PM Fasal Bima Yojana : प्रधानमंत्री फसल विमा योजना
PM Fasal Bima Yojana : प्रधानमंत्री फसल विमा योजनामुळे पिकाला अल लिनो, दुष्काळ, वादळ, अतिवृष्टी, पूर या सारख्या नुकसानापासून सुरक्षा मिळते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किफायती दरामध्ये इन्शुरन्स सुरक्षा पुरवली जाते. कमी प्रीमियम द्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा घेता येऊ शकतो.
PM Fasal Bima Yojana : भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. देशातील कोट्यावधी शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवते. अशा स्थितीमध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना (PM fasal Bima Yojana) शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आर्थिक सुरक्षा कवच म्हणून समोर आली आहे.
PMFBY 2026 या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना शेतकऱ्यांना एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही.
Crop Insurance Scheme : प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी रब्बी आणि खरीप पिकाचा विमा काढू शकतात.
या योजनेची विशेष बाब म्हणजे पीएम फसल विमा योजनेमध्ये केवळ 2 टक्के प्रीमियम खरीप पिक विमा काढण्यासाठी द्यावा लागतो. उरलेला बाकीचा प्रीमियम सरकार भरते.
PMFBY 2026 अशा पद्धतीने शेतकऱ्यांना स्वस्त दरात या योजनेतून पिक विमा काढून त्याचा फायदा घेता येतो. आतापर्यंत लाखो रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे.
अल निनोच्या नुकसानीपासून वाचवणार PMFBY
El Nino Effect on Farmers : हवामान विभागाने अल निनोचा अलर्ट दिला आहे. यामुळे नैसर्गिक वातावरणामध्ये बदल होणे आणि पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर असे झाले तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडू शकतो.
PMFBY 2026 मागील काही महिन्यापासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहेत. सुरुवातीला अवकाळी पाऊस झाला त्यानंतर मान्सूनची चाल बिघडली. अशा स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढला आहे त्यांना नुकसान भरपाई सहज मिळू शकते. अल निनो मध्ये पिकावर कीट आणि रोगाचा प्रादुर्भाव होतो. फसल विमायोजनेमुळे शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येत नाही. कारण पिकाचे नुकसान झाल्यावर सरकारकडून पिक विमा अंतर्गत आर्थिक मदत होते.
शेतकऱ्यांना किती द्यावा लागतो प्रीमियम?
Kharif Crop Insurance : प्रधानमंत्री फसल विमायोजना अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांच्या विम्यासाठी प्रीमियम रकमेच्या 2 टक्के, रब्बी पिकांसाठी 1.5 टक्के, नगदी पिकांसाठी अधिक तर 5 टक्के प्रीमियम भरावा लागतो. पीएम फसल विमायोजनेअंतर्गत 27 राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये फायदा मिळवून देण्यासाठी 18 विमा कंपन्या, 1.7 लाख बँक शाखा आणि 44000 कॉमन सर्विस सेंटर (सीएससी CSC) केंद्र सेवा देत आहेत.
नुकसान होतात 72 तासाच्या आत द्या तक्रार
Crop Loss Claim 72 Hours : फसल बिमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात पहिले काम म्हणजे वेळेवर विमा कंपन्यांना सूचना देणे आहे. जर कुठल्याही नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, पिकात पाणी साचणे किंवा जमीन पाण्याने वाहून जाणे, खरडून जाणे, उभे पीक खराब होणे याची तत्काळ माहिती तुम्ही विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.
PMFBY Claim Process ही माहिती नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनी, बँक किंवा जवळच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात देणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला विमा कंपनीकडून मिळणारी मदत कुठल्याही अडचणी शिवाय मिळू शकेल.
इथे होते शेतकऱ्याची चूक
Farmer Insurance News : नुकसान झाल्यास शेतकरी विचार करतात की सर्वेक्षक स्वतः गावात येईल तेव्हा आपण त्याला सांगू आणि हीच त्यांची मोठी चूक होते. जर तुम्ही ठराविक काळात म्हणजे 3 दिवसाच्या (72 तास)/आत नुकसान झाल्याची सूचना कंपनीला दिली नाही तर तुमचा विमा मान्य करण्यात येत नाही. त्यामुळे नुकसान झाल्यास तत्काळ तुम्ही विमा कंपनीला कळवले खूप महत्त्वाचे आहे.
पीएम फसल विमा योजनेसाठी कसा करावा अर्ज?
प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टल www.pmfby.gov.in यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. यासोबतच शेतकरी घरी बसून PMFBY AIDE ॲपचे द्वारे ही अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त शेतकरी आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
अधिकाधिक शेतकऱ्यांना जोडण्यासाठी सरकारचा प्रयत्न
सरकारचे मुख्य लक्ष म्हणजे या योजनेची व्याप्ती अधिक वाढवणे आहे. जेणेकरून देशभरातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होऊ मिळू शकेल. तज्ञांनी मान्य केले आहे की तंत्रज्ञान आणि पारदर्शकता सोबत ही योजना येणाऱ्या काळामध्ये कृषी क्षेत्राला नवीन मजबुती देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभवणार आहे.
शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा आणि कृषी क्षेत्राचा सततच्या विकासासाठी प्रधानमंत्री फसल विमायोजना एक मोठी मदत म्हणून समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल आणि त्यांनी प्रधानमंत्री फसल विमायोजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा उतरवला असेल तर त्यांना या योजनेतून आर्थिक मदत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा हातभार लागत आहे. त्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळत आहे. तुम्हीही आपल्या पिकाचा फसल विमायोजनेतून विमा उतरवणे खूप महत्त्वाचे आहे.
FAQ’s
प्रधानमंत्री फसल विमायोजना म्हणजे काय?
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढतात. जेणेकरून नैसर्गिक आपत्ती झाल्यास पिकाची नुकसान भरपाई या योजनेअंतर्गत मिळू शकेल.
पीएम फसल विमायोजनेचा प्रीमियम किती?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे विमा उतरण्यासाठी प्रीमियमच्या 2 टक्के रक्कम भरावी लागते. इतर रक्कम सरकारकडून भरली जाते.
पीएम फसल विमा काढल्यास काय होते?
तुम्ही या योजनेअंतर्गत आपल्या पिकाचा विमा काढला असेल आणि तुमच्या भागामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाची नुकसान झाले असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते. जेणेकरून तुमचे नुकसान होत नाही.
फसल विमायोजनेत मदत मिळते?
होय, ही केंद्र सरकारची योजना असून तुम्ही पिकाचा विमा काढला असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते.
पीएम फसल विमायोजनेसाठी अर्ज कुठे करावा?
आपल्या पिकाच्या नुकसानीचा विमा काढण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रात जाऊ अर्ज करू शकता तसेच मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
फसल विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
देशातील प्रत्येक शेतकऱ्याला फसल विमायोजनेअंतर्गत आपल्या शेतातील पिकांचा विमा काढता येतो. त्यामुळे देशातील प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे.