Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents In Marathi : नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents In Marathi : रस्त्या अपघात कोणत्याही जखमी व्यक्तीला दीड लाख रुपयापर्यंत मोफत कॅशलेस उपचार उपलब्ध करून देणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. कॅशलेस उपचारा संदर्भात येत्या मार्च महिन्यापर्यंत सरकार एक नवीन योजना आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents In Marathi देशात कुठेही अपघात झाला असेल आणि यामध्ये कोणी जखमी झाले असेल तर त्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण कडून पोलीस, रुग्णालय आणि राज्य आरोग्य संस्थेच्या समन्वयातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अपघात झालेल्या दिवसापासून सात दिवसाच्या कालावधीत जखमी व्यक्ती जास्तीत जास्त दीड लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकणार आहे. केंद्र सरकार मार्चपर्यंत यासंबंधीची योजना आणणार आहे.
मार्चपासून सुरू होणारी योजना
Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents ही योजना लागू करण्याची जबाबदारी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची असणार आहे. येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये मोटर वाहन संशोधन कायदा सादर केला जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने 14 मार्च 2024 ला रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक योजना प्रायोगिक सुरू केली होती. ही योजना सुरू केल्यानंतर 6 राज्यांमध्ये लागू करण्यात आली. आता मार्चपासून संपूर्ण देशांमध्ये ही योजना लागू करण्यात येणार आहे.
Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents रस्ते व परिवहन मंत्रालयाने 14 मार्च 2024 रोजी रस्ते अपघातातील जखमीसाठी कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रायोगिक कार्यक्रम चंदिगड मध्ये सुरू केला होता. रस्त्यावरील जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश ठेवण्यात आला होता. त्यानंतर ही योजना सहा राज्यात राबवण्यात आली. आता ही योजना देशभर सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली आहे.
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्री Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी मंगळवारी रस्ते अपघातातील जखमींना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक नवीन योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की मागील वर्षांमध्ये देशभरात अपघातामध्ये 1.8 कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. 42 व्या परिवहन विकास परिषदेच्या बैठकीमध्ये रस्ते सुरक्षा या विषयाला प्राधान्य देण्यात आले.
Union Minister Nitin gadkari announce cashless treatment for victims of road accidents रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या नागरिकांना देशांमध्ये मार्च पर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले की कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर वाहनामुळे अपघात झाला असेल त,र जखमींना 7 दिवसात पर्यंत प्रति अपघात, प्रति व्यक्ती 1.5 लाख रुपये पर्यंत कॅशलेस उपचार देण्यात येणार आहेत.
ट्रक, बसला रेल्वेसारखी कवच सुरक्षा प्रणाली आणणार
42 व्या परिवहन विकास परिषदेमध्ये रस्ते सुरक्षेला प्राथमिकता देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात आला आहे की, वाहन तयार करणाऱ्या कंपन्या जड वाहन म्हणजेच बस, ट्रक तयार करतात त्यात तीन सुरक्षा तंत्रज्ञान अनिवार्य असेल. ही तंत्रज्ञान ट्रक आणि बस मध्ये क्लाऊड रेल्वेच्या कवच सुरक्षा प्रणाली सारखी सुरक्षा देऊ शकते. नवी दिल्लीमध्ये दोन दिवस कार्यशाळा झाली.
पहिल्या दिवशी सोमवारी 27 राज्यातील परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्तांसोबत केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी बैठक घेतली तर मंगळवारी Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी परिवहन मंत्रींसोबत बैठक घेतली.
नितीन गडकरी म्हणाले की रस्ते अपघात थांबवण्यासाठी जड वाहनांना तीन तंत्रज्ञान वापरणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी बेकिंग सिस्टीम मुळे दोन वाहनाची धडक होण्यापासून थांबवले जाऊ शकते तर ड्रायव्हर ड्रायविंग सिस्टीम अलर्ट अशा प्रकारचे ऑडिओ सिस्टीम असेल जे ओळखेल की ड्रायव्हरला झोप येत आहे आणि तो आलार्म वाजवून ड्रायव्हरला सतर्क करेल.
गडकरींनी सुरू केली ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर पॉलिसी
2024 मध्ये रस्ते अपघातामध्ये ज्या 1.80 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 35 हजार मृत्यू विना ड्रायव्हिंग लायसन असलेल्या चालकांमुळे झाला आहे. चालक प्रशिक्षित असावा यासाठी मंत्रालयाने चालक ट्रेनिंग पॉलिसी सुरू केली आहे.
या अंतर्गत देशभरामध्ये साडेबाराशे नवीन ट्रेनिंग सेंटर आणि फिटनेस सेंटर सुरू केले जाणार आहेत. यात मंत्रालय कडून जवळपास साडेचार हजार कोटी रुपये ची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या सेंटर मधून जवळपास 25 लाख नवीन चालक ट्रेनिंग घेऊन लायसन्स सह बाहेर येतील आणि त्यांना रोजगार मिळेल तर जवळपास 15 लाख लोकांना या सेंटरमध्ये रोजगार मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑटो मेटेल टेस्टिंग सेंटर ची देखील स्थापना करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना Nitin Gadkari नितीन गडकरी यांनी जयपुर मध्ये झालेल्या अपघाताचा उल्लेख केला आहे ते म्हणाले की, हा चालक सकाळी 4.30 पासून रात्री 9.30 वाजेपर्यंत गाडी चालवत होता. युरोपात कुठलाही चालक 8 तासापेक्षा अधिक गाडी चालू शकत नाही भारतामध्ये 22 लाख चालकांची कमतरता आहे.
मंत्रालय यावर या सल्ल्यावर पुढे जात आहे की अशी व्यवस्था असावी की आधार कार्ड द्वारे स्कॅन करून इंजन स्टार्ट होऊ शकेल आणि आठ तासानंतर ते इंजन तेव्हांच सुरू होईल जेव्हा दुसरा चालक आपले कार्ड स्कॅन करेल. यावरही सरकार विचार करत असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.