road accident victims will get cashless treatment 2025 in marathi : सोमवारपासून योजना लागू
Cashless Treatment Scheme India 2025 : देशभरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपघाताची संख्या ही वाढली आहे. त्यामुळे आता देशातील रस्ते अपघातातील पिडित्यांना सरकारच्या यादीतील रुग्णालयामध्ये पहिल्या 7 दिवसात 1.5 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. या संदर्भात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी एक अधिसूचना जारी केली आहे.
road accident victims to get cashless treatment of up to rs 1.5 lakh सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील रस्ते अपघातात जखमी झालेल्या पिडितांसाठी कॅशलेस उपचार योजना 2025 ही सोमवार दिनांक 5 मे पासून देशभरात लागू करण्यात आली आहे.
road accident victims to get cashless treatment of up to rs 1.5 lakh राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, पोलीस प्रशासन, रुग्णालय, राज्य आरोग्य संस्था आदींनी समन्वय साधून ही योजना राबवायचे आहे. सरकारच्या यादीमध्ये नसलेल्या रुग्णालयात उपचार घेतल्यास विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू होते प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या हाती या कॅशलेस उपचार योजनेची सूत्रे देण्यात येणार आहेत.
road accident victims will get cashless treatment रस्ते अपघात पिडितासाठी कॅशलेस उपचार योजना 2025 ची अंमलबजावणी च्या देखरेखेवर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची संचालक समिती काम करणार आहे. या समितीमध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ व भ्रष्ट वाहतूक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सदस्य असणार आहेत.
महाराष्ट्राने राबवली सर्वात प्रथम योजना
Cashless Treatment Scheme India केंद्र सरकारच्या योजनेपूर्वीच महाराष्ट्र सरकारने राज्यातील रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी 1 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार देण्याची एक योजना सुरू केली आहे. त्याचा राज्यातील मोठ्या प्रमाणात जखमी रुग्णांना फायदा होत आहे. आता केंद्र सरकारच्या योजनेत उपचार रक्कम 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे.