SWAMITVA Yojana 2024 In Marathi : ड्रोनद्वारे होणार मालमत्तेची मोजणी

Table of Contents

SWAMITVA Yojana 2024 Information In Marathi : स्वामित्व योजना 2024 मराठी माहिती

SWAMITVA Yojana : स्वामित्व योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून 2020-21 मध्ये 24 एप्रिल 2020 ला सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर 24 एप्रिल 2021 ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंचायत राज मंत्रालय, राज्य राजस्व विभाग, राज्य पंचायत राज विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभाग (एसओआय) च्या संयोगाने स्वामित्व योजना लागू करण्यात आली आहे.

SWAMITVA Yojana ही योजना सुरू करण्यासाठी राज्यांना भारतीय सर्वेक्षण विभागासोबत करार करण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी एसओआय सोबत करार करून या करारावर सह्या केल्या आहेत. 26 जुलै 2023 पर्यंत देशातील 2 लाख 70 हजार 924 गावात स्वामित्व योजनेच्या अंतर्गत ड्रोन च्या माध्यमातून मालमत्ता मोजणीचे काम करण्यात आले आहे.

SWAMITVA Yojana भारतीय सर्वेक्षण विभागाअंतर्गत स्वामित्व योजना च्या माध्यमातून तयार केलेल्या नकाशे आणि मोजणीच्या आधारावर संपत्ती कार्ड तयार करणे आणि वितरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र पंचायत राज मंत्रालय स्वामित्व योजनेअंतर्गत तयार केलेले संपत्ती कार्ड डीजी लॉकर वर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशासोबत संवाद साधत आहे. 26 जुलै 2023 पर्यंत 89 हजार 749 गावांमध्ये संपत्ती कार्ड तयार करण्यात आले आहेत.


योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले नकाशे मालमत्ता ची कागदपत्रे याद्वारे ग्रामीण क्षेत्रात संपत्ती संबंधित डिजिटल नकाशे देण्यात येत आहे. देशातील जवळपास 6.62 लाख गावांचा 5 वर्षात या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.

SWAMITVA Yojana केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत असते. आजच्या लेखातुन आपण देशातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे प्रधानमंत्री स्वामित्व योजना. या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना ई प्रॉपर्टी कार्ड E Property Card देणे हा आहे. स्वामित्व योजना ही केंद्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली योजना आहे.

PM SWAMITVA Yojana या योजनेची सुरुवात 24 एप्रिल 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या योजनेची सुरुवात पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून देशातील सरपंचांशी संवाद साधून स्वामित्व योजना सुरू करण्याची घोषणा केली. ही योजना सुरू करण्यामागचा सगळ्यात मोठा उद्देश म्हणजे जमिनीचा मालकी हक्क असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे ई प्रॉपर्टी कार्ड E Property Card देणे. या योजनेच्या माध्यमातून खेड्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रत्येक जमिनीचे मोजमाप केले जाईल. हे मोजमाप ड्रोन द्वारे केले जाईल.

SWAMITVA Yojana

PM SWAMITVA Scheme आजच्या लेखातून आपण स्वामीत्व योजना म्हणजे काय?, समित्व योजनेची काय आहेत फायदे, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पात्रता?, समित्व योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? या संपूर्ण प्रश्नांची माहिती आजच्या लेखातून पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

स्वामीत्व योजना म्हणजे काय

What Is PM SWAMITVA Yojana

SWAMITVA Yojana समित्व योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. स्वामीत्व योजनेची सुरुवात 24 एप्रिल 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या योजनेची घोषणा केली. देशात संपूर्ण भागात जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद-विवाद सुरू असतात गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्रांबद्दल संपूर्ण माहिती नसते त्यामुळे जमिनीवर नकळत कब्जा केला जातो आणि त्यांना त्यांच्या मालकी हक्काची जमीन मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांची स्वतःची जमीन मिळत नाही या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

समित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे ड्रोन च्या सहाय्याने मोजमाप केले जाणार आहे आणि या जमिनीच्या मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार केला जाणार आहे. तसेच उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीचे ई प्रॉपर्टी कार्ड E Property Card  दिले जाणार आहे.

