shri siddhivinayak bhagyalakshmi yojana Information In Marathi 2025 : श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना
shri siddhivinayak bhagyalakshmi yojana : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलीच्या नावावर तिच्या आईच्या बँक खात्यामध्ये 10 हजार रुपयाची एफडी केली जाणार आहे.
shri siddhivinayak bhagyalakshmi yojana ट्रस्टच्या समितीने या योजनेला मंजुरी दिली आहे आणि सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर या योजनेचे नियम आणि अटींची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
shri siddhivinayak temple bhagyalakshmi yojana राज्यात श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने या योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे.
shri siddhivinayak temple bhagyalakshmi yojana महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन करण्यात ही योजना महत्त्वाची ठरली. राज्य सरकारकडून यापूर्वी अनेक योजना सुरू करण्यात आले आहेत. मात्र लाडकी बहिणी योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली. महाराष्ट्र सरकारच्या वतीने यापूर्वीच मुलींच्या कल्याणासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे.
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana या अंतर्गत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपये अनुदान सरकारच्या वतीने देण्यात येते. याबरोबर सरकारकडून लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत मुलींना वयाच्या 18 वर्षापर्यंत 75 हजार रुपयाची मदत केली जाते.
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana मात्र आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू करण्यात येणार आहे. नेमकी ही योजना कशी आहे? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने लेक वाचवा लेकीला शिकवा या स्वरूपाचे धोरणाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हातभार लावणार आहे. यासाठी राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या आईच्या खात्यावर 10 हजार रुपयाची एफडी स्वरूपात रक्कम जमा करण्याचा निर्णय न्यास समितीने घेतला आहे.
maharashtra shri siddhivinayak bhagyalakshmi yojana सिद्धिविनायक न्यास व्यवस्थापन समितीकडून या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे, या संबंधीचा प्रस्ताव सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. सरकारच्या मान्यतेनंतर या योजनेची पात्रता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.
maharashtra shri siddhivinayak bhagyalakshmi yojana मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. ट्रस्टला प्राप्त झालेल्या उत्पन्नातून गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक उपलब्ध करून देणे, डायलेसिस सेंटर द्वारे रुग्णांना मदत करणे आधी प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचा गरीब नागरिकांना मोठा फायदा होतो.
133 कोटी ट्रस्टचे वार्षिक उत्पन्न
maharashtra shri siddhivinayak bhagyalakshmi yojana मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च रोजी पार पडली. यावेळी संस्थांचे अध्यक्ष सदानंद सरवणकर अध्यक्ष स्थानी होते. मंदिर न्यासचा 2024- 25 चे वार्षिक विवरणपत्र, 2025- 26 चा अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक 31 मार्च 2025 रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर केले गेले.
shri siddhivinayak bhagyalakshmi yojana यावेळी न्यासचे सर्व विश्वस्त, प्रशासन यांची नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि भाविकांच्या बाबतीमध्ये सहभागामुळे 2024-25 या वर्षात न्यासचे उत्पन्न 114 कोटी अपेक्षित होते ते विक्रमी 133 कोटीच्या घरात पोहोचले आहे. मागील वर्षाची तुलनेत या उत्पन्नात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
shri siddhivinayak bhagyalakshmi yojana मंदिर न्यासने 2025 -26 या वर्षासाठी 154 कोटी चे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. दरम्यान राज्यातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री सिद्धिविनायक भाग्यश्री योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सरकार मान्यतेसाठी पाठवत असल्याची घोषणा न्यासचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थित करण्यात आली. त्यामुळे लवकरच राज्य सरकारच्या मान्यतेनंतर राज्यात श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली जाणार आहे.