Annapurna Yojana Information In Marathi : दर महिन्याला मिळणार 3000 रुपये
Annapurna Yojana : सरकार महिलांसाठी सतत नवीन योजनांची सुरुवात करत असते. तशीच आता 1 जून 2026 पासून नवीन योजना सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत गरजवंत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये दिले जातील. या योजनेचे नाव आहे अन्नपूर्णा योजना.
Annapurna Yojana 2026 चला तर मग जाणून घेऊया योजनेचा अर्ज कसा करावा? या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काय आहे? त्याचबरोबर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून या योजनेचा कसा अर्ज करणार?
पश्चिम बंगाल सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे Annapurna Yojana अन्नपूर्णा योजना. या योजनेच्या पात्र महिलांना दर महिन्याला 3000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
Annapurna Yojana ही योजना 1 जून 2026 पासून लागू होणार आहे. ज्या बँक खात्याला तुमच आधार कार्ड लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये या योजनेअंतर्गत पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा फायदा 25 ते 60 वर्षातील महिलांना घेता येणार आहेत. त्याचबरोबर अजून काही अटी आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी, त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांना देखील या योजनेत पात्र धरले जाणार नाही. या योजनेचा त्याच महिलांना लाभ होईल ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे.
सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की नवीन लाभार्थी महिलांना देखील या योजनेचा अर्ज How to Apply For Annapurna Yojana करता येणार आहे. यासाठी 1 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी महिलांचे स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, घर प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो कागदपत्र असणे आवश्यक आहे.
या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही अगदी स्वतःच्या घरी बसून मोबाईलवर या योजनेचा अर्ज करू शकता.
असा करा या योजनेचा अर्ज
How to Apply For Annapurna Yojana
जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 1 जून 2026 पासून या योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सरकार कडून एक नवीन पोर्टल लाँच केले जाणार आहे. त्या पोर्टलवरून महिला या योजनेचा अर्ज करू शकतात.