PM SWAMITVA Scheme स्वामीत्व योजनेचा मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत जमिनीचा जो मालक आहे त्याला ई प्रॉपर्टी कार्ड E Property Card देण्यात येणार आहे. स्वामीत्व योजनेअंतर्गत जमीन मालकाला त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल त्यावर क्लिक करून ते त्यांचेही प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच संपत्ती कार्ड डाउनलोड करू शकतात. या योजनेची सुरुवात आतापर्यंत 6 राज्यात करण्यात आली आहे

SWAMITVA Yojana स्वामीत्व योजनेअंतर्गत जागेची मोजणी करण्यात येणार आहे यापूर्वी शेतीची मोजणी पारंपारिक पद्धतीने करण्यात येत होती. यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळही लागत होते. मात्र आता या योजनेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यात येते. यासाठी ड्रोन ची मदत घेऊन ही मोजणी करण्यात येते.

SWAMITVA या वाक्याचा फुल फॉर्म काय

SWAMITVA Full Form

Server of village and Mapping With improvised Technology in village Area असा याचा अर्थ आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठी तिच्या उद्देशासाठी पंतप्रधान मोदी यांनी ही स्वामित्व योजना सुरू केली आहे. स्वामित्व योजना महाराष्ट्र चा मुख्य उद्देश म्हणजे जमिनीचे मॅपिंग करून जागेच्या योग्य मालकांना त्यांच्या जागेचा हक्क मिळवून देणे हा आहे.

ठळक मुद्दे :

स्वामीत्व योजना म्हणजे काय

What Is PM SWAMITVA Yojana

SWAMITVA या वाक्याचा फुल फॉर्म काय

SWAMITVA Full Form

स्वामित्व योजनेची थोडक्यात माहिती

SWAMITVA Scheme In Short

स्वामीत्व योजनेचे उद्दिष्ट

SWAMITVA Yojana Purpose

स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये

PM SWAMITVA Scheme Features

स्वामित्व योजनेचे लाभार्थी

SWAMITVA Yojana Benefisior

स्वामित्व योजनेचे फायदे

SWAMITVA Yojana Benefits

स्वामित्व योजनेची अंमलबजावणी

PM SWAMITVA Yojana Scheme

स्वामित्व योजनेचे स्वरूप

PM SWAMITVA Yojana

स्वामित्व योजना अंतर्गत केले जाणारे सर्वेपरीक्षन

PM SWAMITVA Scheme

स्वामित्व योजना अंतर्गत मोजमाप झालेल्या जमिनीची तक्रार करण्याबाबतची प्रक्रिया

SWAMITVA Yojana

ई प्रॉपर्टी कार्ड न मिळण्याची कारणे

E Property Card

स्वामित्व योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

SWAMITVA Yojana Documents

स्वामित्व योजनेची अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Apply

स्वामित्व योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Online Apply

स्वामित्व योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Application

ई प्रॉपर्टी कार्ड

E Property Card

प्रॉपर्टी कार्ड काढण्याची प्रक्रिया E Property Card

डिजिटल साक्षरी प्रॉपर्टी कार्ड काढण्याची प्रक्रिया

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे E Property Card

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

स्वामित्व योजनेची थोडक्यात माहिती

SWAMITVA Scheme In Short

योजनेचे नावस्वामित्व योजना
विभागग्रामविकास विभाग
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
कधी सुरू केली24 एप्रिल 2021
लाभार्थी कोणग्रामीण भागातील नागरिक
लाभई प्रॉपर्टी कार्ड वितरण
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://svamitva.nic.in/
SWAMITVA Yojana

