LIC New Jeevan Anand Plan : 45 रुपये रोज बचत करून मिळवा 25 लाखांचा फंड

LIC New Jeevan Anand Plan : जाणून घ्या बोनस आणि मॅच्युरिटीचे फायदे

LIC New Jeevan Anand Plan : भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने आपल्या ग्राहकासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेले आहेत. यातील काही योजना पेन्शन गॅरंटी देतात तर काही रेगुलर इन्कम निश्चित करतात. याव्यतिरिक्त एक आणखी सुपरहिट योजना एलआयसीने सुरु केली आहे, ती म्हणजे न्यू जीवन आनंद प्लॅन. यामध्ये विशेष बाब म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला एक नाही तर दोन वेळेस बोनसचा लाभ मिळतो. याद्वारे 25 लाख रुपयांचा मोठा फंड एकत्र केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..

डबल बोनसचा मिळणार फायदा

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर गुंतवणुकीचा मोठा बोजा पडू नये आणि दररोज छोटी छोटी बचत करून मोठा पैसा जमा व्हावा तर या दृष्टिकोनातून एलआयसी जीवन आनंद प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये भारतीय जीवन विमा निग द्वारे दोन प्रकारचे बोनस ऑफर दिल्या जातात. यामध्ये पहिला-पिंपल रिव्हर्सरी बोनस आणि दुसरा- फायनल एडिशनल बोनसचा समावेश आहे. यामुळे पॉलिसी होल्डरचे मॅच्युरिटी अमाऊंट वाढते या नंतर तुम्ही प्लॅन कमी पण करू शकता.

मॅच्युरिटीनंतर ही विमा सुरक्षा

एलआयसी जीवन आनंद प्लॅन मध्ये एक नाही तर अनेक फायदे मिळतात. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता वाढते. या योजनेची एक विशेष बाब म्हणजे याची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतरही फंड मिळतोच सोबतच मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतरही पॉलिसी अंतर्गत व्यक्तीला विमा कवच मिळत राहते म्हणजे एकाच योजनेत मोठा फंड आणि लाइफ इन्शुरन्सचा लाभ मिळतो.

दररोज 45 रुपये वाचून 25 लाख मिळवा

LIC New Jeevan Anand Plan : न्यू जीवन आनंद प्लॅन मध्ये तुम्ही जवळपास 1358 महिन्याला जमा करून 25 लाख रुपयांची रक्कम जमा करू शकता. यासाठी तुम्हाला लॉंग टर्म साठी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही प्लॅनमध्ये 35 वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर 25 लाख रुपये मिळतील. आता 1358 महिन्याच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करा तर दररोज तुम्हाला जवळपास 45 रुपये भरावे लागतील. तर याच पद्धतीने वर्षाला तुम्हाला 16,300 जमा करावे लागतील. या मॅच्युरिटी फंड पॉलिसीचा कालावधी वय आणि बोनसवर आधारित आहे.

बोनसचे कॅल्क्युलेशन

तुम्ही जर एलआयसी जीवन आनंद मध्ये पाच लाख रुपयाची विमा संरक्षण रक्कम घेतली तर दररोज तुम्हाला 45 रुपये गुंतवणूक 35 वर्षापर्यंत करावी लागेल. ही रक्कम 5.70 लाख रुपयांच्या जवळपास जमा होईल. याबरोबरच तुम्हाला मिळणारे रिविजनरी बोनस 8.60 लाख रुपये आणि फायनल एडिशनल बोनस 11.50 लाख रुपये देण्यात येईल. या पद्धतीने पॉलिसी मध्ये डबल बोनसचा लाभ मिळतो.

अन्य लाभ

LIC New Jeevan Anand Plan या योजनेअंतर्गत इतर लाभ बघितले तर एलआयसी न्यू जीवन आनंद प्लॅन घेणाऱ्या पॉलिसी होल्डरचा कुठल्या कारणास्तव मृत्यू झाला तर नॉमिनीला पॉलिसीचे 125% बेनिफिट मिळतात. याव्यतिरिक्त जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या मॅच्युअर होण्यापूर्वीच झाला तर डॉक्युमेंटच्या आधारावर नॉमिनीला विमा समान पैसा मिळतो. यात एक्सीडेंटल डेथ अँड सिबिलिटी, रायडर एक्सीडेंट, बेनिफिट रायडर, न्यू टर्म इन्शुरन्स रायडर्स आणि न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर यामध्ये ऑफर दिली जाते. मात्र यामध्ये आयकर सूटचा लाभ मिळत नाही.