Ladki Bahin Yojana Update News In Marathi : बहिणींच्या खात्यात या दिवशी जमा होणार जून चा हप्ता

Ladki Bahin Yojana Installment Date Update News : वाचा सविस्तर बातमी

Ladki Bahin Yojana Installment Date Update News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत मे महिन्यापर्यंतचे पूर्ण हफ्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. जुलै महिन्याचे 10 दिवस उलटून गेले तरीही अजून 1500 रुपयांचा जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. पण आता या हप्त्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Ladki Bahin yojana जून महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठी चा निधी वर्ग केला जाणार आहे. त्यानंतर डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.

15 जुलै रोजी किंवा त्यानंतर हा हप्ता जमा होणार असल्याचा अंदाज आहे. Mukhyamantri Majhi LAdki Bahin Yojana लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील सुमारे 1 कोटी 70 लाख पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. तपासणीत अपात्र ठरलेल्या सुमारे 80 लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही असे स्पष्टपणे व्यक्त करण्यात आले आहे.

जून महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या तारखेबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे महिलांनी पुढील काही दिवस अधिकृत माहितीची वाट पहावी.