Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi : गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान

Table of Contents

Gay Gotha Anudan Yojana 2024 Information In Marathi : गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Gay Gotha Anudan Yojana 2024 महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन व्यवसाय करतात. मात्र आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाय, म्हशी साठी पक्का छत असलेला गोठा बांधता येत नाही. अशा सर्व पशुपालकांना आता गाई, म्हशी साठी पक्का गोठा बांधण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना 2024 सुरू करण्यात आली आहे.

Gay Gotha Anudan Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालक आपल्या गाई म्हशीसाठी पक्का गोठा बांधू शकते. या योजनेच्या माध्यमातून गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गाय, म्हैस आहेत. शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन करून त्यांच्या दुधातून आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत, मात्र  त्यांच्याकडे जनावरांच्या गोठ्याची जागा ही ओबडधोबड असते. जनावरासाठी असलेले गोठे व्यवस्थित नसतात. यामुळे जनावरांना ऊन, वारा, पाऊस, थंडी आदिचा सामना करावा लागतो. याचबरोबर आधुनिक गोठे नसल्यामुळे जनावरांचे शेण व मूत्र इतरत्र पडते.

Gay Gotha Anudan Yojana पावसाळ्याच्या दिवसात गोठ्यातील जमीन दलदली सारखी होते व सर्वत्र चिखल पसरतो. अशा चिखलातच जनावरांना बसावे लागते. त्यामुळे त्यांना इतर आजार होण्याचीही शक्यता असते. यातून जनावरांना स्तनदः आजार होण्याची शक्यता अधिक असते यावर हजारो रुपये खर्च होतात. तर काही वेळेस गाई, म्हशींची कास निकामी होणे. त्यांच्या शरीराच्या खालील बागुल भागास जखमा होणे किंवा एखाद्या प्रकरणी जनावराचा मृत्यू होणे अशा घटना घडत असतात. अशा घटना घडू नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना 2024 Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi सुरू केलेली आहे.

Gay Gotha Anudan Yojana अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे गोठा बांधलेला नसल्यामुळे जनावरांना चारा टाकण्यासाठी दावण नसते. त्यांच्यासमोर असलेल्या मोकळ्या जागेवर चारा टाकला जातो. या चाऱ्यावर शेण, मूत्र पडल्याने जनावरे चारा खात नाहीत. हा चारा वाया जातो गोठ्यामध्ये ओबडधोबड जमिनीमुळे मूत्र आणि शेण संचय करण्यास अडचणी निर्माण होतात. आणि ते वाया जाते जनावराचे शेण हे सेंद्रिय खत असल्याने जनावराच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँग्रेसचा वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणारे शेण आणि मूत्र गोठ्या च्या बाजूला खड्ड्यामध्ये एकत्र जमा करून जमिनीची सुपीकता वाढविण्यास महत्त्वाचे ठरते.

मात्र राज्यातील अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांना जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील पशुपालक आणि शेतकरी यांच्या सर्व समस्यांचा विचार करत महाराष्ट्र सरकारने राज्यात गाय गोठा अनुदान योजना 2024 Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi सुरू करण्याचा महत्त्वाचा एक निर्णय घेतला आहे.

Gay Gotha Anudan Yojana या योजनेच्या माध्यमातून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येते. या अनुदानातून शेतकरी आपल्या जनावरासाठी सिमेंट काँक्रेट चा पक्का गोठा बांधू शकतात. या योजनेच्या माध्यमातून गाई म्हशींचा गोठा बांधण्यासाठी पशुपालक आणि शेतकऱ्यांना राज्य सरकार 77 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.

Gay Gotha Anudan Yojana

ठळक मुद्दे

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Gay Gotha Anudan Yojana 2024 Information In Marathi

गाय गोठा बांधणी अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Gay Gotha Anudan Yojana In Short

गाय म्हैस पालन योजनेचे उद्दिष्ट

Gay Gotha Anudan Yojana Purpose

गाय गोठा अनुदान योजना 2024 ची वैशिष्ट्ये

Gay Gotha Anudan Yojana Features

गाय गोठा अनुदान योजनेचा फायदे

Gay Gotha Anudan Yojana Benefits

गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून एक लाभार्थ्यास पशुसंख्येच्या प्रमाणात मिळणारे अनुदान खालील प्रमाणे

Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi

गाय गोठा बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून गाय गोठा कसा असावा व गोठा बांधण्याची पद्धत खालील प्रमाणे

Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi

या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळेल लाभ

Gay Gotha Anudan Yojana 2024

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी

Gay Gotha Yojana

गाय गोठा अनुदान योजनेचे लाभार्थी

Gay Gotha Anudan Yojana Benefisior

गाय गोठा योजनेच्या अटी व शर्ती

Gay Gotha Anudan Yojana Terms And Conditions

अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

Gay Gotha Anudan Yojana 2024

गाय गोठा योजनेसाठी कागदपत्रे

Gay Gotha Anudan Yojana Documents

ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Gay Gotha Anudan Yojana Apply

