत्पादक, मत्स्य कामगार, मच्छिमार, मासे व्यापारी तसेच इतर मासेमारी यांना रोजगाराच्या 55 लाख संधी निर्माण होणार आहेत.
- मत्स्यपालनासाठी तलाव आणि फीडमिल गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची आवश्यकता असेल.
- या योजनेअंतर्गत मत्स्य कामगारांसाठी सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे.
मत्स्यसंपदा योजनेचे लाभार्थी
Beneficiaries Of PMMSY Scheme
मच्छीमार
मत्स्य कामगार आणि मासे विक्रेते
मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ
अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग व्यक्ती
मत्स्य पालन सहकारी संस्था
मत्स्य व्यवसाय फेडरेशन
मत्स्य पालन क्षेत्रातील बचत गट
उद्योजक आणि खाजगी कंपन्या
मत्स्य उत्पादक संस्था
केंद्र सरकार आणि केंद्र सरकारी संस्था
राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, केंद्रशासित संस्था
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचे लक्ष
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
PM Matsya Sampada Yojana योजनेअंतर्गत एकच सिस्टीम मध्ये 20 हजार पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक करणे.
2018-19 मधील 75 दशलक्ष मेट्रिक टन वरून मत्स्यसंपदा ही 2024 पर्यंत 22 दशलक्ष मेट्रिक टन वाढवणे हे या योजनेचे लक्ष आहे.
या योजनेअंतर्गत निर्यात कमाई ही 2018-19 मधील 46 हजार 589 कोटी वरून 2024-25 पर्यंत 1 लाख कोटी पर्यंत करणे.
मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे कृषी GVA मधील योगदान 28 टक्के वरून 9 टक्के पर्यंत करणे.
देशात मासळीचा वापर दरडोई 5 किलो वरून 12 किलो पर्यंत वाढवणे.
काढनी नंतरचे नुकसान 20 ते 25 टक्के वरून 10 टक्के पर्यंत कमी करणे हा या योजनेचे लक्ष आहे.
रोजगारांना 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभदायक रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे.
मच्छिमार आणि मत्स्यपालनांचे उत्पन्न वाढवणे.
या योजनेअंतर्गत धोरणात्मक प्राधान्यक्रम
PM Matsya Sampada Yojana
थंड पाण्याची मत्स्यपालन
समुद्री शैवाल लागवड
सागरी मत्स्यपालन
मच्छीमारांचे कल्याण
अंतरदेशीय मत्स्यपालन
जलिय आरोग्यवस्थापन
शोभिवंत मत्स्य पालन
पायाभूत सुविधा आणि कापणी नंतरचे व्यवस्थापन
इतर महत्त्वाची उपक्रम
PMMSY मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठीची PM Matsya Sampada Yojana मार्गदर्शक तत्वे ही 30 जून 2020 रोजी सुरू केली आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारने मोठी गुंतवणूक केली आहे. या योजनेसाठी 9407 कोटी केंद्र सरकारने तर राज्य सरकारने 4880 कोटी आणि 5763 कोटी लाभार्थ्यांचे योगदान या योजनेअंतर्गत असेल.
अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीसाठी क्लस्टर किंवा क्षेत्र आधारित दृष्टिकोन आवश्यक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंक केज आणि अँड सोल्युशनसह इष्टतम परिणाम मिळवण्यासाठी वापरला जाईल.
या योजनेअंतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी जलसंवर्धनासाठी पडीक जमीन आणि पाण्याचा दर्जा यासाठी सर्क्युलेटरी एक्वाकल्चर सिस्टम्स, बायोलॉग, एक्वापोनिक्स, केज कल्टिवेशन इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
खारे पाणी आणि क्षारयुक्त भागात थंड पाण्यातील मत्स्य मालन विकास आणि मत्स्य शेतीचा विस्तार यावर विशेष लक्ष ठेवले जाईल.
या योजनेअंतर्गत रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्यासाठी मॅरीकल्चर, सिव्हिड लागवड आणि शुभेच्छा उपक्रमांना चालना दिली जाईल.
जम्मू आणि काश्मीर, लडाख, बेटे, ईशान्य आणि प्रेरणादायी जिल्ह्यांमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल.
या योजनेअंतर्गत आवश्यक पायाभूत सुविधा देखील केल्या जातील. तसेच एकात्मिक आधुनिक किनारी मासेमारी गावांद्वारे किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायांचा सर्वांगीण विकास केला जाईल.
मच्छीमार आणि मत्स्य पालकांची सौदाशक्ती वाढविण्यासाठी मत्स्य उत्पादक संस्थांमधून एकत्रीकरण केले जाईल.
मत्स्य पालन सुविधांचे केंद्र म्हणून एक्वापार्क विकसित केले जाते.
प्रधानमंत्री मत्स्य पालन योजनेअंतर्गत सरकारी आणि खाजगी क्षेत्रामार्फत मत्स्य पालक उष्मायन केंद्र ची स्थापना करण्यात येईल.
दुबळ्या कालावधीत मच्छिमारांना वार्षिक उपजीविका सहाय्य केले जाईल.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Pradhan Mantri Matsya Sampada Yojana 2024 Online Registration
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत वापरावी लागेल.
या योजनेअंतर्गत सुमारे 29 लाभ दिले जाणार आहेत. या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी युनिट किमतीच्या 60% भव्य खर्चाची तरतूद केली जाईल. तर युनिट किमतीच्या 40% इतर प्रयोगांना दिली जाईल.
या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
त्यानंतर तेथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल
लॉगीन केल्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल
त्यामध्ये क्विक लिंक्स येथील टेम्पलेट या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला पेजच्या डाव्या बाजूला टेम्प्लेट फॉर प्रिपरेशन ऑफ डीपीआर फॉर फिशर्स प्रोजेक्ट हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यापैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा
त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा
त्यानंतर तुम्हाला तुमचा SCP DPR तयार करा त्यानंतर मत्स्य व्यवसाय विभागाकडे तुमचा अर्ज सबमिट करा
DPR तयार करण्यासाठी टेम्पलेट अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकते
युनिट किमतीपेक्षा DPR आणि SCP ची किंमत ही जास्त असू शकते परंतु युनिटच्या किमतीनुसार तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाईल.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना हेल्पलाइन नंबर
1800-425-1660
FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न: प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा उद्देश काय?
उत्तर: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत मत्स्य आणि मत्स्य पालन उत्पादन वाढविणे आणि देशातील मच्छीमारांची परिस्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रश्न: पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेसाठी कसा करावा अर्ज?
उत्तर: पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.
प्रश्न: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी सुरू झाली?
उत्तर: प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही 10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA