Ladki Bahin Yojana June Installment Update : सरकारचा मोठा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने अपात्र लाभार्थी सरकारी कर्मचाऱ्यांनी चुकीने लाभ घेतलेल्या व्यक्तींकडून वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आता बोगस लाडक्या बहिणीकडून पैशाची वसुली करण्यात येणार आहे, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता थेट वसुली होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणीचे बोगस लाभार्थ्यांची नावे समोर येत आहेत. त्यातच आता राज्यात लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री योजनेचा तब्बल 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचे राज्य सरकारने विधानसभेत सांगितले आहे. एवढेच नाही तर पुरुषांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला 165 कोटीचा चुना लागला आहे. हा घोटाळा लक्षात आल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी थेट जिल्हा अधिकाऱ्यांना वसुलीचे थेट आदेश दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पुरुषही लाभार्थी?
Ladki Bahin Yojana Maharashtra Government Launches Statewide Recovery Campaign महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ काही पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिलेल्या एका लेखी उत्तरात ही धक्कादायक माहिती दिली आहे. तब्बल 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी ही पात्र नसताना या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याची ही माहिती समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही योजना फक्त महिलांसाठी असतानाही काही पुरुषांचेही फॉर्म या योजनेसाठी मंजूर झाले आहेत. त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या हप्तेही जमा झाले आहेत. अपात्र ठरलेल्या या सर्वांकडून पैसे वसूल करण्यासाठी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बोगस लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्यावर वसुलीची कारवाई होणार आहे.
अपात्र लाभार्थ्याकडून वसुली, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Ladki Bahin Yojana Maharashtra Government Launches Statewide Recovery Campaign माझी लाडकी बहीण योजनेत सतत नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. त्यातच आता बोगस सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेण्याची धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर सरकारने कारवाईचे पावले उचलले आहेत. सरकारची फसवणूक करून लाभ घेणाऱ्यावर आता वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे.
नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे बँक खात्यात जमा झालेली सर्व रक्कम परत मिळवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आता स्थानिक पातळीवर अपात्र ठरलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पुरुष लाभार्थ्यांच्या बँक खात्याचा शोध घेऊन त्यांच्याकडून पैशाची वसुली करण्याची मोहीम राबवणार आहेत. त्यामुळे आता बोगस लाभ घेणाऱ्यांनो सावधान..
या बहिणींचा लाभ थांबला
अधिवेशनामध्ये महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रिया बाबत मोठी माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची ओळख पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी इकेवायसी च्या माध्यमातून आधार पडताळणी करण्यात आली आहे. त्यानुसार ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.
विधानसभेतील एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात रोहित पवार, धनंजय मुंडे, विलास तरे, अनिल पाटील, संतोष दानवे, हेमंत ओगले, विजय कदम आदींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाचे उत्तर आदिती तटकरे यांनी लेखी स्वरूपात विधानसभेत दिले त्यातून ही माहिती समोर आली आहे.