SBI RD Account Opening Rules : व्याजदर, फायदे आणि खाते उघडण्याचे नियम जाणून घ्या
SBI Har Ghar Lakhpati Scheme : केंद्र आणि राज्य सरकार मिळून देशभरातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू करत असते. अशाच प्रकारची एक योजना एसबीआय सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही दरमहा छोटी बचत करून लाखोचा निधी जमा करू शकता. चला तर मग जाणून घेऊया एसबीआयची ही आरडी(RD) योजना काय आहे आणि या योजनेचे खाते कसे उघडावे याची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये…
मुलांच्या भविष्यासाठी आतापासूनच आर्थिक तरतूद करण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक आॅफ इंडियाची ‘हर घर लखपती’ ही रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना एक पर्याय ठरू शकते. या योजनेत दरमहा ठरावीक रक्कम जमा करून मुदतपूर्तीनंतर एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवता येते.
हर घर लखपती या योजनेचा वार्षिक व्याजदर ६.७ टक्के आहे. ही एसबीआयची RD योजना आहे. यात एकरकमी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा ठरावीक रक्कम जमा करता येते. नियमित बचतीतून मुलांचे शिक्षण, भविष्यातील गरजा किंवा इतर आर्थिक उद्दिष्टांसाठी निधी तयार करण्यास यामुळे मदत होते.
SBI ची हर घर लखपती योजना काय आहे?
What Is the SBI Har Ghar Lakhpati Scheme?
- एसबीआयची ‘हर घर लखपती’ योजना ही आवर्ती ठेव (Recurring Deposit – RD) स्वरूपातील बचत योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्राहक दरमहा ठरावीक रक्कम जमा करून भविष्यासाठी मोठा निधी उभारू शकतात.
- या योजनेत एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. त्याऐवजी, निवडलेल्या कालावधीनुसार दरमहा ठरावीक रक्कम जमा करता येते. या जमा रकमेवर बँकेच्या लागू असलेल्या व्याजदरानुसार व्याज मिळते.
- या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना मुलांचे शिक्षण, भविष्यातील खर्च आणि इतर आर्थिक गरजांसाठी नियमित बचत करून निधी तयार करण्यास मदत होऊ शकते.
हर घर लखपती योजनेची वैशिष्ट्ये
या योजनेत तुम्ही आरडीच्या स्वरूपात गुंतवणूक करू शकता.
हर घर लखपती योजनेचा वार्षिक व्याजदर 6.7 टक्के आहे
या योजनेत गुंतवणूक तुम्ही तीन ते दहा वर्ष यादरम्यान करावी लागते
या योजनेत तुम्ही एक रकमे रक्कम जमा करण्याची आवश्यकता नाही तुम्ही दरमहा थोडी थोडी गुंतवणूक करून या योजनेद्वारे तुम्ही मोठी गुंतवणूक तयार करू शकता आणि मोठी रक्कम जमा होईल.
तुम्हाला जर एक लाख रुपये रक्कम जमा करायचे असेल तर तुम्ही हप्त्याला 1420 रुपये जमा करून पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एक लाख रुपये जमा करू शकतात तसेच जर तुम्ही 610 रुपये दरमहा या योजनेअंतर्गत आरडी केली असेल तर तुम्हाला 10 वर्षानंतर एक लाख रुपयांची रक्कम जमा होईल.
मुलांच्या नावेही उघडता येते खाते
या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडण्याची सुविधा आहे. अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडण्याबाबत वयोमर्यादा आणि नियम आणि अटी लागू होतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल : स्वत:ची सही करण्यास सक्षम असल्यास, लागू बँक नियमांनुसार खाते उघडता येऊ शकते.
स्वत: सही करू न शकणारे मूल : पालक किंवा कायदेशीर पालकाच्या मदतीने खाते उघडण्याची आवश्यकता असू शकते. पालकांची भूमिका : खाते उघडण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे, खाते चालवण्याचे अधिकार आणि अल्पवयीन खात्याच्या अटी तपासाव्यात. sbi चा सध्याचा व्याजदर आणि परिपक्वतेची रक्कम तपासा. मासिक हप्ता नियमित भरण्याची क्षमता लक्षात घेऊनच उद्दिष्ट ठरवा. हप्ता चुकल्यास लागू होणारे शुल्क किंवा दंड यांची माहिती घ्या. मुदतपूर्व खाते बंद केल्यास लागू होणाºया अटी समजून घ्या. मुलाच्या नावाने खाते उघडण्यासाठी कागदपत्रांची यादी बँकेकडून घ्या.
चार लाख रुपये ठेवा उद्दिष्ट
योजनेत केवळ एक लाख रुपयाचेच उद्दिष्ट ठेवणे बंधनकारक नाही. दोन, तीन किंवा चार लाख रुपये अशा मोठ्या रकमेचे उद्दिष्टही निवडता येऊ शकते. उद्दिष्टाची रक्कम, गुंतवणुकीचा कालावधी आणि लागू व्याजदर यानुसार दरमहा जमा करावयाची रक्कम ठरते.
Read About : Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?
Read About : Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा
Read About : PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे
website : yojanamazi.com