ATM withdrawal fees to increase from may 1 In Marathi : एटीएममधून पैसे काढणे महागणार

atm withdrawal fees to increase from may 1 Information In Marathi : काय आहे एटीएम चे नवीन नियम

atm withdrawal fees to increase from may 1 : आपण अनेकदा एटीएम मधून पैसे काढतो आजचे सध्या युग ऑनलाईन पद्धतीचे झाले असल्यामुळे नागरिक स्वतःजवळ पैसे ठेवत नाहीत. काम असेल त्यावेळी पटकन जवळील एटीएम मध्ये जायचे आणि पैसे काढायचे किंवा ऑनलाईन पेमेंट करायचे असे सध्या जगभर सुरू आहे. परंतु आता एटीएम मधून पैसे काढणे हे महागात पडणार आहे.

ATM Withdrawal Fees एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया ने नवीन शुल्क आकारले आहेत. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने एटीएम ATM इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याची मंजुरी दिली आहे. हे वाढीवशुल्क 1 मे 2025 पासून लागू होणार आहे.

ATM Withdrawal Fees आज या लेखाच्या माध्यमातून आपण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आता अजून किती पैसे शिल्लक द्यावे लागणार याची माहिती पाहणार आहोत. 1 मे पासून बदलणाऱ्या नियमानुसार होम बँक नेटवर्क बाहेर ATM मशीन मधून कोणताही व्यवहार झाला किंवा बॅलन्स चेक झाला तरी युजरला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

ATM Withdraw Fee Hike सध्या होम बँक नेटच्या नेटवर्क बाहेर ATM वापरण्याचे शुल्क लागू असून 1 मे पासून त्यात आता अजून वाढ होणार आहे. ही दरवाढ नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावाच्या आधारे आरबीआयने मंजूर केलेल्या दुरुस्तीचा भाग आहे.

ATM Withdraw Fee Hike आतापर्यंत होम बँकेच्या एटीएम व्यतिरिक्त इतर नेटवर्कच्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढत असल्यास प्रत्येक व्यवहार 17 रुपये शुल्क द्यावे लागत होते. जे 1 मे पासून यामध्ये वाढ होणार असून ती रक्कम आता 19 रुपये झाली आहे. याशिवाय दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून बॅलन्स चेक करत असाल तर त्यासाठी 6 रुपये शुल्क आकारले जात होते ते वाढवून आता 7 रुपये करण्यात आलेले आहे.

rule change from 1st May जेव्हा बँक यूजर त्यांच्या विनामूल्य मासिक व्यवहार मर्यादेनंतर पैसे काढतात तेव्हा हे शुल्क लागू होते. शहरांमध्ये होम बँक वगळता इतर एटीएम मधून मोफत व्यवहाराची मर्यादा 5 निश्चित करण्यात आली आहे. तर बिगर मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा 3 आहे.

rule change from 1st May व्हाईट लेवल एटीएम चालकांकडून ATM पैसे काढण्याच्या शुल्क वाढीची मागणी सातत्याने केली जात होती. वाढता ऑपरेटिंग खर्च लक्षात घेता जुने शुल्क कमी असल्याचा व्यक्तिवाद त्यांनी केला NPCI च्या प्रस्तावाला RBI ने मंजुरी दिल्यानंतर छोट्या बँकांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.

Atm withdrawals to cost more त्यांच्या मर्यादित पायाभूत सुविधांमुळे इतर बॅंकेच्या एटीएम नेटवर्क मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. वाढीव इंटरचेंज फी अशी रक्कम आहे जी बँक दुसऱ्या बँकेला देते जेव्हा त्याचा एक ग्राहक पैसे काढण्यासाठी दुसऱ्या बँकेच्या एटीएम चा वापर करतो.

NPCI ने यासंदर्भात बदल लागू करण्यासाठी आरबीआय कडे मंजुरी मागितली या संबंधात आरबीआयने 11 मार्च 2025 ला लिहिलेल्या पत्रात NPCI ला सूचना देण्यात आली. Atm withdrawals to cost more त्यामध्ये एटीएम इंटरचेंज शुल्क एटीएम नेटवर्क द्वारे निश्चित केले जाऊ शकते असे सांगण्यात आलं.