स्वामीत्व योजनेचे उद्दिष्ट

SWAMITVA Yojana Purpose

  • जमिनीचे मॅपिंग करणे, जागेची योग्य प्रकारे मोजणी करणे आणि जागेच्या योग्य मालकांना त्याच्या जागेचा हक्क मिळवून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • मूळ जमीन मालकाला आर्थिक व्यवहार करण्यासाठी त्यांना ई प्रॉपर्टी कार्डचा वापर करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे.
  • जमिनीच्या मालकी हक्कावरून होणारे वाद थांबवणे हाही या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून मूळ मालकाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • SWAMITVA योजनेच्या माध्यमातून सरकारला ग्रामीण विकासाला चालना द्यायची आहे.
  • ग्रामीण वस्ती असलेला जमिनीचे सर्वेक्षण करणे आणि हक्काच्या जमीन मालकांना मालमत्ता कार्ड देणे यासाठी त्यांना आर्थिक आणि कायदेशीर मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

स्वामित्व योजनेची वैशिष्ट्ये

PM SWAMITVA Scheme Features

  • केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वामीत्व योजनेची सुरुवात केलेली आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जमिनीच्या जागेची मोजणी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देणे.
  • स्वामित्व योजनेच्या SWAMITVA Yojana अधिकृत वेबसाईटवर वितरित झालेले ई प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल नकाशे तयार करण्यात आलेले प्रॉपर्टी कार्ड, पूर्ण झालेले सर्वेक्षण चौकशी प्रक्रिया इत्यादी ची सर्व माहिती प्रत्येक राज्यानुसार तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

स्वामित्व योजनेचे लाभार्थी

SWAMITVA Yojana Benefisior

  • महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.
SWAMITVA Yojana

स्वामित्व योजनेचे फायदे

SWAMITVA Yojana Benefits

  • SWAMITVA Yojana योजनेच्या माध्यमातून जागेची योग्य मोजणी झाल्यामुळे गावातील विकास कामांना गती मिळते.
  • SWAMITVA Yojana योजनेमुळे जमीन संपत्ती वरून असणारे आपापसातील वाद मिटण्यास मदत होणार आहे.  
  • या योजनेच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी होणार असल्यामुळे डिजिटल इंडियाला या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे.  
  • PM SWAMITVA योजना आत्मनिर्भर भारतच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.  
  • जमीन आणि संपत्तीवर मालकी हक्क मिळाल्यामुळे तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होते आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो.  
  • सावित्व योजना SWAMITVA Yojana सुरू करण्यात आल्यामुळे ग्रामपंचायत मध्ये जमिनीवर होणारा बेकायदेशीर ताबा गैरव्यवहार आणि भूमाफियावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळत आहे.  
  • स्वामित्व योजनेच्या माध्यमातून मूळ मालकाला जागेचे ही प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते याही प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिक कर्ज घेणे व अन्य आर्थिक कामे करू शकतो.
  • डिजिटल इंडिया या योजनेचा भाग म्हणून स्वामीत्व योजना ग्रामीण भागात काम करत आहे.
  • मालकी हक्क असणाऱ्या जमीन मालकांच्या नावावर त्यांच्या हक्काची जमीन करून देणे हा योजनेचा उद्देश आहे.
  • गावातील जमिनीचे योग्य पद्धतीने मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतला मिळणारा कर आकारणीही उत्तम प्रकारे मिळेल आणि ग्रामपंचायतचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल.
  • ग्रामीण भागात आजही लोकांच्या नावाने जमीन मालमत्ता आहे मात्र त्याची कागदपत्रे नाही अशा लोकांना या योजनेअंतर्गत ही प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच संपत्ती प्रमाणपत्र देण्यात येते.
  • आदिवासी बांधवांना वाढीव वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमीन मालमत्तेची कायदेशीर कागदपत्रे देण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.
  • स्वामीत्व योजनेच्या SWAMITVA Yojana माध्यमातून मिळालेल्या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज घेणे ही सोपे झाले आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून जमिनीची ड्रोन च्या माध्यमातून मोजणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे ऑनलाईन देखरेख करणे सोपे झाले आहे.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

स्वामित्व योजनेची अंमलबजावणी

PM SWAMITVA Yojana Scheme

  • SWAMITVA Yojana योजनेच्या माध्यमातून ग्रामीण वस्ती असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांच्या सीमा निश्चित केल्या जातात.
  • सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हक्काच्या जमीन मालकांना ई प्रॉपर्टी कार्ड देण्यात येते या कार्डवर मालकाचे नाव, मालमत्तेचे ठिकाण, क्षेत्रफळ तसेच इतर संबंधित माहिती असते.
  • SWAMITVA Yojana योजनेच्या माध्यमातून केलेल्या संरक्षण दरम्यान गोळा केलेला डेटा भूमी अभिलेख प्रणालीमध्ये एकत्रित केला जातो त्यामुळे एक व्यापक आणि अद्यावत जमीन डेटाबेस तयार होत आहे.
  • मालकांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड मिळतील यासाठी प्रयत्न केले जातात आणि ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जाते.
  • या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया बारकाईने निरीक्षण केले जाते या योजनेच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी व क्षेत्र निश्चित करण्यासाठी मूल्यमापन केले जाते.

स्वामित्व योजनेचे स्वरूप

PM SWAMITVA Yojana

स्वामित्व योजना पंचायत राज मंत्रालय, पंचायत राज विभाग, राजस्व विभाग आणि भारतीय सर्वेक्षण विभागांतर्गत राबविण्यात येणारी योजना आहे.

देशातील गावांचे या योजनेअंतर्गत ड्रोनच्या मदतीने सर्वेक्षण होणार आहे या माध्यमातून घराचा नकाशा आणि मालमत्ता कार्ड देण्यात येणार आहे.

सातबारा उतारा वरून एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे हे आपल्याला समजते त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या मालकीची बिगर शेती जमीन (स्थावर मालमत्ता, घर, बिल्डिंग, बंगला, व्यवसायाच्या बिल्डिंग) किती आहेत हे ही प्रॉपर्टी कार्ड च्या माध्यमातून समजते.

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ड्रोन चा वापर करून जागेचे मोजमाप करण्यात येणार आहे. व सीमारेषा निश्चित करण्यात येणार आहे. गावाच्या सीमेच्या आत येणाऱ्या प्रत्येक संपत्तीचे डिजिटल मॅप तयार केले जाईल तसेच रेवेन्यू एरियाची सीमारेषा निश्चित करण्यात येईल.

या योजनेच्या माध्यमातून प्रथम वनक्षेत्र व कृषी जमिनीपासून वस्ती असणारा भाग वेगळा करण्यात येईल. वस्ती असलेले क्षेत्राचा नकाशा चिन्हीत केला जाईल. सीमे रेषेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या संपत्तीचे त्यांच्या मालकांना ओळखी नुसार निश्चित केले जाईल.

केंद्र सरकार ही योजना पहिले प्रोजेक्ट म्हणून केवळ 6 राज्यात राबवत आहे. यामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातील जवळपास 1 लाख खेड्यामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. 2024 च्या शेवटपर्यंत ही योजना संपूर्ण देशात लागू करण्याचा केंद्र सरकारने लक्ष ठेवले आहे.

स्वामित्व योजना अंतर्गत केले जाणारे सर्वेपरीक्षन

PM SWAMITVA Scheme

सामित्व योजनेच्या माध्यमातून जीपीएस ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला जातो. सर्वेक्षणच्या माध्यमातून प्रत्येक घराची जिओ टॅगिंग केली जाते. त्या घरांचे क्षेत्रफळ निश्चित केले जाते. प्रत्येक घराला एक युनिक आयडी दिला जातो. अशा डिजिटल पद्धतीने लाभार्थ्याच्या घराचा / जागेचा पत्ता डिजिटल नोंदवला जातो. ड्रोन च्या माध्यमातून सर्वे केला जातो. त्यावेळी ग्रामसेवक, राजस्व विभाग अधिकारी, जमिनीचा मालक, पोलीस अधिकारी, त्या घराचा शेजारी आदींची उपस्थिती असणे आवश्यक आहे. जमिनीचा मालक, घराचा मालक स्वतःच्या हक्काच्या जमिनी भोवती चुन्याचा एक घेरा बनवतो त्याचा फोटो ड्रोन द्वारे घेतला जातो आणि ड्रोनच्या माध्यमातून जमा झालेल्या माहितीच्या आधारावर एक डिजिटल नकाशा जमिनीचा तयार केला जातो व तो मालकाला दिला जातो.

स्वामित्व योजना अंतर्गत मोजमाप झालेल्या जमिनीची तक्रार करण्याबाबतची प्रक्रिया

SWAMITVA Yojana

सरकारकडून स्वामीत्व योजनेच्या माध्यमातून ज्या गावात जमिनीची मोजणी करायची आहे यासंबंधीची माहिती मोजणी करण्याच्या काही दिवस आधी गावातील नागरिकांना दिली जाते. त्यामुळे सर्वेक्षणाच्या दिवशी जमिनीचा मालक आणि गावातील नागरिक उपस्थित राहू शकतील. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे सर्वेक्षण केले जाते.

यासंबंधीची संपूर्ण माहिती नागरिकांना दिली जाते. एखाद्या नागरिकांना या संरक्षण बद्दल काही अडचण असेल तर 40 दिवसाच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात त्याला तक्रार करता येते. जर एखाद्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत कोणाची काहीच तक्रार नसेल तर त्या जमीन मालकाला संपत्तीचे कार्ड ई प्रॉपर्टी कार्ड दिले जाते.

ई प्रॉपर्टी कार्ड न मिळण्याची कारणे

E Property Card

  • लाभार्थी व्यक्ती संबंधित जागेवर मालकी हक्क नसल्यास.
  • सरकारच्या वतीने ज्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे त्या जागेवर अन्य कोणी हक्कासाठी तक्रार केल्यास.
  • संबंधित जागेवर सह हिस्सेदार असल्यास.
  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी नसल्यास.

स्वामित्व योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

SWAMITVA Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशन कार्ड

विज बिल

घरपट्टी पावती

मतदार ओळखपत्र

पासपोर्ट फोटो

SWAMITVA Yojana

स्वामित्व योजनेची अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Apply

स्वामित्व योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Online Apply

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  

पंचायत राज मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटवर होम पेज उघडेल.  

त्या होम पेजवर तुम्हाला New Registration हा पर्याय दिसेल. .

तो निवडा तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यानंतर तुम्ही त्या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जमिनीशी संबंधित माहिती अचूक पद्धतीने भरा.  

संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज जमा करा या पर्यायावर क्लिक करून सबमिट करू शकता.  

अर्ज सबमिट करताच तुम्हाला एक अर्ज क्रमांक ची पावती मिळेल ती तुम्ही सांभाळून ठेवा.  

अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वामीत्व योजनेसाठी अर्ज करू शकता

स्वामित्व योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

SWAMITVA Yojana Application

सर्वात प्रथम अर्जदाराला जवळचा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन स्वामित्व योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.  

त्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरून संबंधित कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती या अर्जासोबत जोडावे लागतील.  

अर्ज भरून झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा.  

अर्ज जमा केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस येईल त्याला क्लिक करून तुम्हाला तुमचे संपत्ती कार्ड म्हणजेच ई प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येईल आणि राज्य सरकारकडून देखील ही प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला वितरित केले जाईल.

ई प्रॉपर्टी कार्ड

E Property Card

सातबारावर ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे याची माहिती दिलेली असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेत जमीन आहे याची माहिती प्रॉपर्टी कार्ड वरती दिली जाते.

बिगर शेत जमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची जागा इत्यादींची माहिती प्रॉपर्टी कार्डवर असते.

या योजनेच्या माध्यमातून देशातील 6 राज्यातील गावांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक घराचा नकाशा मिळकत पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रॉपर्टी कार्ड काढण्याची प्रक्रिया E Property Card

सर्वात प्रथम तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी Bhulekh.mahabhumi.gov.in या साईडला भेट द्यावी लागेल.  

त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट उघडेल.  

या वेबसाईटच्या उजवीकडे तुम्हाला Digital Signed 7/12,  8अ आणि प्रॉपर्टी कार्ड असे पेज शीर्षक आहे.

डिजिटल साक्षरी प्रॉपर्टी कार्ड काढण्याची प्रक्रिया

प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या पेजवर जाऊन लॉगिन करायचे आहे.  

सातबारा काढताना वापरलेले युजरनेम पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता जर तो पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्ही फोन नंबर टाकूनही प्रॉपर्टी कार्ड पाहू शकता.

