Mahila Samridhi Yojana : महिला समृद्धी योजना
Mahila Samridhi Yojana Monthly Assistance of RS 2500 for Women : महिला समृद्धी योजना ही एक महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. दिल्ली सरकारची महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी महिला समृद्धी योजनाची सुरुवात रक्षाबंधनाच्या दिवशी होऊ शकते. या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये देण्यात येतील.
Mahila Samridhi Yojana 2026 In marathi दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये सर्वात महत्त्वकांक्षी योजना म्हणून महिला समृद्धी योजनेला लागू करण्याची संपूर्ण तयारी केलेली आहे. ऑनलाइन रजिस्टर पोर्टल ही तयार झाले आहे आणि पात्रता ही निश्चित झाली आहे.
दिल्ली सरकार महिला समृद्धी योजना अंतर्गत आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 रुपये देण्यात येणार आहेत, ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाईल.
Mahila Samridhi Yojana 2026 यामध्ये लोकांना प्रश्न पडतो की, महिला समृद्धी योजना कधी सुरू होणार आहे? आणि कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे? आणि यासाठी कुठले कागदपत्रे आवश्यक असणार आहेत? जाणून घ्या सर्व माहिती..
महिला समृद्धी योजना कधी सुरू होणार?
Mahila Samridhi Yojana In marathi या योजनेला मार्च 2025 मध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी 2026-27 साठी 5110 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. नोंदणी पोर्टल जून 2026 च्या जवळपास सुरू होणार होते. मात्र आता रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला ही योजना सुरू केली जाणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ?
Mahila Samridhi Yojana In marathi
महिला समृद्धी योजनासाठी दिल्ली सरकारने पात्रता आणि नियम निश्चित केले आहेत ते खालील प्रमाणे-
वय- महिलेचे वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
रहिवासी- दिल्लीमध्ये कमीत कमी पाच वर्ष रहिवासी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
उत्पन्न- कुटुंबाची वर्षाला अडीच ते तीन लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील एकाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रेशन कार्डधारक महिलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. जवळपास 20 ते 22 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कोणाला नाही मिळणार लाभ?
सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
चार चाकी वाहन असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
आयकर भरणाऱ्या किंवा अन्य सरकारी पेन्शन किंवा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
कोण कोणती कागदपत्रे लागतील?
Documents Of Mahila Samridhi Yojana
महिला समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलाकडे आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक) असणे आवश्यक आहे. बँक खाते (आधार-लिंक) असणे आवश्यक आहे. रहिवासी प्रमाणपत्रांमध्ये वोटर आयडी, राशन कार्ड असावे. उत्पन्न प्रमाणपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असणार आहे.
या योजनेमुळे गरीब आणि मध्यम वर्गातील महिलांना आर्थिक मदत होईल. त्या आपल्या कुटुंबाचा खर्च सहज चालू शकतील. भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या वेळी हे आश्वासन दिले होते. ते आता पूर्ण करण्यात येत आहे. पोर्टल उघडताच अर्ज करण्याची तारीख आणि संपूर्ण गाईडलाईन समोर येणार आहे.