Mukhyamantri sahayata nidhi Yojana apply 2025 in marathi : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी असा करा अर्ज

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana : अर्ज प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ही गरजू रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. महाराष्ट्रातील गरजू तसेच सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी खूप महत्त्वाची आहे. या कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना संजीवनी मिळाली आहे. याचा अर्ज कसा करावा याची माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Mukhyamantri sahayata nidhi राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आली असून ती रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे. तर आज आपण रुग्णालयीन खर्चासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवायचा याची अर्ज प्रक्रिया काय आहे याची माहिती पाहणार आहोत.

Mukhyamantri sahayata nidhi वैद्यकीय खर्च न भेटणाऱ्या कुटुंबांना, गरजू कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे मदत मागावी लागते. त्यासाठी काही गोष्टींची प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतर मंत्रालयात जावे लागायचे पण आता राज्यातील नागरिकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता सहायता निधीसाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठीची आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri sahayata nidhi Documents

विहित नमुन्यातील अर्ज

वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र 1 लाख 60 हजारापेक्षा कमी असावे

आधार कार्ड

रेशन कार्ड

संबंधित आजाराचा रिपोर्ट

अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC रिपोर्ट

प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZPCC शासकीय समितीचे मान्यता असावी

रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयात संगणक प्रणालीवर असल्याचे खात्री असावी

योजनेची अर्ज प्रक्रिया

Mukhyamantri Sahayata Nidhi Yojana apply Online

मुख्यमंत्री सहायता निधीच्या लिंक https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf वरून फॉर्म डाऊनलोड करा

आपले रुग्णालय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये आहे का ते तपासा https://docs.google.com/spreadsheets/d/1QUODMYZ8oY1lPyY2vl1dsX4w6MzBfaGB/edit?gid=1178235983#gid=1178235983

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या अर्ज बद्दलची यादी बघून आपला आजार निश्चित करा

अर्ज सोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र असे आवश्यक कागदपत्रे जोडा

सहायता निधी संपूर्ण अर्ज भरून फोटो लावा

उपचार घेत असलेल्या रुग्णालयाचे कोटेशन व कोटेशन वर रुग्णालय व सिविल सर्जन यांचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे

अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट जोडा

अर्जामध्ये नमूद केलेल्या आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे जोडा

संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर या ईमेलवर aao.cmrf-mh@gov.in मेल करा

तसेच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी रुग्णालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षांमध्ये देखील अर्ज जमा करा

अर्ज स्वीकार झाल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती या लिंक वर बघू शकता

त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री पक्षाकडून वैद्यकीय मदत देण्यात येईल