Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 In Marathi : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास मिळणार दोन लाखाची मदत

Table of Contents

Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 Information In Marathi : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 मराठी माहिती

Gopinath Munde Apghat Vima Yojana 2024 : महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. त्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी विविध धोरणांची अंमलबजावणी करते. याचाच भाग म्हणून सरकारने शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठीच्या उद्देशासाठी त्यास विमा संरक्षण मिळावे यासाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली आहे.

चला तर मग आपण या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची संपूर्ण माहिती पाहूया. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना म्हणजे काय?, या योजनेसाठी पात्रता काय आहे?, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा आदी संपूर्ण प्रश्नांची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Gopinath Munde Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना म्हणजे काय?

What Is Gopinath Munde Apghat Vima Yojana

Gopinath Munde Apghat Vima Yojana केंद्र आणि राज्य सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. यात आरोग्य सुविधा, विमा योजना, उज्वला योजना, व्यवसाय लोन योजना आदी योजना सरकार राबवत आहे. आता अशीच एक योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 असे आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने 2  लाख रुपये दिले जातात.

Gopinath Munde Apghat Vima Yojana महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केलेली आहे. शेतीत काम करत असताना शेतकऱ्याला अनेक समस्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघात होण्याची भीती जास्त असते. यात पावसाळ्यामध्ये अंगावर वीज पडू शकते, पुरात वाहून जाणे, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, विजेचा शॉक लागणे, वाहन चालवताना अपघात होणे अशा अन्य कारणामुळे शेतकऱ्यांचा अपघात होऊन शेतकऱ्याचा मृत्यू किंवा शेतकरी कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. शेतकरी कुटुंबातील कर्ता पुरुष आशा अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तसेच उपचार करण्यासाठी ही भरपुर पैसा लागतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्याच्या उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबाला मदत करण्यात आली आहे.

Gopinath Munde Apghat Vima Yojana भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशातील बहुतांश शेतकरी पावसावर आधारित शेती करतात. कधी अवकाळी, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यासारख्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही होते. परिणामी बहुतांश शेतकरी दारिद्र्यरेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत. ते आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत त्यांना विम्याचे महत्त्व माहीत असूनही आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वतःचा किंवा कुटुंबाचा विमा काढू शकत नाहीत. अशावेळी एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याआधी सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य ( शेतकऱ्यांच्या आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी ज्यांचे वय 10 ते 75 वयोगटातील एकूण दोन व्यक्ती) या योजनेचा साठी पात्र आहे. त्यामुळे यांना सरकारच्या माध्यमातून विमा संरक्षण प्रदान केले जाते. जेणेकरून यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास सरकार या योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत करते आणि त्यांचे कुटुंब सावरण्यात मदत होते.

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024 राज्यातील एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना किंवा शेती संबंधित इतर काम करत असताना अचानक अपघाती मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये आर्थिक मदत करण्यात येते व अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारच्या वतीने दिली जाते. राज्यातील शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. Gopinath Munde Vima Yojana

ठळक मुद्दे :

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024 मराठी माहिती

Gopinath Munde Apghat Vima Yojana Information

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना म्हणजे काय?

What Is Gopinath Munde Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Gopinath Munde Vima Yojana In Short

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा उद्देश

Gopinath Munde Vima Yojana Purpose

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे वैशिष्ट्ये

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Features

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबास खालील प्रमाणे लाभ घेता येईल

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभ

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024 Benefits

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत समाविष्ट अपघाताची कारणे

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

या कारणामुळे मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे योजनेसाठी दावा सादर करण्याचा कालावधी

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना साठेची पात्रता

Gopinath Munde Apghat Vima Yojana Eligibility

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना नियम व अटी

Gopinath Munde Apghat Vima Yojana Terms And Conditions

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताच्या घटनेच्या नंतर पुरावा दाखल सादर करावयाची कागदपत्रे

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Gopinath Munde Apghat Vima Yojana Documents

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची प्रक्रिया

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची थोडक्यात माहिती

Gopinath Munde Vima Yojana In Short

योजनेचे नावगोपीनाथ मुंडे अपघात योजना
विभागकृषी विभाग महाराष्ट्र शासन
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सर्व शेतकरी
लाभ2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत
उद्देशअपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://krishi.maharashtra.gov.in/
Gopinath Munde Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा उद्देश

Gopinath Munde Vima Yojana Purpose

Gopinath Munde Vima Yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना अचानक किंवा शेती क्षेत्राशी संबंधित काम करत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.

Gopinath Munde Vima Yojana शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला उपचारासाठी लागणारा पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते नागरिकांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे वैशिष्ट्ये

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Features

राज्यभरातील शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या Gopinath Munde Vima Yojana माध्यमातून आकारण्यात येणारी इमेज रक्कम 32.23 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जी सरकारमार्फत दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्त्याची रक्कम भरणे गरजेचे नाही.

Gopinath Munde Vima Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठल्या अडचणीचा सामना करावा लागू नये.

Gopinath Munde Vima Yojana योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खाते मध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाते.

विमा पॉलिसी लागू झाल्याच्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहित्ती धारक खातेदार म्हणून नोंद असलेला कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना त्याच्या कुटुंबास खालील प्रमाणे लाभ घेता येईल

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

अपघात झाल्यास नुकसान भरपाई

मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत

अपघातात दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये

अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये मदत दिली जाते

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लाभ

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024 Benefits

  • Gopinath Munde Vima Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा हप्ता भरण्याची गरज नाही कारण महाराष्ट्र सरकार दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला रक्कम अदा करत आहे.
  • शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी लागणाऱ्या पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये म्हणून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.
  • यामुळे शेतकरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगले उपचार घेऊ शकतो आणि त्याला आर्थिक अडचण भासणार नाही.
  • एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
Gopinath Munde Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अंतर्गत समाविष्ट अपघाताची कारणे

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू होणे

विजेचा शॉक लागून मृत्यू होणे

पाण्यात पडून मृत्यू होणे

पुरात वाहून जाणे

नैसर्गिक आपत्ती

सर्प, विंचू, दान्स, बाळातपणातील मृत्यू

रेल्वे अपघात

वाहन अपघात

रस्त्यावरील अपघात

उंचावर पडून झालेला अपघात

जंतुनाशक हाताळताना किंवा अन्य कारणामुळे झालेली विषबाधा

खून, दंगल, नक्षलवाद्याकडून हत्या

हिंसक जनावराने चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे

या कारणामुळे मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

नैसर्गिक मृत्यू

विमा कालावधी पूर्वीच अपंगत्व

आत्महत्या

आत्महत्याचा प्रयत्न करणे

अमली पदार्थ सेवनामुळे झालेला अपघात

गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्यांचे उल्लंघन करून झालेला अपघात

बाळातपणातील मृत्यू

सैन्यातील नोकरी

जवळच्या व्यक्तीकडून खून

भ्रमिष्टपणा

शरीरातील रक्तस्त्राव  

युद्ध

गोपीनाथ मुंडे योजनेसाठी दावा सादर करण्याचा कालावधी

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठी अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधी संपल्यानंतर देखील 30 दिवसापर्यंत विमा कंपनीकडे सादर करता येईल. अपघातात तसेच शेतकऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील वारसदाराची निवड व सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्यक्रमानुसार आदा करण्यात येईल.

अपघात ग्रस्त शेतकऱ्याची पत्नी/ अपघात ग्रस्त स्त्रीचा पती. अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताचे आई, अपघात ग्रस्ताचा मुलगा, अपघात ग्रस्ताचे वडी,ल अपघात ग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना साठेची पात्रता

Gopinath Munde Apghat Vima Yojana Eligibility

महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे असा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

ज्या व्यक्तीच्या नावे सातबारा नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे अशा कुटुंबातील कोणताही एक सदस्य या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना नियम व अटी

Gopinath Munde Apghat Vima Yojana Terms And Conditions

अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.  

अर्जदार हा शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार शेतकऱ्याचे वय 10 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.  

विमा कालावधी संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत दावा अर्ज जमा न केल्यास अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार नाही.

या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने, शेतकऱ्याच्या वारसदाराने सरकारच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्त साठी सुरू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास त्याला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत अपघाताच्या घटनेच्या नंतर पुरावा दाखल सादर करावयाची कागदपत्रे

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Maharashtra 2024

अपघाताचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, रस्ता रेल्वे अपघात, पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास, त्याचा मोटर वाहन परवाना

पाण्यामध्ये बुडवून मृत्यू झाल्यास पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

बुडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल

विषबाधा– कीटकनाशके किंवा अन्य कारणामुळे विषबाधा झाल्यास, पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

रासायनिक विश्लेषण अहवाल

विजेचा धक्का– लागून झालेला अपघात यामध्ये पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

वीज पडून मृत्यू झाल्यास पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

खून झाल्यास- पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, रासायनिक विश्लेषण अहवाल

उंचीवर पडून मृत्यू झाल्यास पंचनामा पोस्टमार्टम अहवाल, पोलीस अंतिम अहवाल

सर्पदंश झाल्यास- पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल, वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्टमार्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट देण्यात येते मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिसाक्षांकित असणे गरजेचे आहे.

नक्षलवाद्याकडून झालेली हत्या- पंचनामा, पोस्टमार्टम अहवाल

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Gopinath Munde Apghat Vima Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

सातबारा

रहिवासी प्रमाणपत्र

शेतकरी असल्यासाठीचे प्रमाणपत्र

दावा अर्ज

अपघातग्रस्तांच्या वयाचा पुरावा

बँक खाते क्रमांक

एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल

इन्वेस्ट पंचनामा

मृत्यू प्रमाणपत्र

अपंगत्व दाखला घोषणापत्र

फोटो

अपघात स्थळाचा पंचनामा

पोस्टमार्टम अहवाल

कृषी अधिकारी प्रमाणपत्र

औषधोप्तराचे कागदपत्रे

डिस्चार्ज कार्ड

Gopinath Munde Apghat Vima Yojana

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत दावा अर्ज करण्याची प्रक्रिया

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana Apply

Gopinath Munde Apghat Vima Yojana ज्यावेळी शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण समोर येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांचे वारसदार यांनी दावा अर्ज व सोबत सर्व निर्धारित कागदपत्र देऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

उत्तर: महाराष्ट्रातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील एक सदस्याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अंतर्गत लाभ दिला जातो.

प्रश्न: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या माध्यमातून अर्जदाराचे वय किती असावे?

उत्तर: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 10 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

प्रश्न: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा कसा करावा अर्ज?

उत्तर: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागतो.

प्रश्न: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत किती मिळतो विमा?

उत्तर: गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचा विमा मिळतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA