HMPV Virus News In Marathi : काय आहेत HMPV व्हायरसचे लक्षण
HMPV Virus News In Marathi : चीनमध्ये HMPV हा व्हायरस वेगाने पसरला आहे. ह्या व्हायरसचा सर्वाधिक परिणाम हा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं यांच्यावर होताना दिसत आहे. सर्वाधिक लागण लहान मुलांमध्ये झालेली असून लहान मुलांच्या मुलांचे वार्ड कमी पडत आहेत एवढा व्हायरस चीनमध्ये पसरला आहे.
हॉस्पिटलच्या बाहेर या व्हायरसची लागण झालेल्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. चीन सह भारतातही या व्हायरसचे काही रुग्ण आढळले आहेत.
या ह्युमन व्हायरसचे नागपुरात 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी कर्नाटकात 2, गुजरात मध्ये 1, पश्चिम बंगाल मध्ये 1 आणि तमिळनाडू राज्यात 2 असे प्रकरणे समोर आली आहेत.
नागपूरमधील एका 13 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षण दिसली आहेत.
14 वर्षाखालील मुलांना झाली लागण
चीन मधल्या या व्हायरस चा परिणाम 14 वर्षाखालील मुलांमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांमध्ये देखील या आजारात व्हायरस पसरत असल्याचे देखील समोर आले आहे .
काय आहेत लक्षणे
या आजाराचे लक्षण अगदीच सामान्य आहे हा आजार होण्यापूर्वी ताप येणे, खोकला येणे, नाक बंद होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घशात घरघर होणे, अस्वस्थ वाटणे इत्यादी आजाराची लक्षणे आहेत.
HMPV Virus हा आजार झाल्यास गंभीर प्रकरणात निमोनिया होण्याची शक्यता असते.
HMPV चिनी रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार 2023 मध्ये सांगण्यात आले की, 2009 ते 2019 पर्यंत श्वसन संबंधित संसर्गजन्य रोगांच्या आकडेवारीनुसार एचएमपीव्ही हा श्वसन संबंधित संसर्ग निर्माण करणाऱ्या 8 व्हायरस पैकी 8 व्या स्थानावर आहे. ज्याची पॉझिटिव्हिटी दर 4.1% आहे.
कसा पसरतो हा व्हायरस
एचएमपीव्ही संसर्गित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंका येण्यामुळे हा व्हायरस पसरतो.
हा व्हायरस सर्वात जास्त थंडीच्या दिवसात पसरतो.
थंडीमुळे सर्दी खोकला होतो आणि त्याच्या संपर्कात आल्यानंतर हा संसर्ग होऊ शकतो.
कशी घ्याल काळजी
- HMPV या व्हायरस पासून वाचायचे असल्यास रोगाची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे हा आजार पसरतो त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा.
- कमीत कमी 20 सेकंदापर्यंत साबणाने हात धुवा.
- डोळे, नाक आणि तोंडाला हात लावू नका.
- तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, थकवा जाणवत असेल, गळ्यात खवखवत असेल, ताप आला असेल तर घरीच थांबा.
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
- सार्वजनिक ठिकाणी जाणारा असाल तर तोंडाला मास्क लावा.
- ज्या लोकांमध्ये या आजाराचं लक्षण दिसून येत आहे त्यांच्यापासून दूर राहा.
- जर तुम्हाला तुमच्यात HMPV ची लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.