Talathi Bharti 2026 Maharashtra : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

Maharashtra Talathi Vacancy In MPSC Group C : तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध, इतर पदासह 5707 जागांसाठी जाहिरात

Talathi Bharti 2026 Maharashtra : गेल्या अनेक दिवसापासून तरुण तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची तारीख जाहीर केली आहे. आता महाराष्ट्र मध्ये तलाठी भरती सोबतच इतर पदासह 5,707 जागांची भरती होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट- क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 च्या पदसंख्येत 3088 नवीन पदाची मोठी वाढ केली आहे. आता ही एकूण भरती 5707 पदासाठी होणार आहे. यामध्ये 1539 तलाठी, 480 लिपिक टंकलेखक व इतर संवर्गाचा यामध्ये समावेश आहे.

या भरतीसाठी उमेदवारांना 5 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क 8 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.

महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने तलाठी भरतीची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल 1539 तलाठी पदासाठी भरती होणार आहे. यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.

एमपीएससीने 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीमध्ये सुरुवातीला 2629 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या 5 मे 2026 च्या शासन निर्णयानुसार आणि शासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रानुसार आयोगाने आता अतिरिक्त 3,088 पदाचा परीक्षेचा समावेश यामध्ये केला आहे. आता एकूण पदसंख्या 2629 वरून तब्बल 5707 एवढी झाली आहे. यामध्ये नवीन पदांमध्ये तलाठी पदांची भरतीचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन स्वर्ग आणि पदे

१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (महसूल व वन विभाग): १ हजार ५३९ पदे (अर्हता: कोणत्याही शाखेतील पदवी).
२. वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल (राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग व इतर): ११ पदे.
३. सहायक अधीक्षक (कृषि व पदुम विभाग): ११ पदे.
४. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक): २५४ पदे (अर्हता: मत्स्यविज्ञान विषयातील B.F.Sc. पदवी).
५. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय: २३० पदे.
६. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग: १५५ पदे.
७. आदिवासी विकास विभाग: ६९ पदे.
८. लिपिक-टंकलेखक (महसूल व वन विभाग): ४८० पदे.
९. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३९ पदे.

परीक्षेची तारीख आणि अर्जाचे वेळापत्रक

MPSC Group C Combined Exam Vacancy Increase : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही 25 ऑक्टोबर 2026 ला प्रचलित पद्धतीने ( offline OMR आधारित) घेतली जाईल.
पदाच्या संख्या मध्ये वाढ झाल्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.

Talathi Bharti Exam application date
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 5 ऑगस्ट 2026 रात्री 23.59 मिनिटापर्यंत.
ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याचे तारीख : 8 ऑगस्ट 2026 रात्री २३.५९ वाजेपर्यंत.

तलाठी भरतीची pdf जाहिरात

अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि नियम

MPSC Group C New Posts : लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना विशेष आव्हान करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी विविध विभागाचे सामाजिक व समांतर आरक्षण निहाय अतिरिक्त तक्ते प्रसिद्ध केले जाते. MPSC Group C Bharti 2026 Important Instructions : त्यामुळे कोणत्या उमेदवाराने पदसंख्या कमी आहे किंवा विशिष्ट संवर्गाचा समावेश नाही असे समजून अर्ज भरण्याचे टाळू नये. अर्ज न भरल्यामुळे निवडीची संधी हुकल्यास नंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
या पदासाठी 25 ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.

कुठे करावा अर्ज, अर्जाची लिंक

Maharashtra Talathi Bharti link : आता ऑफलाइन चलन भरण्याची पद्धत संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उमेदवारांना केवळ आता ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरावे लागेल. (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआय यांचा वापर करून ते पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकतात.) यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.