यासाठी तुम्हाला top based login या पर्यायाची निवड करावी लागेल.

त्यानंतर इंटर मोबाईल नंबर chya रकाण्यात तुमचं मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.  

एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केले की ओटीपी सेंट ऑन युवर मोबाईल असा मेसेज तिथे येईल.  

याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पासवर्ड येईल ते जसेच्या तसे तुम्हाला ओटीपीच्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.  

त्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.  

पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावाचा एक नवीन पेज ओपन होईल.  

या पेजवर Digitally signed 7/12, Digitally signed 8A, Digitally signed Property card, Recharge Account, Payment History, Payment Status असे वेगवेगळे पर्याय दिसतील.  

त्यानंतर डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड या पर्यायावर क्लिक करावे.  

त्यानंतर डिजिटल साक्षरी प्रॉपर्टी कार्ड नावाचे एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल.  

त्यात तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.  

त्यानंतर जिल्हा, तुमचं गाव आणि प्रॉपर्टी ज्या तहसील अंतर्गत येते त्या कार्यालय शहराचे नाव निवडावे लागेल गाव निवडल्यानंतर तुम्हाला CTS नंबर टाकावा लागेल.  

CTS नंबर म्हणजे सिटी सर्वे नंबर याचा अर्थ जमीन ओळखण्यासाठी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेला एक नंबर. प्रॉपर्टी संबंधित सगळे रेकॉर्ड या क्रमांकाची संबंधित असतात. पण जर तुम्हाला CTS नंबर माहित नसेल प्लॉट नंबर तुम्ही इथे टाकू शकता.  

त्यानंतर CTS नंबर निवडा या पर्यायावर क्लिक केलं की तो नंबर तिथे आलेला दिसेल त्या नंबर वर क्लिक करून तो निवडायचा आहे.  

सगळ्यात शेवटी डाऊनलोड या पर्यायावर क्लिक करायचे आणि तुम्ही तुमचे प्रॉपर्टी कार्ड अशा पद्धतीने डाऊनलोड करू शकता.

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे E Property Card

मालमत्ता पत्रक असे या कार्डला नाव दिलेले असते. त्यात गाव, तालुका, जिल्ह्याचे नाव प्रथम असते. त्यानंतर भूमापन क्रमांक, प्लॉट नंबर, त्याचे क्षेत्रफळ किती आहे हे चौरस मीटर मध्ये दिलेले असते. तो प्लॉट कोणाच्या नावाचा आहे, ती माहिती हक्काचा मूळ धारक अशी माहिती दिली असते. तसेच खाली एक सूचना दिलेली असते त्यात कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्ड व सही केली आहे त्याची ही माहिती असते काय नोंद केला जाईल.

स्वामित्व योजनेच्या माध्यमातून मिळालेले डिजिटल साक्षरता असल्यामुळे प्रॉपर्टी कार्ड E Property Card  सरकारी आणि कायदेशीर कामासाठी वापरता येणार आहे. आता प्रॉपर्टी कार्ड E Property Card काढण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयात जायची गरज पडणार नाही. स्थावर मालमत्तेवर होणाऱ्या व्यवहाराची नोंद प्रॉपर्टी कार्ड ठेवली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातल्या 1,165 गावांचा ड्रोन सर्वे झाला आहे. राज्यातल्या सगळ्या गावांमध्ये ड्रोन सर्वे लवकरच पूर्ण केला जाणार आहे. या कार्डच्या माध्यमातून नागरिकांना बँकेकडून कर्जही घेता येणार आहे.  

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: स्वामित्व योजना म्हणजे काय?

उत्तर: केंद्र सरकारने देशातील 6 राज्यासाठी पायलेट प्रोजेक्टवर ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करून नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता प्रमाणपत्र दिले जाते.

प्रश्न: स्वामित्व योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर: स्वामित्व योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

प्रश्न: SWAMITVA योजनेचा संक्षिप्त रूप काय आहे?

उत्तर: SWAMITVA योजना म्हणजे Server of village and Mapping With improvised Technology in village Area होय.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA