PM-JAY : आयुष्मान भारत योजना 2026
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ₹5 लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
देशातील प्रत्येक गरिबाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 5 लाख रुपयांचे प्रतिवर्ष कॅशलेस मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात. या योजनेला बघता बघता 8 वर्षे पूर्ण झाली. 8 वर्षात या योजनेअंतर्गत 60 कोटी पेक्षा अधिक नागरिकांना 5 लाख रुपये पर्यंतचे मोफत उपचार कवच देण्यात आले.
आरोग्य क्षेत्रातील ही योजना एक गेम चेंजर म्हणून समोर आली आहे. या योजनेमुळे देशातील नागरिकांना कुठल्याही रुग्णालयामध्ये पाच लाख रुपयांचे कॅशलेस मोफत उपचार घेता येतात. केंद्र सरकारने सुरू केलेली ही आयुष्मान भारत योजना जगभरातील सर्वात मोठी आरोग्य सुविधा मोफत देणारी एकमेव योजना ठरली आहे.
जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असलेल्या आयुष्मान भारत योजनेला (हेल्थ केअर स्कीम)
8 वर्ष पूर्ण झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी दिलेले माहितीनुसार या योजनेअंतर्गत देशातील 60 कोटी पेक्षा अधिक लोकांना 5 लाख रुपये प्रति वर्ष मोफत उपचार कवर देण्यात येत आहे.
आयुष्मान भारत योजनेला 23 सप्टेंबर 2026 ला आठ वर्षे पूर्ण झाले आहेत. या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबर 2018 रोजी केंद्र सरकारने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या रांची येथून या योजनेची सुरुवात केली होती. केंद्र सरकार ही योजना जगातील सर्वात मोठी हेल्थकेअर स्कीम मानली जाते. कारण या योजनेचे आरोग्य कवर 60 कोटी पेक्षा अधिक देशातील नागरिकांना देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी या योजनेची आकडेवारी जाहीर केली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी नागरिकाला 5 लाख रुपयांचे मोफत कॅशलेस उपचार प्रतिवर्षी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिरामध्ये 500 कोटीपेक्षा अधिक विजिटर्स
Ayushman Bharat Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्मान योजनेला 23 सप्टेंबर रोजी आठ वर्षे पूर्ण झाले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की या योजनेची सुरुवात प्रत्येक भारतीयांसाठी चांगले आणि किफायतशीर आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली होती.
Ayushman Bharat 60 crore beneficiaries : आज देशातील 60 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना वर्षाला 5 लाख रुपये पर्यंतचे आरोग्य कवच मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जमिनी स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र मजबूत करण्याच्या उद्देशाने आरोग्य आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आतापर्यंत 500 कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी उपचार घेतले आहेत. ही योजना मोठी गेम चेंजर ठरत आहे.
48.54 कोटीपेक्षा अधिक आयुष्मान कार्ड
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार आयुष्मान भारत पीएमजेवायने देशांमध्ये आरोग्य सुविधाचा दर्जा वाढवला आहे. या योजनेमध्ये 48.54 कोटी पेक्षा अधिक आयुष्मान कार्ड तयार झाले आहेत. एवढेच नाही तर 13 कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी या योजनेअंतर्गत उपचार घेऊ शकतात. 39 हजार पेक्षा अधिक रुग्णालय या योजनेची जोडण्यात आले आहेत. देशभरामध्ये सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मिळून 39 हजारापेक्षा अधिक रुग्णालयामध्ये ही योजना अंतर्गत नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. या रुग्णालयाच्या माध्यमातून दोन लाख कोटी पेक्षा अधिक उपचार आणि हॉस्पिटल उपलब्ध करण्यात आले आहे.
6.07 कोटी पेक्षा अधिक आयुष्मान कार्ड
Ayushman Bharat PM-JAY आयुष्मान भारत जन आरोग्य योजना संपूर्ण देशभरात चालवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. यामध्ये गरीब कुटुंबातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत एका उत्तर प्रदेश मध्ये आतापर्यंत 6.07 कोटी पेक्षा अधिक आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत. राज्यामध्ये 6497 रुग्णालयाच्या माध्यमातून आतापर्यंत 1.08 कोटी पेक्षा अधिक उपचार सुविधा दिल्या आहेत.
महाराष्ट्र आघाडीवर
महाराष्ट्रातही आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत नागरिकांना 5 लाख रुपयांचे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येतात. यामुळे गरिब परिस्थितीमध्येही नागरिकांना चांगले दर्जेदार उपचार घेता येत आहेत. कोणीही उपचारापासून वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत एका कुटुंबाला 5 लाख रुपयांचे मोफत कॅशलेस उपचार उपलब्ध करून दिल्या जातात, जेणेकरून चांगल्या रुग्णालयामध्ये नागरिक उपचार घेऊ शकतील.
Read About : Maharashtra Drought : दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही
Read About : PM Shram Yogi Mandhan : खाते निष्क्रिय झाले? पुन्हा ॲक्टिव्ह करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
website : yojanamazi.com