FAQ’sवारंवार विचारले जाणारे प्रश्न

गाय गोठा बांधणी अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Gay Gotha Anudan Yojana In Short

योजनेचे नावगाय गोठा अनुदान योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली3 फेब्रुवारी 2021
लाभार्थीराज्यातील शेतकरी व पशुपालक
लाभगोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत
उद्देशपशुपालनासाठी प्रोत्साहन देणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Gay Gotha Anudan Yojana

गाय म्हैस पालन योजनेचे उद्दिष्ट

Gay Gotha Anudan Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना त्यांच्या गाई, म्हशीसाठी गोठा बांधून देण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • जनावरांना बांधण्यासाठी कायमस्वरूपी पक्के छत असलेला गोठा बांधणे.
  • जनावरांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षण करणे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • अन्य शेतकऱ्यांनाही पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे.

गाय गोठा अनुदान योजना 2024 ची वैशिष्ट्ये

Gay Gotha Anudan Yojana Features

  • गाय, म्हैस गोठा अनुदान योजना ही महाराष्ट्र सरकारच्या नियोजन विभागाद्वारे राबवली जाते.
  • लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या मदतीने जमा करण्यात येते.

गाय गोठा अनुदान योजनेचा फायदे

Gay Gotha Anudan Yojana Benefits

  • राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांना जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • शेतकरी गाय व म्हशीचे दूध, शेण, मूत्र इत्यादी विकून आर्थिक उत्पन्न मिळू शकतात.
  • पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होते.
  • जनावरांचा पाऊस, ऊन, थंडी, वारा यापासून रक्षण करणे.

गाय गोठा अनुदान योजनेच्या माध्यमातून एक लाभार्थ्यास पशुसंख्येच्या प्रमाणात मिळणारे अनुदान खालील प्रमाणे

Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi

  • गाय गोठा अनुदान योजनेच्या Gay Gotha Yojana माध्यमातून 2 ते 6 जनावरे असणाऱ्या साठी 77,188 रुपयांचे अनुदान देण्यात येते.
  • 6 ते 12 जनावरांसाठी दुप्पट आणि 18 पेक्षा अधिक जनावरांसाठी तीन पट अनुदान देण्यात येते.

गाय गोठा बांधण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातून गाय गोठा कसा असावा व गोठा बांधण्याची पद्धत खालील प्रमाणे

Gay Gotha Anudan Yojana 2024 In Marathi

  • 2 ते 6 जनावरांसाठीचा गोठा
  • 2 ते 6 जनावरे असलेल्या गोठ्यासाठी 26.95 चौरस मीटर निवारा जागा असावी त्याची लांबी 7.70 मीटर व रुंदी 3.50 मीटर असावी.
  • गव्हाण (दावन) 7.7 मीटर बाय 2.2 मीटर बाय 0.65मी. आणि अडीचशे लिटर क्षमतेचे मूत्र संचय यासाठी टाकी असावी.
  • जनावराच्या पाण्याच्या सुविधेसाठी 200 लिटर क्षमतेची टाकी ही बांधण्यात यावी.

या प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळेल लाभ

Gay Gotha Anudan Yojana 2024

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या विमुक्त जाती जमाती
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • महिला प्रधान कुटुंब
  • शारीरिक अपंगत्व असलेला व्यक्ती
  • भू सुधार योजनेचा लाभार्थी
  • अनुसूचित जातीचे व अन्य परंपरागत वन्यनिवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती
  • कृषी कर्ज माफी 2008 नुसार अल्पभूधारक शेतकरी (एक हेक्टर पेक्षा जास्त पण दोन हेक्टर (पाच एकर) पर्यंत जमीन असलेले शेतकरी (जमीन मालक/ कुळ) व सीमांत शेतकरी (एक हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी.)

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

फ्री स्कुटी योजना

किसान विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी

Gay Gotha Yojana

  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विविध वैयक्तिक (उदा. कामाचा प्रकार- फळबाग, वृक्ष लागवड, शेततळे)
  • सार्वजनिक (उदा. कामाचा प्रकार- ओढा, नाला, पाझर, तलाव, गाळ काढणे, रस्ते / ग्रामपंचायत क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन)
  • कामाच्या संयोगातून अकुशल- कुशल प्रमाण 60:40 लाभार्थी पातळीवरील राखण्यासाठी योजनेच्या माध्यमातून काम केले असावे. (याबाबतचे ग्रामसेवक कृषी सहाय्यक यंत्रणा अधिकारी यांचा कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा) लाभार्थी कुटुंबाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 वर्ष लागवड करून त्याचे 3 वर्षे संगोपन करावे. 100% झाडे जिवंत ठेवून योजनेचा लाभ पूर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्षी मध्य ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 फळझाडे /वृक्ष लागवड केल्यास गाय गोठा (छता विरहित) कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
  • वैयक्तिक क्षेत्रावर 50 पेक्षा अधिक फळझाडे वक्ष लागवड केल्यास गाय गोठा छतासह कामासाठी पात्र असेल.
  • सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम केल्यास छतासह गोठा कामाचा लाभाकरिता पात्र असेल व्यक्ती.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला पशुपालन असलेल्या बाबतचा पशु पर्यवेक्षक / पशु अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • गाय गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्याकडे 2 ते 6 जनावरे असणे आवश्यक आहेत.(जनावराचे टॅगिंग करणे आवश्यक राहील).
  • लाभार्थी कुटुंबाकडे नरेगा ओळखपत्र, ऑनलाइन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड झेरॉक्स प्रत असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावे जमीन जागा असणे आवश्यक आहे (सातबारा व आठ अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा (3 महिन्यातील) साक्षांकित प्रत.
  • अर्जदार व्यक्ती संबंधित गावाचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • निवडलेल्या कामाचा / जागेचा रेखांश अक्षांश असलेला फोटो सह ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक (नरेगा पशु धन पर्यवेक्षक लाभार्थी यांची संयुक्त सहीचा तडी पाहणी अहवाल जोडणे आवश्यक आहे).
  • अर्जदाराचे काम मंजूर झाल्यास केलेल्या कामाचे फोटो
  • गोठ्याचे काम सुरू करण्यापूर्वी चा फोटो
  • गोट्याचे काम चालू असतानाचा फोटो
  • गोठ्याचे काम पूर्ण झाल्याचा लाभार्थ्यासह फोटो
  • हे तीन प्रकारातील फोटो अंतिम रक्कम प्रस्तावासोबत सात दिवसात सादर करणे आवश्यक आहे.

गाय गोठा अनुदान योजनेचे लाभार्थी

Gay Gotha Anudan Yojana Benefisior

महाराष्ट्रातील पशुपालन करणाऱ्या शेतकरीना या योजनेच्या माध्यमातून गाय आणि म्हशी पालनासाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते त्यामुळे राज्यातील शेतकरी व पशुपालक या योजनेचे लाभार्थी आहेत.

गाय गोठा योजनेच्या अटी व शर्ती

Gay Gotha Anudan Yojana Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालकांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • एका कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • गाय गोठा योजनेसाठी Gay Gotha Yojana अर्जदाराकडे किमान 2 ते 6 जनावरे असणे आवश्यक आहेत.
  • अर्जदाराने गुराचे टॅपिंग करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला पशुपालनाचे ज्ञान असावे किंवा प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदाराने वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 25 व अधिक फळझाडे वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. तसेच सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम करणे आवश्यक आहे.

अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना

Gay Gotha Anudan Yojana 2024

Gay Gotha Yojana अनेक अर्जदाराच्या तक्रारी असतात की आम्ही गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज केला आहे त्यासाठी वर्ष होऊन गेले पण तरीपण आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र अशा आजाराने वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 पेक्षा अधिक झाडे लक्ष लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम करणे आवश्यक आहे तसं न केल्यास असे अर्जदाराला या योजनेचा लाभ दिला जात नाही.

गाय गोठा योजनेसाठी कागदपत्रे

Gay Gotha Anudan Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

जनावराची टायपिंग प्रमाणपत्र

कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र

ऑनलाइन जॉब कार्ड किंवा जॉब कार्ड झेरॉक्स प्रत

जमिनीचा 7/12 व 8 अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा

बँक पासबुक ची माहिती

ग्रामपंचायतचे प्राधान्य क्रमानुसार शिफारस पत्र

निवडलेल्या कामाचा जागेचा रेखांश अक्षांश असलेल्या फोटो सह ग्रामसेवक तांत्रिक सहाय्यक (नरेगा पशु धन पर्यवेक्षक लाभार्थी यांची संयुक्त सहीचा घटनास्थळाचा पाहणी अहवाल)

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट फोटो

स्वयंघोषणापत्र

Gay Gotha Anudan Yojana

ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

Gay Gotha Anudan Yojana Apply

Gay Gotha Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जावा लागेल. ग्रामपंचायत कार्यालयातून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरून त्यासोबत लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील व अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा लागेल.

FAQ’sवारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: गाय गोठा अनुदान योजना Gay Gotha Yojana म्हणजे काय?

उत्तर: महाराष्ट्रातील शेतकरी आणि पशुपालक यांना आपल्या गाय आणि म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.

प्रश्न: गाय गोठा अनुदान योजनेचा Gay Gotha Yojana उद्देश काय?

उत्तर: जनावरांना चांगला पक्का गोठा बांधण्यासाठी शेतकरी आणि पशुपालकांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

प्रश्न: गाय गोठा अनुदान Gay Gotha Yojana योजनेचा अर्ज कसा करावा? उत्तर: गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA