दरमहा 3.27 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार; स्थलांतरित कामगारांना लाभ
One Nation One Ration Card in marathi : देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक देश एक राशन कार्ड योजना लागू झालेली आहे. ही विशेष करून स्थलांतरित कामगारांसाठी मोठी फायदेशीर ठरत आहे. देशातील कुठल्याही ठिकाणीच्या रेशन दुकानात जाऊन तुम्ही रेशन खरेदी करू शकता. ते कसे चला जाणून घेऊ..
One Nation One Ration Card Approximately 3 27 Crore Portability Transactions Every Month
वन नेशन, वन राशन कार्ड (One Nation One Ration Card) योजना जेव्हापासून संपूर्ण देशामध्ये लागू झाली आहे तेव्हापासून रेशन कार्डधारक देशातील कुठल्याही राज्यांमध्ये जाऊन त्यांच्या मर्यादेनुसार तेथील जवळच्या रेशन दुकानावर जाऊन आपले धान्य प्राप्त करू शकतात. या योजनेमध्ये प्रवासी कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना विशेष लाभ मिळत आहे. ते कुठेही राहुन त्यांना सरकारी रेशन मिळवता येत आहे.
यापूर्वी रेशन आणण्यासाठी त्यांना त्यांच्या गावाला लागत होते हे काम कठीण होते. मात्र आता नेशन वन रेशन कार्ड योजनेद्वारे त्यांना आता ज्या ठिकाणी राहत आहे तिथल्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन रेशन प्राप्त करता येते. जेव्हापासून देशात वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू झाली, तेव्हापासून प्रत्येक महिन्याला जवळपास 3.27 कोटी पोर्टेबिलिटी व्यवहार करण्यात येत आहेत.
Lakme Tinted Sunscreen with Niacinamide for Even Toned Skin, SPF 50 PA+++, in-Vivo Tested, 100 ml
PMGKAY चे 100 टक्के लाभार्थी
एक देश एक राशन कार्डची सुविधा मिळाल्यानंतर आता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पीएमजीकेवायचे 100% लाभार्थी सहभाग झाला आहे. आतापर्यंत 233 कोटी पेक्षा अधिक अंतर राज्य आणि राज्यच्या अंतर्गत पोर्टेबिलिटी व्यवहार झाले आहेत.
Ghar Soaps Magic De-Tan Face Wash & Sandalwood Saffron Bath Soap Combo Pack of 3
लाभार्थ्यांचा डेटाबेस आता डिजिटल
रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांचा 100 टक्के डेटाबेस डिजिटल झाला आहे. यामुळे त्यांना आता कुठल्याही राज्यांमध्ये जाऊन आपल्या पात्रतेनुसार रेशन खरेदी करता येते. लाभार्थ्यांना आधार कार्डशीही जोडले जात आहे. 98.8% रेशन कार्ड आधार जोडण्यात आले आहे.
सोपी झाली आहे तक्रार प्रणाली
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन संदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांका बरोबरच पोर्टल आणि ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यात आली आहे. आणि सोप्या पद्धतीने तुम्ही इथे जाऊन तक्रार करू शकता.
दुसऱ्या राज्यात जाऊन रेशन कसे मिळवायचे?
वन नेशन, वन राशन कार्ड प्रणालीमुळे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर नवीन रेशन कार्ड बनवण्याची किंवा पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. लाभार्थी खालीलप्रमाणे रेशन घेऊ शकतात.
- सर्वप्रथम मोबाईलमध्ये Mera Ration 2.0 ॲप डाउनलोड करा.
- ॲपच्या मदतीने जवळचे रास्त भाव दुकान शोधा.
- संबंधित रेशन दुकानात जाऊन आपला आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक द्या.
- रेशन मिळवण्यासाठी आवश्यक बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करा.
- पडताळणीनंतर आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध रेशन मिळवा.
- रेशन घेतल्यानंतर पावती घेण्यास विसरू नका.
स्प्लिट रेशन सुविधेचाही लाभ
तुम्हाला हेही माहीत असणे आवश्यक आहे की सरकारने स्प्लिट रेशनची सुविधाही सुरू केली आहे. म्हणजेच एका राज्यामध्ये जर तुमच्या कुटुंबातील अर्धे सदस्य राहतात आणि दुसऱ्या राज्यांमध्ये अन्य सदस्य राहतात तर ते आपल्या आपल्या हिस्स्याचे रेशन वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजेच दुसऱ्या राज्यात खरेदी करू शकतात. ही सुविधा इतर राज्यात राहणाऱ्या स्थलांतरित कामगारांसाठी खूप फायदेशीर झाली आहे. कारण त्यांना केवळ रेशन खरेदीसाठी आपल्या गावी जाण्याची गरज नाही. ते जिथे आहे तिथे जवळच्या रेशन दुकानात जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने रेशन खरेदी करू शकणार आहेत.
वन नेशन, वन राशन कार्ड योजना – महत्त्वाचे FAQ
1. वन नेशन, वन राशन कार्ड योजना म्हणजे काय?
वन नेशन, वन राशन कार्ड ही केंद्र सरकारची योजना आहे. या माध्यमातून रेशन कार्डधारकांना देशातील कोणत्याही राज्यातील पात्र रास्त भाव दुकानातून रेशन घेता येते.
2. वन नेशन, वन राशन कार्ड योजनेचा लाभ कोणाला मिळतो?
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत पात्र असलेल्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळतो.
3. दुसऱ्या राज्यात रेशन घेण्यासाठी नवीन कार्ड बनवावे लागते का?
नाही. दुसऱ्या राज्यात रेशन घेण्यासाठी नवीन रेशन कार्ड बनवण्याची किंवा पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
4. दुसऱ्या राज्यात रेशन कसे मिळवायचे?
जवळच्या रास्त भाव दुकानात जाऊन आधार क्रमांक किंवा रेशन कार्ड क्रमांक द्यावा. त्यानंतर आवश्यक बायोमेट्रिक पडताळणी करून पात्रतेनुसार रेशन मिळवता येते.
5. Mera Ration 2.0 ॲपचा उपयोग काय आहे?
या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रेशन कार्डसंबंधित माहिती, पात्रता आणि जवळचे रास्त भाव दुकान शोधण्यास मदत होते.
6. एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या राज्यांतून रेशन घेऊ शकतात का?
होय. स्प्लिट रेशन सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य आपापल्या पात्र हिस्स्याचे रेशन वेगवेगळ्या ठिकाणांहून घेऊ शकतात.
7. रेशन मिळाले नाही तर तक्रार कुठे करायची?
रेशन मिळण्यात अडचण आल्यास संबंधित राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या हेल्पलाइन किंवा ऑनलाइन तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार करता येते.
Read About PM किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख जाहीर!
PM Kisan Yojana च्या 24 व्या हप्त्यापूर्वी कृषी मंत्र्यांचा व्हिडिओ संदेश
website : yojanamazi.com
अशाच विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर व अधिकृत माहिती मिळवण्यासाठी योजना माझी (yojanamazi.com) या वेबसाइटला भेट द्या. सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आमचे Facebook आणि Instagram पेज फॉलो करा.