pm Kaushal vikas yojana gave 24 lacs placement in marathi : PMKVY योजनेतून 24 लाख तरुणांना मिळाली नोकरी

pm Kaushal vikas yojana gave 24 lacs placement information in marathi 2025 : PMKVY 4.0 योजना सुरु, तुम्ही केला का अर्ज

pm Kaushal vikas yojana gave 24 lacs placement केंद्र सरकार देशातील तरुणांसाठी अनेक सरकारी योजना चालवत आहे. यातीलच एक म्हणजे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ प्रशिक्षणच नाही तर त्यांना नोकरीचा प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी मदत केली जाते. तीन यशस्वी टप्प्यानंतर पीएमकेव्हीवाय 4.0 सुरू करण्यात आली आहे.

pm Kaushal vikas yojana gave 24 lacs placement या योजनेद्वारे प्रशिक्षण घ्या आणि तेही मोफत आणि चांगले नोकरी मिळवायची संधी मिळवा. नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकार तुमची मदत करत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील तरुणांना मिळत आहे. अशा प्रकारच्या अनेक योजना आहेत, ज्याचा लाभ घेऊन तरुण आपले करिअर उंच शिखरापर्यंत नेऊ शकतात.

pm Kaushal vikas yojana प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना पण अशाच प्रकारची केंद्र सरकारची एक योजना आहे, ती यशस्वी होत आहे या योजनेअंतर्गत देशातील तरुणांना स्किल ट्रेनिंग देण्यात येते. याद्वारे प्रमाणपत्र मिळते, पैसेही मिळतात आणि त्यानंतर प्लेसमेंटही दिली जाते.

pm Kaushal vikas yojana नुकतेच राज्यसभेमध्ये केंद्र सरकारने पीएमकेव्हीवायची विशेषता सांगितले आहे. या योजनेचे तीन टप्पे यशस्वी पद्धतीने पूर्ण झाले आहेत आणि 1.6 कोटी तरुणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेतून 43% प्लेसमेंट मिळाली आहे म्हणजेच प्रशिक्षण घेतल्यानंतर सरकारच्या प्लेसमेंट सेवेचा लाभ तरुणांनी घेतला आहे.

pm Kaushal vikas yojana आता सरकार पीएमकेव्हीवाय 4.0 सुरू केली आहे. तरुणांसाठी आनंदाची बाब म्हणजे पीएमकेव्हीवाय 4.0 मध्ये अधिक मोठ्या संस्थांना जोडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेच्या चौथ्या टप्प्यांमध्ये अधिक मान्यता प्राप्त संस्था ना एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

71 लाख तरुणांनी घेतले प्रशिक्षण

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यसभेमध्ये सांगितले की पीएमकेव्हीवाय १.०, पीएमकेव्हीवाय 2.0 आणि पीएमकेव्हीवाय 3.0 दरम्यान 71 लाख तरुणांनी प्रशिक्षण घेतले आहे. यातील जवळपास 43 टक्के म्हणजेच 24. 47 लाख तरुणांना प्लेसमेंट मिळाली आहे.

या योजनेचा लाभ 1.6 कोटी तरुणांपर्यंत पोहोचला आहे. जर तुम्ही अजून या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर यावेळी तरी तुम्ही या योजनेपासून वंचित राहू नका. तत्काळ अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

PMKVY 4.0 मध्ये असतील विशेष मॉड्युल

PMKVY 4.0 मध्ये यापूर्वीच्या योजनेपेक्षा अधिक सुविधा देण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमकेव्हीवाय 4.0 मध्ये स्वयंरोजगारा प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मॉड्युल आणले जात आहेत. या मॉडेलचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना आवश्यक फायनान्स आणि कायदेशीर बाबींची माहिती ही शिकवली जाणार आहे.

या प्रशिक्षणाचा फायदा हा असेल की तरुणांना नोकरी ऐवजी स्वयंरोजगाराची मानसिकता विकसित करणे, याबरोबरच बाजाराचे विश्लेषण व्यवसाय प्रोजेक्टची योजना बनवणे, त्याची मार्केटिंग करणे आणि ध्येयधोरण आणि छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर माहिती देण्यात येणार आहे.

या सर्व गोष्टी पीएमकेव्हीवाय 4.0 च्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये रोजगार योग्यता कौशल्य कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

2015-16 ते 2021-22 दरम्यान PMKVY या योजनेच्या तीन टप्प्यांमध्ये शॉर्ट टर्म ट्रेनिंग देऊन स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्यावर काम करण्यात आले. 2022-23 मध्ये PMKVY 4.0 सुरू करण्यात आली. तिचा मुख्य फोकस म्हणजे उमेदवारांसाठी योग्य माहिती देण्याबरोबरच करिअरच्या वेगवेगळ्या संधी मिळत आहेत.

या योजनेअंतर्गत 948 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. याअंतर्गत देशभरामध्ये 729 प्रधानमंत्री कौशल्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत आणि 200 पेक्षा अधिक आयटीआय प्रशिक्षण केंद्र या अंतर्गत सुरू आहेत.