PM Kisan Yojana : या शेतकऱ्यांना नाही मिळणार 2000 रुपये

जाणून घ्या का?

Kisan Yojana 24th Installment : तुम्हीही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहात. मात्र तुम्हाला माहिती आहे का की काही शेतकरी या वेळी 2000 रुपयांच्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. येथे जाणून घ्या ते कसे?

Kisan Yojana 24th Installment : शेतकऱ्यांची आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षातून तीन वेळेस दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. जेणेकरून शेती- शेतकरी संबंधित खर्चासाठी मदत होऊ शकेल.

PM Kisan Yojana : या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन-दोन हजार रुपये म्हणजेच एकूण 6 हजार रुपये वर्षाला दिले जातात. आता शेतकऱ्यांना 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यावेळेस पैसे येणार का? काही शेतकऱ्यांची हप्ता अडकू शकतो. कोणत्या शेतकऱ्यांना 24वा हप्ता मिळू शकत नाही. चला जाणून घेऊया सोप्या भाषेमध्ये..

या शेतकऱ्यांचा अडकू शकतो हप्ता?

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा लाभ केवळ अशा शेतकऱ्यांना मिळतो जे या योजनेसाठी पात्र आहेत. जर एखादा शेतकरी पात्र नसतानाही चुकून चुकीच्या कागदपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याचे नाव लाभार्थी यादीतून हटवले जाणार आहे. दरम्यान कृषी विभाग सतत लाभार्थ्यांची तपासणी करत असतो. तपासणीमध्ये अपात्र दिसून आलेल्या शेतकऱ्यांची नावे यादीतून हटवली जातात आणि त्यांना मिळणारा हप्ताही थांबवला जातो.

जर तुम्हीही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल तर तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे वेळेत केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेतून मिळणाऱ्या हफ्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता.

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना भू-सत्यापन आणि आधार लिंकिंग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अजूनही ही दोन कामे केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर वेळेवर तुम्ही भू सत्यापन आणि आधार लिंकिंग, केवायसी प्रक्रिया ही कामे पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता अडकणार नाही.

कधी जमा होणार पुढील हप्ता?

पीएम किसान योजनेचा हप्ता प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. मागील 23 वा हप्ता जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. त्यामुळे आता चार महिन्यानंतर म्हणजेच ऑक्टोंबर मध्ये पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून 24 वा हप्ता कधी जमा होणारे याची तारीख अधिकृत सांगण्यात आलेली नाही.