Ladki Bahin Yojana In Marathi : लाडकी बहीण योजना
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून प्रत्येक महिलेचा चर्चेचा विषय बनली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑगस्ट महिन्यापर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. आता महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
1 ऑक्टोंबर रोजी ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. नवरात्र सुरू झाली आहे दसराही येत आहे तरीही सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला नाही. यामुळे महिलांमध्ये थोडे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये खात्यात कधी जमा होणार त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्ता देखील कधी मिळणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महिलांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, दसऱ्याला 1500 मिळणार की दिवाळी मध्ये एकूण दोन महिन्याचे 3000 रुपये मिळणार. आता यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोंबर च्या सुरुवातीस महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता, पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे हप्ते अजून बाकी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने सप्टेंबर महिन्याचा हप्ता स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यासंदर्भातील शासन निर्णय ऑक्टोबर नंतर पैसे टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होऊ शकतात. परंतु याबद्दलची अधिकृत तारीख मात्र अजूनही जाहीर झालेली नाही.
Ladki Bahin Yojana सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 66 लाख महिलांना मिळत आहे. त्यामुळे पुढील हत्याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या हप्त्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारने सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेतल्यास दसऱ्यानंतर या संदर्भातील शासन निर्णय जारी होऊन शकतो. त्यानंतर 25 ऑक्टोबर नंतर टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read About : Meri Panchayat App : मेरी पंचायत ॲप कसे डाउनलोड करावे?
Read About : Kisan Vikas Patra Yojana : 1 लाख गुंतवा 2 लाख रुपये मिळवा
Read About : PMFME Scheme In Marathi : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात संभाजीनगर देशात दुसरे
website : yojanamazi.com